स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
मंगळवार, २१ सप्टेंबर, २०१०
जपून चाल् पोरी जपून चाल्
जपून चाल् पोरी जपून चाल्
जपून चाल् पोरी जपून चाल्
बघणाऱ्या माणसाच्या जिवाचे हाल् !
लाडाने वळून बघायची खोड्
नाजूक नखऱ्याला नाही या तोड्
डोळ्यांत काजळ, गुलाबी गाल् !
केसात सुरंगी रंगात ग
विजेची लवलव अंगात ग
खट्याळ पदराला आवर घाल् !
जिंकीत जिंकीत जातेस तू
ज्वानीचं गाणं हे गातेस तू
हासून होतेस लाजून लाल् !
उरात लागलेत नाचाया मोर्
कोणाच्या गळ्याला लागेल दोर् ?
माझ्या या काळजाचा चुकेल ताल् !!
-आमोद पाटील
©आगरी युवा
आगरी बोली - आगरी बाणा.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा