आमोद पाटील-आगरी बाणा: आमचे गावानचा सारोजनीक गनपती उत्सव(agri vastraharan)

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

बुधवार, २९ सप्टेंबर, २०१०

आमचे गावानचा सारोजनीक गनपती उत्सव(agri vastraharan)



आमचे गावानचा सारोजनीक गनपती उत्सव ©


मांगच्या सालची गोस्ट सांगतय
कमीटीची मीटींग झाल्ती
मीटींगमदी ठरला क ह्ये गनपती उत्सवान गावचा नाटक बसवाचा.
पन ईशय कोन्ता ?
कूनी म्हनालं सामाजीक ठीवा, त कुनी म्हनल सांस्क्रुतीक , त कुनी आनकी कसला
चीक्कार भांडना झायली पन कुन्याव कई बी आयकना. तवा काश्या (माजा बा मंडली, काशिनाथ भोईर, पन तेला सगलीजना काश्या म्हनुनच वलीकतान. आवराच नाय तो सोता पन
काशिनाथ म्हुन हाक दील्ली क पाच मिन्ट ईचार करुन ओ देतं) उबा राह्यला न म्हनला
"यंदा आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा. क र मास्तर ?"
मास्तर कमीटीचा आद्यक्श. पन त्याचे डोल्यासमोर बांबू फिरलं.
"व्हय व्हय ! आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा. " मास्तरचा अनूमोदन
ईशय फिक्स - 'द्रुपदी वस्त्रहरन'
"चला आता काश्टींग करुया " मास्तर
म्हन्जे ? म्हात्र्यांचा सुरया
"आर म्हन्जी कोनी कोनी क कराचा ते. तर मंडली , डायरेक्टर मीच होतय आनी नाटक बी लीवतं. मना म्हाईत हाय ईतीहास" मास्तर
"बर मंग आता एयाक्टर बी तुमीच ठरवा. " बाबू घरत - खजिनदार
हां. तर आता धर्मराज कोन ?
मी हुतय " भास्कर राउताचा बंड्या
अर्जुन .. भिम .. नकुल .. सगली पांडवा झायली
"दुर्योदन ?"
"तुकाराम तु हो."
"पन मास्तर मना टेजवर बोलाया जमन?
"आर तु कई नाय बोलाचा. निस्ता पाच येला ह्य ह्य करुन हासाचा बोल." मास्तर
दुशासन कोन ?
सगल्यांचा हात वर
"आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर
"ह्या काम आपन पक्याला देव . कुनाचा आब्जेक्सन ?"
सगली मान्सा चिप रायली बोल. पक्या बीनईरोद दुशासन.
आता द्रुपदी
सगली लोका यकमेकांचे तोंडाकड बगु लागली. कोनाव कई बी सूचना
आपल्या बायकामुली कोन पाटवल पक्या करुन पातल सोरवाला. कई ईपरीत झाला तर कवरा लफरा वाडलं
"पनवेलचे 'मल्लिका' मदी माजी वलक हाय." बारक्या म्हनाला "तीतुन आनु यकादी."
"जमल जमल , आनी तीचा यक डांस बी ठीउ . मोप गर्दी जमल. "
रेसल सुरु . सगला येवस्तीत जमला पन येक लफरा झाला
"द्युत" कसा खेलाचा ह्ये मास्तरला कलना. आता मास्तरलाच म्हाईत नाय म्हन्जे बाकी सग्ल्यांची बोंब. क कराचा
"आरं पोराव कना घाबरता, यक काम करा तीन पानी खेला. लासला धर्मराज हरल न मंग द्रुपदीचा वस्रहरन करु. क बोल्ता?" दत्ता पाटील बोल्ला
ह्ये बी पटल सर्वांना.
नाटक सुरु झाल
झाल्त काय मंडली , काश्या न बंड्या दोगव भट्टीची लाउन आल्ते आनी यकमेकांच डायलाग बोलत व्हते.
सगला लोच्या चाल्ला व्हता
शेवटी यकदाचा धर्मराजान दुयोधनाला तीन पानीच आवतान द्दील्ल नी 'द्युता' स सुर्वात झाली
पन धर्मराज जिकतच गेला . दुयोधनाला पत्ताच येयना .
दुयोधनाला एक्का जोड त धर्मराजाला कलर
दुयोधनाला कलर त धर्मराजाला राऊंड
दुयोधनाला चट्टी त धर्मराजाला तीन तीर्या
मास्तर ईंगेतून वरडा लागले धर्मराजा तुला हराला पायजेल, तुला हराला पायजेल ,
काश्या तराट , तो कइ आयकना
"मना पत्ते सरस येतान मंग मी कना शो दीउ ?"
दुयोधन रास हरला . काश्या उटला " द्रुपदीला हाना. मी सोरनार पातल . माजा आदीकार हाय तो."
दुयोधन म्हनाला " नाटकान क लीवलय ? मीच द्रुपदी ला मांडीव बशीवनार"
दुशासन म्हनाला "मीच द्रुपदीची सारी वडनार"
हा लफरा वारला. ही मारामारी .
आनी मंडली द्रुपदि सोरुन सगल्यांची वस्त्रहरना झायली.

1 टिप्पणी: