आमोद पाटील-आगरी बाणा: आमची आगरी बोली-2 AGRI BOLI

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०१०

आमची आगरी बोली-2 AGRI BOLI



आमची आगरी बोली-२


17) ऊन, हून प्रत्ययाऐवजी शी येतो- गर्दीतून- गर्दीशी, गावातून- गावानशी, लांबून- लांबशी, गावाहून- गावशी.18) ला प्रत्यया ठिकाणी ल+महाप्राण येतो- तुला- तुल्हा, तिला- तिल्हा. मलाचे मना होते.19) त ऐवजी न येतो- फुलात- फुलान, रानात-रानान, मनात- मनान.20) नो (संबोधन) ऐवजी नू किंवा हू येतो- पोरांनो- पोरांनू/पोरांहू, गाववाल्यांनो- गाववाल्यानू/हू.21) "प्रमाणे' ऐवजी सारा/सारी येते- त्याप्रमाणे- त्या सारा/री मुलाप्रमाणे- मुलासारा, साखरेप्रमाणे- साकरंसारा.22) "होता', "नव्हता' ऐवजी "व्हता', "नता' येते.23) "आता'चे "आथा' होते- आथा कल्हा लरतस?24) "अ'चा सर्रास "आ' होतो- अंग-आऽग, अंतर- आंतर, असा- आसा.25) कशालाचे कन्हाला किंवा कल्हा होते- कन्हाला आलास?26) "वे' ऐवजी "य' येतो- वेडा- यरा, वेस- यस, वेगळा- यगला, वेद- यद, वेसण- यसन.27) "म' ऐवजी "म्ह' येतो- महादेव- म्हादेव, मोठा- म्होटा, मारुती- म्हारोती, महाराज- म्हाराज.28) "ढ' ऐवजी "ऱ्ह' येतो- गाढव- गाऱ्हव, पेढा- पेऱ्हा, कढी- कऱ्ही.29) सुरुवातीच्या "ओ' ऐवजी "व' येतो- ओटा- वटा, ओवा- ववा, ओकारी- वकारी, ओल- वल.30) "ए' ऐवजी "य' येतो- एक- यक, एकदा- यकदा, एवढा- यवऱ्हा.31) शेवटच्या ईऐवजी य येतो- सुई- सुय, रुखमाई- रुखमाय, आई- आय, घाई- घाय, जावई- जावय.32) सुरुवातीचा ऐ कार जाऊन मूळ अक्षरापुढे ई कार येतो- बैल- बईल, म्हैस- म्हईस, वैद्य- वईद, मैल- मईल, खैर- खईर, सैल- सईल.33) सुरुवातीचा औ कार जाऊन मुळाक्षरापुढे ऊ येतो- मौज- मऊज, गौर- गऊर, फौज- फऊज, हौद- हऊद, कौल- कऊल.अशी ही उत्तर कोकणची आगर बोली मराठी सारस्वतात पूर्वी लेखनात न आल्याने फारशी रुळली नाही, पण तशी ही समजण्यास कठीण मात्र नाही.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा