आमोद पाटील-आगरी बाणा: काल होता शनिवार

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०१०

काल होता शनिवारकाल होता शनिवार


काल होता शनिवार, आज हाय शनिवार केली गड्या तुरीची डाळ
चकण्या डोळा सांभाळ तुझा डोळा साभाळ ।। धृ० ।।

उनाड पोरं घरोघरी कामधंदा ना मुळी करी
उभे राहती नाक्यावरी नजर फिरते पोरीवरी
असे हरिचे हे लाल चकण्या डोळा सांभाळ ।। १ ।।

जुगार दारू मटक्याची संवय त्यांना व्यसनाची
मुळीना पर्वा जीवनाची संगत नडते मित्रांची
पिवुनी करती धमाल चकण्या डोळा सांभाळ ।। २ ।।

जगाचा जवळी ये अंत गरीबाला पोटाची भ्रांत
कित्येक होती श्रीमंत नीतिची त्यांना ना खंत
खाती ते दुस-याचा माल चकण्या डोळा सांभाळ ।। ३ ।।

बेकारी तर झाली अपार म्हागाईला चढली धार
अत्याचार उत हा फार गरीबीला ना कुठे आधार
हा कलियुगाचा काळ चकण्या डोळा सांभाळ ।। ४ ।।

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

1 टिप्पणी: