आमोद पाटील-आगरी बाणा: माजे मनासारखा आगरी जेवाण.

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

शुक्रवार, १४ जानेवारी, २०११

माजे मनासारखा आगरी जेवाण.


ताजी जितारी न तांदळाच्या भाकरी.

माजे मनासारखा आगरी जेवाण.
येताव का जेवाला?

जिताडा म्हटला म्हणजे शेतकर्‍यांना पर्वणीच असायची आधी. शेतात पाणी साचल की जिताडे येत असत. शेतातले जिताडे म्हणजे चविष्ट मांसाहार. हल्ली शेतातले जिताडे खुप कमी मिळतात. आता तळ्यात, खाडीत आणि समुद्रात जास्त सापडतात. तळ्यातल्या जिताड्यांना जास्त वईस वास असतो पण शेतातले किंवा खाडीतले जिताडे चवदार असायचे. पुर्वी शेतात जिताडे आले की शेतकरी ते पकडून अगदी अलिपलीकडच्या गावांतील नातलगांनासुद्धा भेट द्यायचे.
[ पण सध्या १२.५% प्लाट आणि नालायक राजकारणी या भडव्यानी आमचा समाज तोडला ]


कृती:
जिताड्याची खवले काढून त्याचे पोटाला चिर पाडून पोटातील घाण काढावी, शेपुट व पर काढावेत. मग जर जिताडी कापुन घ्यावी. डोके व शेपटाचा भाग कालवणासाठी वापरावे व मधल्या तुकड्या तळण्यासाठी वापराव्यात. सगळ कालवणासाठी किंवा तळण्यासाठी वापरल तरी चालतच.


जिताड्याच्या तळण्याचे साहित्य :
जिताड्याच्या तुकड्या
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन,
हिंग,
हळ्द,
२ चमचे मसाला,
चवी पुरते मिठ,
तेल.

वरचे सगळ साहित्य तळण्यासाठी वापरणार्‍या तुकड्यांना चांगल चोळा. थोडा लिंबुरस लावला तरी छान होतात तुकड्या. आणि हे मुरवलत तर अजुनच चविष्ट.


चला आता तव्यावर टाका बघु तळायला.मिडीयम गॅसवर चांगल्या शिजवा पलटी करुन चांगल्या खरपुस भाजुन घ्या. तळून अश्या तुकड्या तयार होऊन जेवणावर घ्यायच्या आधीच एखादी मटकावली जाते.

(पण हल्ली problem हा आहे की, आमच्या आगरी पोरीना कालवण आणि तांदळाच्या भाकरी येतच नाही.(chinese वैगेरे. मस्त जमत पण आगरी जेवण आम्हाला येत नाही.) माझ्या सारख्या आगरी पोरांचे नंतर खुप वांदे दिसताहेत.)जिताड्याच्या कालवणाचे साहित्य :
जिताडी (कापुन, धुवुन)
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल
कोकम/चिंचेचा कोळ (आई कोकम वापरते) चिंचेचा कोळ चालतो.
वाटण : आल अर्धा इंच, लसूण ५-६ पाकळ्या, कोथिंबीर, मिरची १, ओल खोबर ४ चमचे.

जिताड्याच्या कालवणाची कृती :
टोपात तेलावर लसणाची फोडणी देउन हिंग, हळद, मसाला घालून त्यात वाटण घालावे वर जिताड्यांचे तुकडे घालावेत. वर वाटण, कोकम/चिंचेचा कोळ मिठ, गरजे पुरते पाणी घालून उकळवावे. ४-५ मिनीटांत गॅस बंद करावा.

असे मस्त लाल भडक कालवण तय्यार.
येताव का जेवाला?सौजन्य:
सौ:प्राजक्ता म्हात्रे(उरण)

४ टिप्पण्या:

  1. Amod, great job ! I had been thinking of doing something like this for our Aagri samaj for a long time, but due to job and other things, never really got a chance. I live in US but would like to team up with u in this effort. Please let me know your email id so that we can communicate.

    Keep it up !

    Santosh Mhatre

    उत्तर द्याहटवा
  2. संतोष दादा, आपण मला फेसबुकवर भेटू शकता. आणि आपल्यासारख्यांच्या सहकार्यानेच हे कार्य चालू आहे. भविष्यात देखील आपली साथ कायम राहावी हीच मनापासून इच्छा.

    उत्तर द्याहटवा