आमोद पाटील-आगरी बाणा: रायगडची पोपटी.

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०११

रायगडची पोपटी.

रायगडची प्रसिद्ध पोपटी
पाककृतीला लागणारा वेळ: ४५ मिनिट
पाककृतीचे जिन्नस:
२ किलो गोड्या वालाच्या शेंगा
१ मातीचा माठ
मीठ चवी प्रमाणे
बटाटे ३ /४
कांदे ३/४
खरवडलेला नारळ (कांदे, बटाट्यांमध्ये सारण म्हणून)
मसाला (सारणासाठी)
भांबुर्डीची पाने
भरपुर पला -पाचोळा,
सरपण
हल्ली मटण चिकन टाकुनही पोपटी केली जाते.(जर भाज्या आणि मटण किंवा चिकन
एकत्र शिजवायचे असतील तर मटण किंवा चिकन केळीच्या पानात गुंडाळून बांधुन
ठेवतात.)
मार्गदर्शन:
पोपटी ही एक जि. रायगड परिसरात गावरान पाककृती आहे. शेणाने सारवलेल्या
जमिनीवर बसुन गरमागरम खाण्यात जी मजा आहे ती शब्दात सांगणे खूप अवघड आहे
. उरण(खासकरुन चिरनेर गाव आमच्या जासई मध्ये अजिबात नाही), पेण, अलिबाग
(जि. रायगड) या परिसरात जे वाल पिकतात त्यांना गोडेवाल म्हणतात .
अशा वालच्या शेंगा घ्याव्या. ताज्या ताज्या शेतातून काढून आणल्या असतील त
फ़ारच उत्तम. (या शेंगा दिसायला थोड्याफ़ार घेवड्याच्या शेंगेसारख्या
दिसतात पण आकाराने लहान असतात ) या शेंगा अवश्यकता वाटल्यास धुवून
घ्याव्या . बटाटे व कांदे धुवून घ्यावेत. कांदे सोलून घ्यावेत. भरली
वांगी करतात त्याप्रमाणे कांदे व बटाटे कापून घ्यावे .
सारण तयार करण्यासाठी खरवडलेला ओला नारळ, मसाला, मीठ, थोडे तिखट चवी
प्रमाणे एकत्र करावे. कापलेल्या कांदे व बटाट्यांमध्ये हे सारण भरावे.
प्रत्येक कांदा / बटाटा छोट्या सुताने बांधून घ्यावा. मातीचे मडके घेऊन
त्याच्या तळाच्या पाव भागात सर्वात खाली भांबुर्डीचा पाला भरावा . मग
त्यावर वालच्या शेंगा, बटाटे, कांदे आणि चवी प्रमाणे मीठ टाकावे.
उरलेल्या जागेत भांबुर्डीचा पाला ठासुन भरावा. सगळे सरपण एकत्र करावे.
त्यामधे या माठाला ठेवावे (पाला ठासून भरलेला असल्यामुळे आतले जिन्नस
बाहेर येत नाहीत ) आणि बिनदिक्कत आग लावून द्यावी. जाळ करतान एक दक्षता
घ्यावी, माठाच्या सर्व बाजूंनी सरपण असेल. ३० ते ४० मिनीटे असाच जाळ राहू
द्यावा. आपण ठेवलेला माठ लालबुंद झालेला आपणांस आढळून येईल . आशा वेळी
त्यावर जळत असलेले सरपण थोडे बाजुला करून माठावर ओंजळीतून पाणी शिंपडावे.
पाण्याच फ़ेस झाला तर पोपटी झाली असे समजावे. काठीने तो माठ बाहेर काढावा.
काठीनेच वर भरलेला भांबुर्डीचा पाला काढावा. मग़ शेंगा, बटाटे, कांदे
काढून घ्यावे. आणि गरम गरम शेंगा सोलून खाव्या.
या पोपटीला भांबुर्ड्याच्या पाल्याचा, ओव्याचा व भाजका असा एक विशिष्ट
वास व चव असते. हा पुर्णपणे भाजलेला प्रकार आहे. तेल व पाणी न वापरता.
भाजल्यामुळे ही पोपटी पचायलाही हलकी असते.

सौजन्य:
सौ.प्राजक्ता म्हात्रे(उरण)१४ टिप्पण्या:

 1. ekdum bhari. . . .!! hi veg asli tari pan mast lagte. . . .pan jar gavthi kombdi takun banvali asel tar mag majjach majja. . . .!!

  उत्तर द्याहटवा
 2. जिंकलास बाला !!!!!!!
  लईभारी हयनार !!!!!!!!!!
  चाबुक !!!!!!!!!

  उत्तर द्याहटवा
 3. mitra maja yete popati banavayala pan ani khayala pan... sagale mitra asatil tar sandhyakal mast nighun jate popati madhe.. ani tyat chicken asel tar maja..
  thank u mitra popati share kelya baddal..
  amod tu banav kadhi tari ani amhala pan bolav .. maja karu sagale agri
  --ABHAY MOKAL(PAREL LALBAUG-MUMBAI, VILLEGE HASHIVARE-ALIBAG)

  उत्तर द्याहटवा
 4. आमोद, एक कृती सांगायची तुझी राहून गेली. जे मडके आपण भाजतो त्याचे तोंड हे उलटे म्हणजेच जमिनीवर असले पाहिजे म्हणजे त्याला जेव्हा जाळ देतो तेव्हा मडक्या मधील वाफ तशीच आत राहते आणि आतील जिन्नस पूर्ण पणे वाफेवर शिजते. आणि मडके जेव्हा आपण भाजायला घेतो तेव्हाच जास्तीत जास्त सरपण मडक्या भोवती लावून ठेवावे आणि ते मडके भाजण्याचा अवधी हा अंदाजे अर्धा तास आहे.
  दर वर्षी मी माझ्या गावी म्हणजेच उरण किवा रेवदंडा येथे माझ्या आजोळी पोपटीचा खास कार्यक्रम आखतो आणि कमीत कमी ३ मोठी मडकी ठरलेली असतात, त्यात १ व्हेज असते आणि २ नॉन व्हेज असतात. व्हेज मध्ये मेदलाच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा तसेच चवळीच्या शेंगा, सफेद कांदे, तू सांगितल्या प्रमाणे भरलेली वांगी, बटाटे आणि शेकटाच्या शेंगा आणि सगळ्यात शेवटी ओवा हे देखील असतो तसेच नॉन व्हेज मध्ये अंडी आणि साफ करून आगरी मसाला लावलेली अख्खी कोंबडी असते.
  आणि त्या पोपटीची मजाच न्यारी, ती शब्दात वर्णन करणे अशक्य आहे.

  आणि तू म्हटलेस तसेच ती संध्याकाळी शेतात किवा मळ्यामध्ये बनवून आणि बसून गरमागरम खायला खूप मजा येते आणि त्या दिवशी रात्रीच्या जेवणाला सुट्टी असते. ;-)

  आणखीन एक नमूद करावेसे वाटते ते कि ह्या पोपतीचा स्वाद फक्त कट्टर आगरी माणसालाच समजतो बाकीचे लोक नाके मुरडतात कारण ते तो स्वाद अनभवू शकत नाहीत.

  आणि सगळ्यात शेवटचे म्हणजे तुझे आभार कारण हि पाक कृती तू नेट वर शेअर केली आहेस आणि ती मी आता माझ्या इतर आगरी मित्रांना सांगू शकतो ज्यांना ती माहित नाही.

  तुझे त्रिवार धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा
 5. धन्यवाद दादा. कट्टर आगरी माणसालाच ती चव कळते. बरोबर बोललात. आपला ब्लॉग देखील कट्टर आगरी. आगरी बोली-आगरी बाणा.
  पुढे देखील अशीच साथ असुदे. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया मिळाल्या की, आमच्या कामाला अजून हुरूप मिळतो यात शंका नाही.

  उत्तर द्याहटवा
 6. thanks aplya agri bana sathi. popti mazya aawdichi dish aahe.ek request aahe 4 no,photomadhla pala bhamburdyacha nahi karan tyachi pane ubhi golakar astat.ple.check

  उत्तर द्याहटवा
 7. dadus non veg popatichi pan recipe sanga... agri ahot veg kuthe khayla lavtos amhala :-P
  thanks in advance...waiting :-)

  उत्तर द्याहटवा
 8. खरेच.आमोद तुम्ही दिलेली पोपटीची कृती सर्वाना मार्गदर्शक ठरेल.त्यात आम्ही एक प्रयोग केला कि वालाच्या शेंगा ,भुईमुगाच्या शेंगा,मटारच्या शेंगा,ओले हरभरे सालासकट या सर्व वस्तू पाण्यामध्ये मीठ ,हळद,ओवा टाकून ५/६ तास भिजत ठेवल्या.रात्री त्यातल्या ओलाव्यामुळे सुंदर शिजतात.व जळून काळ्या किंवा कडक होत नाहीत.रवि ठाकूर.पेण .

  उत्तर द्याहटवा