आमोद पाटील-आगरी बाणा: आगरी साहित्य

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०११

आगरी साहित्य

भाल्या त्याचेच तंद्रीन् इरी वरत बांधावरशी घरा चालला होता. येलेची न् आजुबाजूला काय चाल्ललाय याची त्याला अजाबात जानीव पुन व्हत नव्हती. तवर्यान मंगारशी आवाज आयला... "ये भाल्या! थांब तखरच... मी पुन यतय". मंग ते दोघ पुन सोबतीनुच चालाला लागल..."इरी दे र" भाल्याचे बरब व्हता तो बोलला...भाल्यान मंग त्याला इरी दिली...बरबचा "च्याला... ३० नबंर!!!... मी पुन यीच रोजचे ईच वरत..."आखरून तख्रूनच्या बाता मारत दोघा चालत व्हत...तवर्यान..."इरी दे र" बरबचा परत बोलला...ती पुन संपली... मंग परत त्यान इरी मांगली... भाल्या आजून पयलीच इरी वरत होता... त्याला इरी दिली न भाल्या जरासा टरकलाच... रातीच १२ वाजून जेलन न सगलेकर किर्रर् कालोख असल्याचा पयल्यांदा भाल्याला समजला... त्यान आज आमोश्या... मंग भाल्यान जोरान चालाला सुरुवात केली... बरबचा नुसत्या येके मान्ग्शी यक अश्या इर्या मांगत होता... आपले बरब कोन चाललाय ह्या पुन भाल्याला माहित नव्हता... तुक्यादा आसल ऐसा इतकेवेल त्याचा वाटला व्हता... पुन आता तू कोन र बाला? या विचाराचा धारस भाल्याला व्हत नवता... बांध खाजणानशी तो गावान जात व्हता... बांधाचे एके बाजूला मोरका किल्ला न दुसरे बाजूला खारी व्हती... सग्लेकर नुसती समशान शांती पसरली व्हती... मधीनशीच चीम्बोर्यांचे हालचालीमुल पान्याचा आवाज व्हत व्हता... निवट्यानं खारीच्या पान्यान उरी झेतली की बुरुक ऐसा आवाज व्हत व्हता... खरत ये आवाज भाल्यासाठी रोजचच व्हते, पुन आज त्याला तेंच आवाजाचे मुल दचकाला व्हत व्हता... हलुच भाल्यानं खाली पायला त कालोखान बरबच्याच पाय दिसलच नाय... स्वताचेच चपलांचा आवाज भाल्याला ऐकाला येत व्हता... आता भाल्याची हवाच निगाची बाकी व्हती... खाजनानशी कोल्हे-कूई चा आवाज ऐकाला यत व्हता... लय वेल झाला तरी पुन गाव जवल येत नव्हता... भीतीशी भाल्या थरथर कापत व्हता... तो दुसरा अजूनपण इर्या मांगताच व्हता... शेवटची इरी रायली व्हती... इर्या संपल्याव आपला कय व्हणार? ये भीतीशी भाल्यानी पलाला सुरुवात केली... बराच पलल्यावर दमल्यामुल भाल्या थांबला... तवाच त्याला खांद्याव कोणाचातरी हात जानवला न आवाज आयला..."कती पलशील?... आज आमोशेची रात्र... न तु माझेच हद्दीन हाईस..."जीवाचे भीतीन भाल्या अजूनुच जोरान पलत सुटला... गावाचे वेशीचे आत जेल्यावर भाल्यानी मांग पाहीला त तो वेशी जवलुच थांबला व्हता... भाल्या पलतूच घरन घुसला..."काय रं... काय झाला?... आवरा कला घाबरला हाईस?" भाल्याच्या आशीनी विचारला...भीतीन भाल्याची बोबरीच वलली व्हती... धापा टाकतच घरलेला सगला प्रकार भाल्यानं आईसला सांगला...आईसन ते कायपन मनाव झेताला नाही... उलट ती बोलली "आरं पण... रोजचाच येतस न बांधावरशी ये वक्ताला... पोटात कय नय तुझे... जा... सकालचा बोंबलाच कालवण न् सुकट हाय... जरासा जेवून झे... मी पुन बसते तुझे बरब जेवाला".जेवण झाल्याव माय-लेक झोपी जेले... भाल्याला झोप लागत नवती... सकाल व्हायची वाट बघत तो परुन व्हता... सकालचे कुठेतरी भाल्याचा डोला लागला...भालचंद्र नामदेव म्हात्रे म्हणजे भाल्या... आगरी बाला, लंगोटीन भजीची पुरी न् बगावा तवा वरतय बिरी... ऐसा यो भाल्या... इरीचा लय दिवाना... दारुचे मुल बापासला जाऊन ११ वर्षा झाली... तवा पासून माय-लेक दोघंच राहतान... भाल्याचा वय ३३, पण आजून अंगाला हलद लागली नाय... लय आलशी माणूस, पुन आपला नशीबुच शेन खातय असा भाल्याचा म्हनना... आईस खंबीर म्हणून चाललाय सगला बरा... दिवसभर बोस्की झेवून जातो... पण बाव काय मिल नाय... हातान पैस टीकतुच नाय... म्हणून जवरा कमवल तवरा आईसचे हातान देतो... पण रोज न चुकता इरी साठी आईसचे करशी पैशे झेतो...थोरा उशीराच उठून तोंड घाशीत भाल्या परवीन येऊन बसला... रातीचे प्रकारानं डोका भनभनला व्हता...लोका हसतीन... कोनाला सांगाचा की नाय ऐसा ईचार चालू होता... 'जाऊदे... नय सांग कोनाला पुन' असा म्हनुन भाल्या घरान शिरला... आईसनी विचारल्याव भाल्यानं तो विषय टालला...दुपारचा जेवण उरकून भाल्या जरा परला व्हता... तवाच..."भाल्या!... आर ये भाल्या!... येतस का पकटीवर" ये आवाजान भाल्याला जाग आली... बाहेर येऊन बघला त तुक्यादा होता...तुक्यादा म्हणजे भाल्याचा चुलत काकुस... गावचा पोलीस पाटील... दोघा पकटीवर जायला न्निगले... बांधावरशी जाताना परत रातीचा सगला परकार भाल्याला आठवाला लागला... सांगू का नको... सांगू का नको असा करता करता शेवटी भाल्यानी काल रातचे ज्या काय घरला त्या सगला तुक्यादाला सांगला... आवरी वर्षा झाली पुन तुक्यादान असला कवा आईकला नवता... असला काय घरुच शकत नाय असा तुक्यादाचा म्हणना नवता... पुन भाल्या आजून घाबराला नको म्हणूनशी तुक्यादानं विषय बदलला... पकटीवर पोचल्यावर दोघापन आपआपले कामाला लागले... सगला काम आटपून संध्याकालच्या आतुच भाल्या आज घरा आला आणि लवकरुच झोपला... तुक्यादाला कामा उरकून निघाला रात झाली... तुक्यादा यकटाच बांधावरशी येत व्हता... सकालचे भाल्यानी सांगलेली गोष्ट तुक्यादाला आठवली... तेच ईचारान बांधावरचे वराच्या झाराजवल पोचला... कालोखान वरावर दोन डोल चमकत व्हत... कोनतरी बोंबलतय असा वाटत व्हता.... आता तुक्यादाला जराशी भिती वाटाला लागली आणि तवर्यान फरफर करत दोन तीन घुबरा किल्ल्याकर उराली... फरफर संपल्याव परत रातीचे शांततेनं तुक्यादाला पकरला... एकटाच असलेमुल तुक्यादाचा डोका फिराला लागला व्हता न तवर्यान आवाज आयला..."तुक्यादा!... थांब जुरुसा... यक इरी दे..."तुक्यादाचचे अंगाव काटा आयला... थोरावेल तुक्यादा तयाच घट झायला... कालोखान वराखाली कोनतरी बसल्याचा जानवत होता, पुन आवरे रातचे वराखाली कोन बसलाय?... हातानचा तयाच टाकून तुक्यादान जो पल कारला तो थेट घरा पोचे पर्यंत एकदापुन मांग वलुन पायला नाय... तुक्यादा येरापिसा झाला व्हता... घरा या सांगताच त्याचे बायकोनी दोन आठवर्यापूर्वी घरलेले गोष्टीची आठवन तुक्यादाला करुनशी दिली...दोन आठवर्यापूर्वी पक्या यकटाच सांचेपारा चिंबोऱ्या पकराला खारीन जेला व्हता... दोन दिस आलाच नाय परत... म्हनुनशी गावांचे लोकाई लय शोधाशोध केली त पक्याचा मुर्दा खाजणान सापरला... पक्याला पुरमांग कोनीच नव्हता... यकटाच असाचा... गावान कोनाशीच पटाचा नाय त्याचा... कोनशी न कोनशी तरी भांडना चालूच असाची... इरीचा लय शोकीन व्हता... पक्या कैसा मेला ह्या कोनालापुन मायती नवता... कोनीतरी त्याला वर पोचवला....आशी गावांची लोक बोलाची आनी बांध ह्येच खाजनानशी जात व्हता...या आठवल्याव तुक्यादा उरालाच... तैसाच भाल्याचे घरा पोचला आनी सगला सांगला... आता भाल्याचे आईसचा पुन ईश्वास बसला... म्हनजे पक्याचा भूत?... पन कोनीतरी मानुसच या सगला कराची शक्यता व्हतीच... पण कोन करनार आसा?... कोनचा जीव वर आलाय येवरा?... असलाच त तो रम्या असला पायजे... पन दारु पीऊन नसत लफर करतय म्हनुनशी रमेशला त १० महीन्या आगुदरच मारून मारून गावानशी हाकलून दिला होता... आयुष्यान परत कोनची पुन खोरी कारनार नाय ऐशी त्याची हालत गावांचे लोकाई केली व्हती... तव पासून तो कोनाचे नजरेन सुदीक परला नव्हता... यो त भुताचाच परकार!!! पक्याच तो... नयतरी नेहमीच आख्खे गावावर खार खाऊन असाचा तो...बांधाव पक्याचचा भूत हाय ऐशी खबर दुसरे दिवशी गावभर पसरला एल लागली नाय... बांधावरशी येवा-जावाला नको म्हनुन थोरे दिवस पकटीवरचे झोपरीन राहूनुच डोलीला जावाचा निरनय भाल्यानी झेतला...इरीवाले पक्याचे भुतानी आख्खे गावाला येरा करुन सोरला व्हता... भीतीचे मुल लोकाई सांचे डोलीला जावाचा बंद केला... पक्यानी तरास देवाला नको म्हनुन येणार जाणार बांधावरचे वराखाली इरीची पाकीटा पक्यासाठी ठेवाला लागली.... पुण मयना उलटला तरी रोज कोनला ना कोनला ऐसाच अनुभव यत व्हता...आता मात्र कयतरी उपाय केलाच पायजे असा सगले गावखीन ठरला...तवर्यान आजूच रमेश बांधाव दिसला व्हता ऐशी बातमी आयली... आवरे दिवस रमेश कोनाला दिसलाच नाय न आता यो बांधाव कनशी आयला?... आनी गावान न येता बांधाव काय करतय?... नायतरी रमेशव संशय व्हताच... काय त्या सोक्ष-मोक्ष लावाचाच म्हनुन आज रातचे ५-६ जना एकत्र बांधाव जाऊ असा तुक्यादान ठरवला... ठरले प्रमाने राती तुक्यादा, भाल्या न अजून ४ जना बांधाव पोचल... कैसीच चाहूल नवती... वराखाली कोनतरी आरवा परलेला दिसला... जवल जाऊन बघतय त त्या रमेशुच व्हता... तुक्यादान त्याला उठवाचा प्रयत्न केला, पुन कायपन हालचाल झाली नाय... मुर्दाच तो... हलनार कैसा? प्रेताच डोल जरा जास्तच लाल रगता सारख दिसत व्हत... रमेशचे बॉरीवर कयाच मारल्याच्या वला दिसत नवत्या... मंग यो मेला कैसा?... दुसरा कोन असल?... पक्याचाच भूत... आवरे दिवस पक्यानी कोनाला मारला नवता, पुन आता त रमेशचा मुरदाच पारला... गावंची लोका लयुच घाबरली... दिवसाचे पुन बांधावरशी जायला लोका घाबराला लागली... भगता शिवाय आता उपाय नवता... मंग तुक्यादान शेजारचे गावानशी एक भगत बोलवला... पक्या जीता व्हता तवा त्याचे वापराची येखादी वस्तू लागनार आनी येते आमोशेला एक बोकर देवाला लागल असा भगतानी सांगला... आमोश्या दोन दिसावरुच व्हती... तोपर्यंत पक्याचे खोलीनशी पक्याचा शर्ट तुक्यादान पलवला... मंग आमोशेच्या राती भगत न गाववाल बांधावरचे वराखाली पोचल... सगला मांडून झाल्याव मंत्र बोलाला सुरुवात झायली... भगतानी आगीन कवटी ठेवली... आगीमुल कवटी लालभरक झाली... कवटीव हलद-कुकू टाकून भगत मंत्र बोलत व्हता... आमोशेच्या कालोखात आगीचे प्रकाशान वर न्हाऊन निन्गालाला व्हता... आजुबाजूचे वातावरणान भीती जानवत व्हती... मधीनुच येखादा दचकून आखर तखर बघत व्हता... बरोब १२ वाजता भगतान पक्याचा शर्ट आगीन टाकला न बोकराची आहूती दिली... पुरचा सगला प्रकार संपवून गाववाल सकाल्चेच गावान परत आल...त्याचे नंतर पुरचे २-३ राती पक्या परत कोनाला दिसला नाय... भगतान आपलं काम केला होता...मागचे मयन्यात भाल्याच्या डोलीला लय बाव लागला...पापलेट, सुरमाई, रावस, हलवा, बांगडा...लागलुच ना!... डोलीला कोनपन जात नवता न भाल्या पकटीवरुच असलेमुल रोजूच जात व्हता... पक्याचा लफरा नीस्तरल्यामुल बरेच दिवसानशी भाल्या घरा आला व्हता... नंतर एक आठवरा तो पकटीवर जेलाच नाय... येके दुपारचे जेवान उरकून परवीत इरी फुकत बसला होता..."काय र... इरी आणाला पैशे मांगत नाय आजकाल..." आईसआईसचे कर बघत भाल्या हलुच हसला... जरा येग्लाच हसू होता तो... खरात... लय दिवस पुरतीन आवर्या इर्या मागचे एक-दीर मयन्यान भाल्याकर जमल्या होत्या... आनी जे दिवशी रमेशचा प्रेत सापरला तेच दिवशी शेजारचे गावान दारुच्या ईषबाधेमुल आजून ५ जना मेली व्हती.....................
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

1 टिप्पणी: