आमोद पाटील-आगरी बाणा: मा.श्री.लोकनेते.दि.बा.पाटील साहेबांची ओळख माझ्या शब्दातून.....................

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

गुरुवार, ३१ मार्च, २०११

मा.श्री.लोकनेते.दि.बा.पाटील साहेबांची ओळख माझ्या शब्दातून.....................

मा.श्री.लोकनेते.दि.बा.पाटील साहेब आणि त्यांच्या दिवंगत पत्नी कै.सौ.उर्मिला दिनकर पाटील


"आमचे दिबा"

पाटील साहेबांचे फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर भेट द्या:
दि.बा.पाटील साहेबांच्या विविध भावमुद्रा

Shri.D.B.PATIL,
Ex-M.P,
Ex-M.L.A,
Kulaba,Raigad,Uran-Panvel

मा.श्री.लोकनेते.दि.बा.पाटील साहेब.
माजी खासदार-कुलाबा/रायगड.
माजी आमदार-उरण-पनवेल

प्रस्तावना:
आज आमचे “दिबा” वार्धक्यामुळे इतरांना थोडेसे वेगळेच वाटतात..........पण त्या इतरांनी हे लक्ष्यात घ्यावं की,”शेवटी वाघ हा वाघच असतो..........!!”

आपला हा ब्लॉग ज्या व्यक्तीच्या विचारांवर काम करतोय त्या व्यक्तीचं मी माझ्या शब्दात चित्रण करण्याचा प्रयत्न करतोय. हा लेख लिहिताना कोणाच्याही भावनांचा विचार केला जाणार नाही. जे काही असेल ते रोखठोक. पाटील साहेब आमचे आजोबा असल्याकारणाने काही कौटुंबिक प्रसंगांकडे हा लेख धाव घेऊ शकतो.


मा.श्री.लोकनेते.दि.बा.पाटील साहेबांची ओळख माझ्या शब्दातून.....................


नाव:
श्री.दि.बा.पाटील साहेब यांच पूर्ण नाव अनेक जणांना माहित नसेल........आपण त्यांना “दिबा” ह्या नावानेच ओळखतो.......पाटील साहेबांच पूर्ण नाव आहे श्री.दिनकर बाळू पाटील..........म्हणजेच आपले सर्वांचे दि बा पाटील.......


जन्म आणि शिक्षण:
पाटील साहेबांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जासई या गावात झाला. १३ जानेवारी, १९२४ साली कै.माधुबाई बाळू पाटील आणि कै.बाळू गवरू पाटील(आमचे पणजोबा) ह्या शिक्षक शेतकऱ्याच्या घरात झाला. कै.बाळू गवरु पाटील यांचा जासई गाव आणि आजूबाजूच्या गावात शिक्षणाचं महत्त्व प्रस्थापित करण्यात सिंहाचा वाटा आहे. पाटील साहेबांच शिक्षण अतिशय खडतर परिस्थितीत झालं. वकिलीच शिक्षण त्यांनी पुण्यामध्ये घेतलं. कै.आत्माराम बाळू पाटील(आमचे आजोबा) यांचा देखील पाटील साहेबांच्या शिक्षणामध्ये मोठा हातभार लाभला. म्हणतात ना जस,”प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते” पाटील साहेबांच्या अर्धांगिनी कै.सौ.उर्मिला दिनकर पाटील(आमच्या आजी) यांचा देखील पाटील साहेबांच्या जीवनकार्यात खूप मोठा सहभाग आहे. त्या स्वतः एक शिक्षिका होत्या. पनवेल येथील के.व्ही.कन्या विद्यालयाच्या वाटचालीमध्ये यांचा खूप मोठा सहभाग आहे.


राजकीय आणि सामाजिक:

(माझा जन्म १९९१ सालचा असल्याकारणाने मी पाटील साहेबांना पाहिलंय,येईकलय तितकंच मांडू शकतो.)
पनवेल नगराध्यक्ष,महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे ४ वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे २ वेळा खासदार अशी अनेक पदे पाटील साहेबांनी भूषविली. नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व.आमदार, खासदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अशी अनेक पदे भूषविणाऱ्या दिबांनी शेतकरी - कष्टकऱ्यांसाठी सारे आयुष्य झिजवले. कारावास पत्करला, पोलिसांचा लाठीमारही सहन केला. साधी राहणी, उच्च विचारसरणी असणाऱ्या या नेत्याच्या एका हाकेला हजारो- लाखोंच्या संख्येने ओ देणारे कार्यकर्ते आजही आहेत. शेतकरी कामगार पक्षातील एकेकाळचा हा मातब्बर नेता त्या पक्षातून बाहेर पडल्यानंतर काळ शिवसेनेत होता. मात्र, नंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त घेणेच पसंत केले. असे असले तरी शेतकरी - कष्टकऱ्यांवर ज्या ठिकाणी अन्याय होईल, तेथे ते कणखरपणे उभे राहतात. विधिमंडळातील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. “दिबां” उभे राहीले म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या गोटात शांतता पसरत असे. करारी आवाज आणि मद्देसूद बोलणे हे त्यांच्या विरोधकांमध्ये त्यावेळी घबराहट पसरत होती. रायगड आणि नवी मुंबईतील सामान्य आगरी जनतेबरोबर त्यांचे जिव्हळ्याचे संबंध आहेत. अखेरचा श्‍वास असे पर्यंत कष्टकऱ्यांसाठी लढणार, असा निर्धार दिबांनी केला केला होता, तो खरा ठरत आहे.


इतरांची राजकीय खेळी:
शेकापक्षाला रामराम ठोकून आजपर्यंत ज्या शिवसेनेला पाटील साहेबांनी विरोध केला होता त्याच शिवसेनेत १६ ऑगस्ट,१९९९ रोजी प्रवेश करून सर्वाना चकित केलं खरतर काही महिन्यापूर्वी जेव्हा अलिबाग मध्ये शेकापक्ष्याच्या काही नेत्यांनी शिवसेनेबरोबर युती केली होती त्यामुळेच पाटील साहेब नाराज होते. त्यावेळी पाटील साहेबांचा भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस(आय) मध्ये प्रवेश करण्याचा विचार होता. पण नंतर काय झालं हे आजपर्यंत मला देखील उमगलं नाही. पण इतकं नक्की सांगेन की रायगड जिल्ह्यात अतिशय वाईट अवस्थेत असलेल्या शिवसेनेला पाटील साहेबांनी पुन्हा उभी केली. जे शिवसेनेबाबत तेच शेकापक्षाबाबत. शेकापक्षाला पाटील साहेबांनी मोठे केलं होत. जोपर्यंत पाटील साहेब शेकापक्क्षात होते. तोपर्यंत शेकापक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रमुख राजकीय विरोधी पक्ष होता. पण आज रायगड जिल्हा सोडता शेकापक्षाच अस्तित्व महाराष्ट्रात इतरत्र कुठेही जाणवत नाही.


तर पाटील साहेबांच्या शिवसेना प्रवेशानंतर ज्या अतिशय खालच्या पातळीवरच्या राजकीय खेळी करण्यात आल्या त्यांचा उहापोह..........
१९९८ साली निवडून आलेलं सरकार १९९९ साली पडलं. त्यामुळे १९९९ साली लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या त्यावेळी पाटील साहेब शिवसेनेच्या तिकीटावर लढले.........पण तरीदेखील एक सांगतो की ही मते शिवसेनेची नव्हती तर ती फक्त पाटील साहेबांचीच होती.......कारण त्या अगोदर झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने रायगड मध्ये तिकीट दिलेला उमेदवार खूप मोठ्या मताधिक्याने पराभूत झाला होता......

तर त्या निवडणुकीतील आकडेवारी इथे देतो.........ही आकडेवारी अगदी जशीच्या तशी आहे. हव असल्यास बाहेर माहिती काढू शकता.


मा.श्री.लोकनेते.दि.बा.पाटील साहेब
मिळालेली मते-२,३१,२६४


दुसरा जिंकलेला उमेदवार
मिळालेली मते-२,७४,३६१

बाद झालेली(की केलेली?? मते)-७०,००० च्या आसपास.

त्या निवडणुकीच्या २ दिवस अगोदर पर्यंत पाटील साहेब विजयी होणार हेच सत्य होत.........पण आदल्या रात्री मतपेट्यांमध्ये गडबड...... आणि तिथेच निकाल लागला. पैसा जिंकला आणि आगरी माणूस हरला.............आणि अजूनही पैसा जिंकतोय आणि आगरी माणूस हरतोय..............

आणि ह्या निवडणुकीनंतर मात्र आम्हां पाटील कुटुंबियांची जितकी होईल तितकी अडवणूक करण्याचं धोरण या माणसांनी केलं. सत्तेचा गैरवापर करून आमच्या घरातल्या शिक्षक असलेल्या मुलींना एकतर नोकरीवरून काढून टाकले किंवा खूप दुरवर बदल्या केल्या. तरी आम्ही डगमगलो नाही पाटील साहेबांची साथ सोडली नाही. पण नंतर फायद्यापुरते आपले-आपले असणारे सर्वजण साथ सोडून गेले. मार्च २००४ साली लोकसभेच्या निवडणुकांची धामधूम होती, त्यावेळी तर कहरच झाला, कोणत्यातरी सत्तेची मस्ती अंगात असलेल्या आमदाराने जाहीर पत्रकार परिषदेत पाटील साहेबांविषयी अपशब्द वापरले. हा माणूस त्यावेळी लोकसभेला उभा राहिला होता आणि याला रायगड मधल्या जनतेनी त्याची लायकी दाखवून दिली. सत्तेचा माज असलेला हा माणूस जोरात आपटला. आत्ता माझ्याच बाबतीत सांगायचं तर मी लहान होतो. पण या सर्व गोष्टी पाहून मोठा झालोय. कधी आमच्या घरावर दगडफेक केली  तर कधी निवडणुका आल्या तेव्हा आमच्या बरोबर असणाऱ्या माणसांवर खोट्या केसेस टाकून त्यांना पोलिसांनी मारमार मारल्याच दृष्य मी डोळ्यासमोर पाहिलंय.....पोलिसांना शेठजीचे हफ्ते भेटत होते ना......!! त्यांचा गुन्हा काय होता तर आम्ही सर्व पाटील साहेबांबरोबर होतो?????????? मग आज तुम्हाला पाटील साहेब कशाला हवेत......लक्ष्यात ठेवा ते आमच्या सारख्या सामान्य माणसांचे आहेत.......कारण जेव्हा ते अडचणीत होते तेव्हा आम्ही त्यांच्या बरोबर होतो.........तुम्ही नव्हता........उलटपक्षी तुम्ही त्यांना त्रास दिलात.........स्वतःच्या पोराटोरांना आमदार खासदार बनविण्यासाठी यापुढे पाटील साहेबांच्या नावाचा वापर टाळावा........२३ मार्च,२०११ रोजी लढा होणार होता. पाटील साहेबांनी अगोदरच सुचना दिली होती की कोणत्याही प्रकारचा दंगा करायचा नाही..........तरीही एक माणूस ज्याला आमदारकीची स्वप्ने पडत आहेत आणि स्वताला कामगार नेता म्हणवून घेतो......ह्या माणसाने दंगे करण्याचे, पोलिसांना मारण्याचे भाषण अनेक ठिकाणी केले होते.......आत्ता १९८४ सालच उदाहरण देतो त्यात आमच्या जासई गावातील अनेक स्त्रिया सहभागी होत्या.....त्यांनी मला हे सांगितलं की पोलिसांनी गोळ्या मारायच्या अगोदरच हे नेते बेलपाड्याच्या डोंगरा मागून पळून गेले आणि आगरी शेतकरी जनतेने गोळ्या खाल्या.....आगरी जनतेची वाट लागायला हे असले नेते कारणीभूत आहेत.........निवडणुकांमध्ये ५०००-७००० एका मताला देऊन निवडणुका जिंकता आणि नंतर स्वतःच्या नावासमोर मोठमोठ्या पदव्या लावता..........या लोकांची हिम्मत इतकी वाढलीय की आगरी जनतेला विकत घेण्याच्या भाषा ते करू लागलेत.........


पाटील साहेबांचे विचार:
पाटील साहेब कोणत्याही देवाला मानत नाही. आमचा सर्वांचा पाटील कुटुंबियांचा जासईला एकच गणपती असतो. मी लहानाचा मोठा झालो पण पाटील साहेबांना कधी देवाच्या पाया पडताना पाहिलं नाही......पण हा देवाला न मानणारा माणूस आगरी जनतेसाठी मात्र देवापेक्ष्या कमी नाही..... महात्मा फुले, आंबेडकर ह्या विचारांचे पाटील साहेब आहेत.अंधारात पडलेल्या आपल्या आगरी समाजासाठी काहीतरी करण्याच्या उर्मीनेच आगरी समाज वाचला. आज आगरी समाजाला ओबीसी म्हणून ओळख पाटील साहेबांनीच दिली.जर ती ओळख पाटील साहेबांनी दिली नसती तर आपली परिस्थिती कोळीसमाजा सारखी असती. कारण आज कोळी समाजातील मुलांचे दाखल्याचे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आहेत. आज माझे अनेक कोळी मित्र जातीचे दाखले मिळविण्यासाठी हेलफाटे मारत असतात. पाटील साहेबांचे विचार मुक्त आहेत त्यामुळे अनेकांना ते आवडत नाहीत. त्यांचा कर्मकांडाला, अंधश्रद्धेला, आगरी समाजातल्या काही चालीरीतींना जसे मोठमोठे साखरपुढे, दारू पिऊन हळदी यांना विरोध आहे. बाहेरच्या माणसांना काय तर कधी कधी घरातल्या माणसांना ते पटत नाहीत. पण मी मात्र घरातल्या मंडळीना विरोध करतो. कारण पाटील साहेबांच्या त्या मुक्त विचारांना माझा पाठिंबाच असतो. डिसेंबर महिन्यात जेव्हा आमच्या आजींच(पाटील साहेबांच्या अर्धांगिनी) निधन झालं. तेव्हा पाटील साहेबांनी सर्व जुन्या प्रथांना विरोध केला. त्यांनी कोणालाही डोक्यावरील केस काढू दिले नाहीत, कोणत्याही प्रकारच श्राद्ध वैगेरे केलं नाही. या गोष्टी घरातल्या तसेच बाहेरच्या मंडळीना पचनी पडल्या नाहीत. याचं काळात एक अनुभव आला की, आगरी समाजातले विज्ञान शिकविणारे शिक्षक सुद्धा असल्या प्रथा पाळताना दिसून आले. या मंडळींच अस म्हणन आहे की, जर विधी केल्या नाहीत तर आत्मा अतृप्त राहतो वैगेरे. काहींही मुर्खासारख सांगतात. अनेकांनी अनेक भाकड कथा सांगितल्या पण जेव्हा मी त्यांना या गोष्टीमागच वैज्ञानिक, शास्त्रीय कारण विचारलं तर सर्वजण गप्प बसले. बाकी, मला आजोबांचे हे विचार पटतात त्यामुळे त्यांच्या विचारांना कोणी कितीही विरोध करो मला फरक पडत नाही. शेवटी लेख संपविताना सांगतोय की पाटील साहेबांनी आगरी समाजाला स्वताच्या हक्कांसाठी लढा द्यायला शिकवलं.त्यामुळेच आगरी समाज टिकला, वाढला, पुढे गेला आणि अजून पुढे जाणार. पाटील साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या विचारांचं गाठोडं घेऊन माझा प्रवास सुरु आहे. बघुया, माझा हा आगरी एकतेचा प्रवास कसा आणि कोणत्या कोणत्या रस्त्यावरून वाट काढत जातोय.............!!

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी  बाणा.
आगरी बोली-आगरी बाणा.

1 टिप्पणी:

  1. एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या घरात तू जन्मला आहे हेय खरच भाग्यच आहे .......अनि त्यपेक्षा तू त्यंच्या विचारांवर मोठा झालाय हे .....

    उत्तर द्याहटवा