आमोद पाटील-आगरी बाणा: मुलगी का नको?????????

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

रविवार, १७ एप्रिल, २०११

मुलगी का नको?????????


समाज इतका वाईट झाला आहे का? आपण काहीच करू शकत नाही का? श्रद्धा-अंधश्रद्धा यांच्या जोखडात अजून किती काळ स्वतःला बांधून ठेवणार? हे प्रश्न स्वतःलाच विचारा आणि स्वतःच उत्तर मिळवा. कारण दुसरा किती ओरडला, बोंबलला तरी आपल्याला फरक पडत नाही. आपण इतके निर्दयी झालोत का???? की स्वतःच्या मुलीला जन्म घेण्या अगोदरच मारून टाकतो?????


खालील आकडेवारी वाचा आणि जर आणि मनाला वाटलं तर चांगलच आहे. नाही वाटलं तर मग काय बोलणार??????ज्याची त्याची मर्जी.

मदर्स डे
ग्लोबलायझेशन झाले आहे.
’मदर्स डे’ चे फळहीतिच्या मातृत्त्वाला आले आहे.
लक्षात घ्या गर्भातील मुलगीहीभविष्यकाळाची आई असते !
न फिटणारे ॠण फेडण्याची आपल्याला उगीचच घाई असते !!

2011 च्या जनगणनेत सहा वयोगटापर्यंतच्या मुलींचा जन्मदर 30 ने घटला आहे. मात्र, नक्षलग्रस्त व मागास म्हणून शिक्का बसलेला गडचिरोली जिल्हा याबाबतीत पुढे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या जिल्ह्यात दरहजारी मुलींचे प्रमाण 956 एवढे आहे. या तुलनेत विकसित समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांमधील मुलींचे प्रमाण दरहजारी नऊशेपेक्षा कमी आहे. महिलांच्या सामान्य आकडेवारीत महाराष्ट्रात तीनने वाढ झाली आहे. 2001 मध्ये महाराष्ट्राचा आकडा हजार पुरुषांमागे 922 महिला असा होता; तो 2011 मध्ये 925 वर गेला आहे. सहा वर्षांपर्यंतच्या मुलींची संख्या महाराष्ट्रात 2001 मध्ये हजार मुलांमागे 913 होती. 2011 मध्ये यात 30 ने घट होऊन मुलींची संख्या 883 वर आली आहे. केंद्रीय जनगणना विभागाच्या माहितीनुसार, सहा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण मोठ्या शहरांत झपाट्याने घटल्याचे दिसून आले आहे. मात्र, गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात 1991 मध्ये एक हजार मुलांमागे 980 मुली, 2001 मध्ये 966, तर 2009 मध्ये 965 मुली आणि 2011 मध्ये 956 मुली असा जन्मदर आहे.2011 च्या जनगणनेत सहा वर्षांपर्यंतच्या मुलींच्या जन्मदरात राज्यात चंद्रपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील दर 945 एवढा आहे. त्या खालोखाल गोंदिया 944, रत्नागिरी 940, भंडारा 939, नंदुरबार 932, अमरावती 927 एवढा जन्मदर आहे. हे सगळे जिल्हे आदिवासी व मागास म्हणून ओळखले जातात. मुंबईसारख्या महानगरात मुलींचे प्रमाण हजारी केवळ 874, नागपूरमध्ये 926, नाशिकमध्ये 882, पुणे येथे 873 आणि औरंगाबाद जिल्ह्यात 848 एवढे कमी आहे.जिल्हानिहाय मुलींचे प्रमाण (दरहजारी) गडचिरोली 956, चंद्रपूर 945, गोंदिया 944, रत्नागिरी 940, भंडारा 939, नंदुरबार 932, अमरावती 927, नागपूर 926, रायगड 924, ठाणे 918, वर्धा 916, यवतमाळ 915, सिंधुदुर्ग व मुंबई 910, अकोला 900, नांदेड 897, नाशिक 882, सातारा 881, धुळे 876, मुंबई 874, पुणे 873, लातूर व सोलापूर 872, हिंगोली 868, परभणी 866, सांगली 862, वाशिम 859, उस्मानाबाद 853, औरंगाबाद 848, जालना 847, कोल्हापूर 845, बुलडाणा 842, नगर 839, जळगाव 829, बीड 801.


महिला मुक्तीच्या धोरणाचीघरा-घरात भक्ती केली जाते.
जन्माला येण्याअगोदरचकायमची मुक्ती दिली जाते.
महिला मुक्तीच्या धोरणाचीघराघरात विकृत तर्‍हा आहे !
मुक्तात्मे म्हणत असतील,
इथे जन्म न घेतलेलाच बरा आहे.

देशभरातील दर हजारी ८६ अजन्मा मुली आपणा सर्वाना आर्जव करत आहेत.. लिंगसमानतेचा आपला निर्देशांक वाढवावा, यासाठी त्यांचे आर्जव आहे. कारण त्यांच्या न जन्मण्यामागे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या, कळत-नकळत आपल्यातील बहुसंख्य जण कारणीभूत आहोत. लिंगचाचणी करणे, मुलीचा गर्भ नाकारणे याच्याशी आपला काही संबंध नाही, आपल्यात असे घडत नाही, असा बऱ्याचशा सुशिक्षित व सुसंस्कृत नागरिकांचा भ्रम आहे. आजही या अभिजन समाजात, ठायीठायी कळत-नकळत लिंगभेदमूलक वातावरणाची बीजे सामाजात पसरवली जात आहेत. त्याचेच भीषण प्रतिबिंब लिंगदराच्या विषमतेतून प्रकट होत आहे.लग्नाच्या मांडवात अजूनही मुलग्यांची पार्टी सरस मानली जाते. घरांघरांत पुरुषांना झुकते माप आहे. सणसमारंभात पुरुषांची पंगत आधी, बायका नंतर, अन्न जेमतेम असेल, तरी पुरुषांच्या पंगतीला वाढताना आग्रह, बायकांना कमी पडले तरी हरकत नाही, हे चित्र सर्रास दिसते. आणि भारतीय नारीला त्याची अजिबात खंत नसते, कारण स्वत:कडे कमीपणा घेण्याचे मूल्य तिच्या रक्तातच मुरलेले आहे. मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढणाऱ्या सामान्य माणसापासून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपर्यंत अनेकांना लग्नाची मुलगी हे ‘दायित्व’ वाटते.


सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश ग्यान सुधा मिश्रा यांनी स्वत:चा ताळेबंद जाहीर करताना दायित्वाच्या (लाएबिलिटीज) कप्प्यात ‘स्वत:च्या दोन लग्नाच्या मुली’ असे नमूद केले होते, ही बातमी आठवते ना? महिला दिनाचे संकल्पआयांनी संकल्प करावापून्हा खून करणार नाही.कुणाच्या सांगण्यावरूनगर्भातल्या लेकी मारणार नाही.बायकांनी ठरविले पाहिजेनवर्‍याला छळणार नाही.सासवांनीही ठरविले पाहिजेसूनांना जाळणार नाही.हक्कांपेक्षा जबाबदारीजोपर्यंत कळणार नाही !महिला दिनाचे औचित्यतोपर्यंत कळणार नाही !! तार्किकता आणि विज्ञानवाद ही मूल्ये शिक्षणातून आपोआप रुजत नाहीत, हे नव्या लोकसंख्या-आकडय़ांनी पुनश्च सिद्ध केले आहे.


यंदाच्या जनगणनेतून हाती आलेली आकडेवारी बघा- पुरोगामीत्वाचा गुणविशेष मिरवणाऱ्या व शिक्षणाचे जाळे सुस्थित असलेल्या महाराष्ट्रात १००० मुलग्यांमागे फक्त ८८३ मुली, म्हणजे ११७ मुलींचे गर्भ नष्ट केले गेले. राज्यात मुलींचा सर्वाधिक जननदर आहे गडचिरोलीत- ९५६. आणि हा जिल्हा साक्षरतेत खालून दुसरा- केवळ ७०.५५ टक्के साक्षरता. मुंबई शहरात साक्षरता आहे ८३ टक्के, आणि मुलींचे प्रमाण मात्र राज्याच्या सरासरीहूनही कमी- हजारी ८७४ मुली, म्हणजे १२६ मुलींना जन्माचा हक्क नाकारला गेला आहे. साक्षरतेचा निर्देशांक आणि लिंगसमानतेचा निर्देशांक यांच्यातील तफावतीचा हा दृश्य परिणाम!ही तफावत जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत लिंगदर समान होण्याच्या ध्येयाजवळ आपण सरकू शकणार नाही. कारण आता तंत्रज्ञान प्रगत होत आहे. सोनोग्राफीचे तंत्र आवाक्यात आलेले आहे. त्यापुढचे प्रीइंप्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस (पीजीडी) तंत्रज्ञान उपलब्ध आहे. गर्भलिंगनिवडीवर कितीही बंदी आणली तरी वाट्टेल त्या पळवाटा शोधल्या जात आहेत. मागास मनोवृत्ती आणि विकसित तंत्रज्ञान यांतील विरोधाभासामुळे हे साधले जात आहे.हरयाणाचे उदाहरण बोलके आहे. हरयाणाच्या शासन-प्रशासनाला फारच कानकोंडे व्हायला झाले आहे. तेथे मुलींचा जन्मदर सुधारण्यासाठी मोठी मोहीम राबवली जात असल्याचा दावा शासनातर्फे केला जात होता. पण तो प्रयत्न सपशेल फोल ठरला आहे. कारण हरयाणातील झंझारने नीचांक गाठला आहे- हजारी फक्त ७७४ मुली. या मोहिमेचे जनक, हरयाणाचे आरोग्यमंत्री नरेंद्रसिंह ज्या महेंद्रगढचे आहेत, तिथेही हीच गत. आता सफाई देताना ते म्हणतात की, झंझार नवी दिल्लीच्या जवळ आहे, तर महेंद्रगढला राजस्थानचा वेढा आहे, त्यामुळे आमचे प्रयत्न फोल ठरले आहेत. मुलींना नाकारू पाहणाऱ्या हरयाणातील जोडप्यांना शेजारी राज्यांचा आधार मिळतो आहे.. देशातील श्रीमंत जोडप्यांना तर थायलंड, मलेशियातील सुसज्ज पीजीडी क्लिनिक्स लिंगहत्येची सोय सहज करून देत आहेत. इच्छा तेथे मार्ग, दुसरे काय? थोडक्यात, या विकृत इच्छेची पाळेमुळे नष्ट करण्याला पर्याय नाही. ही विकृती समूळ नष्ट कशी करायची, याचा अभ्यास आता पद्धतशीररीत्या व्हायला हवा. जेथे मुलीचा गर्भ नाकारण्याचे प्रमाण आहे, तेथे तो का आहे, याच्या खोलात शिरावे लागेल. जेथे मुलींचा जन्मदर चांगला आहे, तेथेही पाहावे लागेल की, कुटुंबनियोजन कसे होतेय. म्हणजे मुलगा होईपर्यंत कितीही संतती झाल्या तरी चालतील, म्हणून मुली नाकारल्या जात नाहीत, असे तर नाही? किंवा गर्भहत्येचे तंत्र परवडत नाही, म्हणून नाईलाजाने मुली जन्मताहेत, असे तर नाही? लिंगसमानतेचा निर्देशांक नेमका कसा काढायचा, त्याचे निकष कोणते, लिंगसमानता रुजवण्यासाठी काय करावे लागेल- अशा अनेक प्रश्नांवर अभ्यास करून तोडगे काढावे लागतील. तशी धोरणे बनवावी लागतील. दुर्दैवाने आपण अलीकडे समाजशास्त्र या विषयाची उपेक्षा केली आहे. समाजशास्त्र किंवा ह्युमॅनिटीज या शाखेकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण रोडावत आहे. सद्यस्थितीत आपल्याला असा अभ्यास करणारे समाजशास्त्रज्ञ हवे आहेत. समाजाच्या मानसिकतेचा अभ्यास करून योग्य उपाय योजल्याशिवाय मुलींच्या गर्भहत्येचा प्रश्न सुटणार नाही. कायदा आवश्यक असतो, पण कधीच पुरेसा नसतो. त्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व बाजूंनी प्रयत्न होत नाहीत, तोपर्यंत कायदा प्रभावी ठरू शकत नाही. गर्भलिंग निवड आणि हत्या विरोधी कायद्याला आपण सर्व बाजूंनी पोषक वातावरण कसे तयार करू, त्यावर त्याचा प्रभाव अवलंबून आहे. देशभरात विविध ठिकाणी चाललेल्या ‘सेव्ह गर्ल चाईल्ड’ अभियानांतून काय साध्य झाले, आणखी काय करायला पाहिजे, यांचा सखोल अभ्यास झाला पाहिजे. ‘तुम्हाला मुलगी नको असली तरी तिला जन्मू द्या, आम्ही तिला सांभाळू’ असा संदेश तरुण जोडप्यांमार्फत व अनाथालयांद्वारे जाईल, अशा जाहिराती कराव्या का? दृश्यमाध्यमांच्या प्रभावाचा उपयोग करून मुलींच्या स्वागताचे संदेश प्रसृत करता येतील का? आता कल्पकतेने आणि जिद्दीने नवे प्रभावी उपाय योजावे लागतील. सुजाण समाजाला लिंगविषमतेचे कंगोरे असलेले जुने शिष्टाचार रद्द करून, नवे लिंगसमान शिष्टाचार जाणीवपूर्वक रुजवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या विषयाशी आपण सर्व जण संबंधित आहोत. लिंगसमानता हा जोपर्यंत प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय बनत नाही, समानतामूलक वातावरण आपण समाजात निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत मुलींचे या भूमीत सहर्ष स्वागत होणार नाही...
हे या अजन्मा मुलींचे आर्जव आहे. त्या आपल्याला स्वागतासाठी साकडे घालत आहेत- रिकाम्या झालेल्या त्यांच्या उदर-घरांतून!


होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
एरव्ही बोललेही नसते,
पण माझ्या विचारांचेतुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय.
चक्क माझी देवी बनवूनमला फोटोमध्ये फ्रेम केलेय.
जमेल तेंव्हा,जमेल तसेमाझे सोईनुसार कौतुक करता.
खरे दु:ख याचे की,
तुम्ही मला गृहित धरता.
त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतेय..
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा,
सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात.
ज्या माझ्या वारसा सांगतात,
त्याच बेईमान झाल्यात.
असे होईल,मला काय माहित?
मला कुठे पुढचे दिसले होते?
एका वेगळ्या जगासाठीमी शिव्याशाप,दगडाबरोबर शेणही सोसले होते.
तुमच्याच शब्दात सांगायचे तररात्रंदिवस घासले होते.
आज मी कसले घाव झेलतेय?

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
ही कही उपकाराची भाषा नाही.

आजच्या बाजारू समाजसेवेसारखाहा बेंडबाजा अगर ताशा नाही.

मी विसरून गेले होते,

आम्ही कोणकोणते विष पचवले आहे.

हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्माला डिचवले आहे.

म्हनूनच तुमच्या बहिर्‍या कानीहे गार्‍हाणे घालतेय.

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

मावल्यांनो,लेकीबाळींनो.तुम्ही शिकलात सवरलात.

पण नको तेवढ्या शहाण्या झालात.

विकृत स्त्रीमुक्तीच्याप्रत्येकजणी कहाण्या झालात.

माझा वारसा सांगून,स्वार्थासाठी राबता आहात.

या सगळ्या संतापापुढेआज मी भिड्भाड भुलतेय.....

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

बाईपणाचे दु:ख काय असते?

मी तुमच्यापेक्षा जास्त भोगलेय.

आरशात पाहून सांगा,

मी सावित्रीच्या शब्दाला जागलेय?

तकलादू आणि भंपकस्त्रीमुक्तेची नशातुम्हांला आज चढली आहे.

कपडे बदलेले की,पुरोगामी होता येते,

ही फॅशन तुम्ही पाडली आहे.

शिकली सवरलेली माझी लेकसंस्कृतीच्या नावाखालीनाकाने कांदे सोलतेय..

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

मान नको,पान नको,आमचे उपकारही फेडू नका.

किर्तन-बिर्तन काही नकोझोडायची म्हनूनभाषणंही झोडू नका.

वाघिणीचे दूध पिऊनकुत्र्यांसारखा गोंडा घोळीत आहात.

धर्म-संस्काराच्या नावाखालीटाकाऊ परंपरा पाळीत आहात.

तुमच्या

चिपाडलेल्या डोळ्यातम्हनून हे अंजन घालतेय...

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

तुम्हांला

आज काहीसुद्धा सोसायचे नाही.

काढणारे काढीत आहेततुम्हांला शाळा काढीत बसायचे नाही.

तुम्ही फक्त पुरोगामित्त्वाचा खरा वसा घ्यायला पाहिजे.

एखादा दुसरा ’यशवंत’ शोधूनत्याला आधार द्यायला पाहिजे,

शाळा कॉलेजचे पिक तरहायब्रिडसारखे डोलतेय.....

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

मनमानी आणि स्वैराचारालापुरोगामित्त्वाचे लेबल लावणे,

यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही.

फक्त नवरे बदलणे,घटस्फोट घेणे,ही काही स्त्रीमुक्ती नाही.

माझी खरी लेक तीच,जी सत्यापूढे झुकत नाही.

सावित्री आणि ज्योतिबांपूढेआंधळेपणाने माथा टेकत नाही.

माझी खरी लेक तीच,

आम्हांलासुद्धा नव्याने तपासूनस्वत:ची भाषा बोलतेय.

आमचाही वसातावून-सुलाखुन पेलतेय.....

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

आमच्याच मातीत,

आमच्याच लेकरांकडूनदूजाभाव बघावा लागला.

माझा फोटो लावण्यासाठीहीसरकारी जी.आर.निघावा लागला.

आपल्या सोईचे नसले की,

विचारांकडेही कानाडॊळा होतो.

समाजासाठी काही करायचे म्हटले की,

पोटात प्लेगचा गोळा येतो.

ज्योतिबांशिवाय सावित्री,

सावित्रीशिवाय ज्योतिबा,

समजून घेता येणार नाही.

विचारांची ही ज्योती,

एकटी-एकटी नेता येणार नाही.

सुनांना लागावे म्हणून तरलेकींनो,

तुम्हांला बोलतेय....

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय...


आत्ता तरी आपण स्वतःला बदलणार का?

की चाललंय तस चालू देणार????

येणारा नवीन जीव तुमच्या प्रयत्नांची वाट बघतोय...............

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा फेसबुक संघटना.
आगरी बोली-आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा