आमोद पाटील-आगरी बाणा: आगरी भाषेतील कथा(Agri Bhasha-Agri Boli-Agri Sahitya)

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

शनिवार, २४ सप्टेंबर, २०११

आगरी भाषेतील कथा(Agri Bhasha-Agri Boli-Agri Sahitya)


मारती तुकाराम भोईर-आद्यात्मिक गुरु

वय २७, रंग काला ,कडक हड्डी, बेरकी,

गूनईशेश : पक्का बेवडा

स्कील्स : अख्खा खंबा मारून ताट उबा रहानार

माजा चुलतभाउ. अंगात रगत कमी दारु जास्त. आज्याचीच देन आनी म्हुन आज्याचा लारका.
आज्यान ल्हानपनापासन बरोबर न्हेल्ता. आज्या टाईट झाल्याव उरलेली हा संपवाचा.
पन पक्का हजरजबाबी.यकदा क बोलाय लागला क आयकाचा न्हाई. कूनालाबी आरवा करनार.

यकदा सरपंचान त्याला समझवला व्हता "बाबा नूस्ता दारू पीवुन घरान परून रहातस जरा घरभायेर पड
मंग समझल दुनया क हाय ती" तर हा म्हन्ला
"सरपंच जरा तुमी बी थोड थोड घरान रहात जा. बरच काय समझल तूमाला"

तर असा हा मारत्या

रोज दारु पीउन येनार न घरात तरास देनार. घरची सगली कंटालली बोल
ह्येचा क कराचा. ह्याची दारु कशी सोरवाची ? सगला लफराच झाला व्हता

येवड्यान खबर मिल्ली क बाजूचे गावान येका सादुबुवान आश्रम खोललाय (कंपनी खोलतान तसा?)
आनी सगल्यांची दारू बी सोरवतो त्यो. मंग काय सगल्यांनी ठरवला क मारत्याला सादुबुवाकड न्हेवाचा. माजे बा न जीम्मेदारी झेतली
न येके दीशी दोगव सादुबुवाकड नींगाले. रस्त्यावरच गूत्ता. मारत्या म्हनाला " काकूस उद्यापासन माजी दारू सूटनार. आज शेवटची पीवन झेवदे." रडाय लागला. तसा बा पातल झाला
"जा पोरा जा आज काय ता करुन झे."

मारत्या सूसाट गुत्त्यावर.धा मिन्टात टाईट.
दोगव आश्रमात पोचले.

मारत्या हालेडूले.

आरती झाली. समोर आरतीच ताट आल. मारत्यान ताटावरशी हात फिरवला तरी आरती वाला उबाच.
"क हाय र बाल्या ? " मारत्यान ईचारला

"दोन रूपए टाका आरतीत." मारत्यान बा कड बगीतल. बा म्हन्ला "अरे टाकाव लागतान. नेमच हाय तसा"
मारत्या भिरभिरला. पाकीटातून शंबराची नोट काडली घडी करून चीमटीत धरली आनी जूगारात शो द्याला उडीवतान तशी ताटान ऊडवली
"पूरे म्हैन्याचे झे. नंतर मागाचे नाय क बोल्तो ?"

आरतीवाला चीप मागारी गेला

सादुबुवाकड नंबर आला
"म्हाराज ह्याची दारू सोरवा. उपकार व्हतील" बा

"बाला जवल ये"
मारत्या सादुबुवाजवल गेला न तेला जांबई आली . सगला वास म्हाराजांचे तोंडाव

म्हाराज धा मिन्ट समाधीत

म्हाराज समाधीतून भायेर आले न काशाला म्हन्ले "हयाला पंदरा दीवस आश्रमात ठीवा. ह्याची दारु सोडाला जरा येल लागल"
मी पंदरा दीवसांनी येतो म्हाराज" बा घरी नीगुन आला

दुसरे दिवशी सकाली म्हाराजांनी मारत्याला बोलवला.
"बस. अरे दारू वाईट आस्ती. दारुनी लोकाचा आयुक्श बरबाद होत. तू आद्यात्मात रस घे, ध्यान कर, त्यानी तुज आयुश्य उजळुन निघेल."

"म्हाराज मना सांगा ध्यान करने चांगल कशावरून ?" मारत्या
"बाला मी ध्यानाचा अनूभव घेतलाय. स्व अनुभवानी सांगतोय." म्हाराज

"मंग दारूचा अनूभव न झेता कस सांगताव दारू वाईट म्हुन ? ध्यानात न दारूत कायव फरक नाय." मारत्या

"अरे ध्यान करून तू देवाशी संवाद साधतोस."
"दारुन पन. डायरेक कोन्ट्याक"

"ध्यानाने संसारात विरक्ती येते"
"दारुन पन. कायव ग्वाड लागत नाय"

"ध्यानाने लोभ, मत्सर ई. विकार दूर होतात"
"दारुन पन. मना दारू मिल्ली क मंग काय बी नको अस्त."

"ध्यानाने माणूस सत्याकडे जातो"
"दारुन पन. येकदा क दारू पोटान गेली क कोनीबी खोट बोलूच शकत नाय. पन मी क म्हन्तो तूमी आदी दारू पीवून बगा मंग सांगा. मी सोरतो."

"आस म्हनतोस ? ठीक आहे. तू घेऊन ये. मी अनूभव घेतो न मग सांगतो."
मारत्यान खीशातन चपटी कारली.
"मना म्हाईत व्हत, झेउनच आलुय."
म्हाराजांनी येक घोट झेतला न जोरात ठसका लागला.
हलू हलू. चन घ्या
म्हाराजांनी चने खाल्ले. "हूश.. बर वाटल" म्हाराज
आवो चन आस नाय खाच , यक चना तोंडान टाकाचा न साल पायाजवल थुकाचा.
प्रोसीजर शीकता शीकता म्हाराजांनी चपटी संपवली.
"आगदी सरगात गेल्यावानी वाटतय रे. उद्या पन अनूभव घेईन म्हणतो."

...
...
...

पंदरा दीवसांनी बा आश्रमात शीरला. नीस्ता दारूचा भपकारा. डावे सायटीला भक्त मंडली भट्टी लावन्यात जूडली व्हती न आतले खोलीन मारत्या आनी म्हाराज गल्यात गला घालून
डायरेक हॉटलाईनवर देवासंग काय बाय बरळत व्हते.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

1 टिप्पणी: