आमोद पाटील-आगरी बाणा: आगरी नेत्यांचा खोटेपणा...................!!!!!

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

रविवार, १८ सप्टेंबर, २०११

आगरी नेत्यांचा खोटेपणा...................!!!!!

२३ मार्च, २०११ रोजी करल फाटा येथे प्रकल्पग्रस्तांच्या विराट आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त आगरी शेतकरी या लढ्यात सहभागी झाले होते. नवी मुंबई परिसरातील अनेक गावांमध्ये आणीबाणीची परिस्थिती होती. जर त्या दिवशी हा लढा झाला असता. तर संपूर्ण उरण, नवी मुंबई, पनवेल परिसर पेटला असता. इतका जनसमुदाय त्यावेळी जमला होता. पोलिसांनी देखील नवी मुंबई पोलीस मुख्यालयात किती पोलीस फाटा तयार ठेवला होता..........याचे प्रत्यक्ष फोटोच मला मिळाले होते..........त्यांनी पण लय डेंजरस तयारी करून ठेवली होती..............जरी हे आंदोलन शांततेने झालं असत तरी काहीतरी मोठा प्रकार झालाच असता..........इतकी जबर तयारी पोलिसांनी करून ठेवली होती..............मावळ येथे झालेला प्रकार करल येथे झाला असता...........

पण आदल्या रात्री माशी शिंकली...................स्वतःला आगरी समाजाचे तथाकथित पुढारी समजणारे इवले-बावळे लोक, तथाकथित कामगार नेते, तथाकथित भावी आमदार, व्यवस्थापक मंडळावर असणारे अश्या अनेक पदव्या मिरवणारे लोक ज्यांचे जे.एन.पी.टी. आणि सिडको प्रशासनाशी अगदी जवळचे आर्थिक संबंध आहेत. पण तमाम आगरी जनतेला ओरडून सांगणार की आम्ही तुमचे नेते आहोत. पैशे फेकून निवडून येणारे हे लोक यांना काय पडलंय सामान्य जनतेशी?????? स्वतःच्या कंपनीला नवीन विमानतळाचे टेंडर मिळावे म्हणून हे सर्व बोके सिडकोच्या दारात लायनीत उभे आहेत. ही माहिती आपल्याला नसते, पण घाटावरून आलेल्या बिल्डरांना मात्र बरोबर असते. कारण या बोक्याना ते जवळचे वाटतात. अश्या काही बिल्डर लायनीतल्या मंडळींकडून ही माहिती मिळाली.

तर हे असे बोके दिल्ली वरून लेखी आश्वासनाचे ढोंग घेऊन आले. आणि आम्हांला वाटले आमचा विजय झाला. आणि आम्ही लागलो आनंदाने उड्या मारायला. पण हे स्वप्न देखील हवेत विरले. पुन्हा एकदा गद्दारी. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत अशी एकदा नव्हे-तर दोनदा गद्दारी झाली. आणि गेली २५-३० वर्षे कितीदा झाली याचा काही हिशोब नाही. मा.श्री.सुनील तटकरे यांनी दोनदा लय दमदार भाषण दिले आहे याचं वर्षात...........पहिल्यांदा १६ जानेवारीच्या कार्यक्रमात जासई येथे आणि दुसऱ्यांदा २३ मार्च च्या आंदोलनाच्या वेळी करल फाटा येथे............दोन्ही ठिकाणी मी हे भाषण ऐकायला उपस्थित होतो...............त्यामुळे कोण काय-काय बोललं त्यावेळी हे पुरेपुरे माहिती आहे....................काय तर म्हणे................दीड महिन्याच्या आत सर्वाना १२.५% (साडेबारा टक्के) भूखंड वाटप केले जाईल...............अहो पुढारी..............दीड महिने तर केव्हाच संपले................८ महिने झाले या गोष्टीला...............कुठे गेले तुमचे दिल्ली वरून आणलेले लेखी आश्वासन..............आणि कुठे गेली स्टेजवरच्या तथाकथित आगरी ????? श्रीमंत बोक्यानी केलेली भाषणे.................शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन ४० वर्षे झाली...............शेतकरी गरीब राहिला...............पण त्यांनी दिलेल्या मतांवर तुम्ही पुढारी झालात.............आणि बीएमडब्ल्यू काय, मर्सिडीज काय.................बंगले काय...............निवडणुकांमध्ये फेकेलेले कोट्यावधी रुपये काय...............कुठून आलं हे सर्व?????????? स्वतःचे कष्ट की...............दलाली??????? तुमच्या सर्वांची निवडणूक अर्जात भरलेली सर्व माहिती आहे आमच्या जवळ.............किती खोटे बोलाल???????? निवडणूक अर्जात पण गोलमाल.............???????? आणि तरीही तुम्ही लोक आमचे जनप्रतिनिधी???????

पाटील साहेब तुम्हांला एक सामान्य आगरी तरुण जो इंटरनेटवरील आगरी तरुणांचा एक छोटासा आवाज आहे......................या नात्याने फक्त एकच सांगणे असेल की, ही नेते मंडळी तुमच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे उद्योग तर करत नाही ना???????? याची जरा खात्री करून घ्या. याचं लोकांनी अनेकदा आपल्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. तुमचं मन मोठ आहे.........तुम्ही ही गोष्ट विसरून त्यांना माफी केली असेल..........पण आमचं काय???????????? कारण या लोकांच्यामुळे आपली गावे तुटली गेली कायमची...........आजही निवडणुका असल्या की, भांडण होतील की काय याची भीती असते. आपलीच माणसे आपल्याचं माणसांशी भांडत आहेत................डोकी फोडत आहेत...............का तर..............यांचा नेता मोठा.............की त्यांचा नेता मोठा...............???????? निवडणुका झाल्या की रात्री रसद येते...............सगले टाईट...............मग ना त्यांना नाती-गोती यांच भान राहत.................अजून किती दिवस...................या असल्या चोर बोक्यांसाठी आपल्या लोकांची डोकी फुटणार आहेत?????????? किती दिवस आपला समाज बदनाम होत राहणार आहे...................?????? काही मुठभर लोकांच्या स्वार्थासाठी किती दिवस आपला समाज भरडत राहणार आहे.............???????? यांच्या सात पिढ्यांच्या भल्यासाठी आपला समाज का वाया जातोय?????? मला माहिती आहे की हे प्रश्न तुम्ही वाचणार नाही आणि मी स्वतः देखील तुम्हांला प्रत्यक्ष भेटीत असले प्रश्न विचारणार नाही...............तरीदेखील.................ही अशी गद्दारी पाहून हल्ली राग येत नाही.................सवय झालीय.............पण काहीतरी होतंय...............कुठेतरी खदखदतंय..................कारण अश्या लोकांना आपला समाज निवडून देतो..............पैसे घेऊन म्हणा अथवा इतर काही गोष्टी असतील त्यामागे.................अजून किती वर्ष सहन करायची ही गद्दारी?????????

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा