आमोद पाटील-आगरी बाणा: आगरी माणसासारखीच त्याची आगरी भाषा AGRI BHASHA

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०१०

आगरी माणसासारखीच त्याची आगरी भाषा AGRI BHASHA



आगरी माणसासारखीच त्याची आगरी भाषा

"गल्यान्‌ साखली सोन्याची ही पोरी कोनाची' या लोकप्रिय गाण्याशिवाय आजही महविद्यालयातील विद्यार्थ्यांची पिकनिक पूर्ण होत नाही. या गाण्याचे बोल जसे उच्चारासाठी सहज आणि सोपे वाटतात. हे गाणं आहे आगरी बोलीतलं. ही बोलीभाषा असली, तरी ती भारदस्त आणि कणखरही आहे. या भाषेवर कोळी आणि कोकणी भाषेचा काहीसा प्रभाव जाणवतो. ९०च्या दशकापासून समजातील बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागले. त्यामुळे आता समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित आणि उच्चपदावर आढळतात. सध्या खेडेगावात आगरी भाषा बोलली जाते. पण शहरातील सुशिक्षित मंडळी आगरी भाषा अभावानेच बोलतात. ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यातील मूळ समाज आगरी आहे.
आगरी शब्दातील मूळ शब्द आगर. आगर म्हणजे भात, भाजीपाला, फुले, मीठ तयार करण्याची जागा. या शब्दावरून आगर पिकविणारा तो आगरी. भातशेती हे या समाजाचे मुख्य उद्दीष्ट. समुद्र, खाडी किनारी समाज मोठ्या संख्येने आहे. आगरी लोकांना कुणबी, खारकी अशीही विशेषणे आहेत. आगरी समाजातील शेतकऱ्याला कुणबी या अर्थाने ओळखले जात असे. जुन्या पुस्तकांमध्ये आगरी समाजाचा उल्लेख कुणबी म्हणून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारावरील मावळे हे आगरी, कोळी समाजातील होते. पुस्तकांमध्ये आरमारकरी, तराकेवाले असा आगरी समाजाविषयी उल्लेख आहे. अलिबाग, पालघर, डहाणू परिसरातील आगरी समाजाला खारपाटी म्हणूनही संबोधण्यात येते. समुद्र किनाऱ्यापासून दूर राहणाऱ्या समाजाला उथळी म्हटले जाते. आगरी समाजाच्या शुद्ध आगरी, दास आगरी व वरप आगरी अशा पोटजाती आहेत. केवळ मिठाची शेती करून उपजीविका करणारे ते मीठआगरी. पिढ्यान्‌ पिढ्या ढोल वाजविणारे ते ढोल आगरी. बागबगिचे, उद्यानांमध्ये काम करणारे ते जस आगरी म्हणून ओळखले जातात. दास आगरी समाज पालघर तालुक्‍यात आढळतो. उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता प्राप्त केलेला आगरी समाज समाजाविषयी अभिमान बाळगून आहे. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरानुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती ही भाषा बोलतात.
नव्या पिढीला आगरी भाषेविषयी औत्सुक्‍य वाटते. तसेच काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बुशकोट, डोक्‍यावर टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफ पॅन्ट, बुशकोट, टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. लग्न समारंभातील हळदीची आणि परंपरागत आगरी भाषेतील गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. कारण आगरी भाषेत लग्न समारंभाविषयीची माहिती या विशिष्ट गाण्यामधून कळायची. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकाला मिळत नाहीत. समाजातील बहुतेक मंडळी वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने शद्ब उच्चार आणि बोलण्याची ढब बदलली आहे. पूर्वी कुटुंबातील महिलेला किंवा बहिणीला "बाय' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "दादुस' म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला' म्हणून हाक मारले जायचे. "इच्या बना' ही शिवी-वजा विशेषणाचा सऱ्हार्स वापर केला जायचा. मात्र आता त्याच्यावर काहीसे र्निबंध आल्याचे जाणवते. किंवा हे वाक्‍य विस्मरणात गेले. आगरी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोली भाषेतून जाणवतो. तर आगरी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोली भाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोली भाषा काळानुरूप बदलत आहेत. नवा बदल या मंडळींच्या अंगवळणी पडत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आगरी समाज ग्लोबल झाला आहे.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

1 टिप्पणी: