आमोद पाटील-आगरी बाणा: ग्रामदेवता जासई गाव

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

शुक्रवार, २२ एप्रिल, २०११

ग्रामदेवता जासई गाव

जोगेश्वरी माता
गावचा मठ


देव्हारा-कुलदैवत खंडोबा

देवी मंदिर(जासई नाका)

ठिकाण:
गाव-जासई,तालुका-उरण,जिल्हा-रायगड.
(उरण-पनवेल रोड, उरण-नवी मुंबई रोड,राष्ट्रीय महामार्ग-४ब)

Place:
At/Post:Jasai,Tal-Uran,Dist-Raigad.
(Uran-Panvel Road, Uran-Navi Mumbai Road, NH-4B)

जासई गावची जत्रा:चैत्र कृष्ण पंचमी
दरवर्षीप्रमाणे यंदाही आमची जासई गावची जत्रा उस्ताहात पार पडली. दरवर्षी चैत्र कृष्ण पंचमीला जासई गावची जत्रा असते. यावेळी इंग्रजी कालदर्शिकेप्रमाणे आमची जासई गावची जत्रा शुक्रवारी दिनांक २२ एप्रिल रोजी अतिशय आनंदी वातावरणात संपन्न झाली. गावात राहणाऱ्या तसेच गावाबाहेर राहणाऱ्या सर्व जासईकरांनी जत्रेचा आनंद लुटला. सर्व ग्रामस्थांनी गावातील ग्रामदेवताना नारळ चढवून आपल्या परिवारावर, जासई गावावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी मनोभावे प्रार्थना केली.

गावची जत्रा:ऐक्याच प्रतिक
तस पाहायला गेल्यास अनेक धर्माचे, जातीचे, पंथांचे लोक राहतात. ही सर्व धर्माची, जातीची मंडळी अगदी आनंदाने जत्रेत सहभागी होताना दिसून येतात. काही मंडळी पोटापाण्यासाठी दूर घाटावरून, काही मंडळी वेगवेगळ्या राज्यातून आमच्या जासई गावात राहायला आली आहेत. अशी मंडळी देखील जत्रेत आनंदाने सहभागी होताना दिसून येत होती. त्यांच्या घरातील स्त्रिया देखील गावातील स्त्रियांच्या जोडीने मठावर देवीची पूजा करत होत्या. अनेक पाहुणे मंडळी देखील जत्रेनिमित्त गावात आली होती, माहेरवाशिणी देखील जत्रेनिमित्त गावात आल्या होत्या. त्यामुळे घरोघरी पाहुण्यांची गजबज दिसून येत होती आणि आमचे जासई ग्रामस्थ देखील पाहुण्यांचा मान राखत होते.

मन गावातच
कामानिमित्त जरी पनवेलला राहत असलो, तरी मन मात्र नेहमी गावातच रमत. शेवटी काय, गाव तो गावच असतो. माझ्यासारखे अनेक आहेत. जे गावात राहत नाहीत पण त्यांची गावाशी असलेली नाळ त्यांनी तुटू दिलेली नाही. तर अशी असते आमची जासईची जत्रा. दूर असणार्यांना गावाची आठवण करून देणारी, जवळ असणाऱ्यांना अधिक जवळ आणणारी, सर्व जाती, धर्मांना सामावून गावाचा आगरी बाणा जपणारी....................

आपलाच,
आमोद पाटील.
संपादक-आगरी बाणा फेसबुक संघटना.
आगरी बोली-आगरी बाणा.
आम्ही जासईकर.

२ टिप्पण्या: