आमोद पाटील-आगरी बाणा: आगरी भाषेतील कथा-३( AGRI BHASHA)

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०११

आगरी भाषेतील कथा-३( AGRI BHASHA)


तू अनाडी मै खिलाडी..........................

आर शित्याला पोलीसांनी धरलाय. जाम मारतान बग. बारक्या बातमी झेउन आला.
शित्या. सिताराम म्हात्रे. यकदम झोलर मानुस. आखोंशे सुरमा नीकालनेवाला. तो न्हेमी म्हानायचा ' ऊधारी ने वलखी वाडतात'.
गणा पाटलाची दोन येकर जमीन त्यान सात जनांना ईकलीवती. दुनीयेची ऊधारी आंगावर.

यकदा माजे घरी दोगा जनांना झेउन आला. माज घर तस रोडटच हाय. वटीवर बसवल न घरात आला .
आयला म्हनला 'लांबन आल्यात पावनं. गुळपानी दे. पाच मिन्ट बसतील न जातील.' गेला मागल्या दारानं.
धा मीन्ट जाली पंदरा मीन्ट, पावनं ऊटाया मागनात.
आय म्हनली 'बाबांनो क काम हाय क तुमच ?' तर म्हनल क 'शित्याला पाटवा. त्याला पंचवीस हजार दिल्त ते आनाला आत गेलाय.'
आय नी कपालावर हात मारला. 'आवो तो त कवाचा गेला हिथन. तूमाला टोपी घातली बगा.'

आश्या मान्साला पोलीसांनी धरला म्हनल्यावर त्यान कईतरी मोटाच हात मारला आसल ह्याची खात्रीच व्हती. पन गावचा मानुस जेल मदी हाय बोल्ल्यावर सगलीजन धावली. सरपंचान जामीन दिला न यकदाचा सोरवून आनला शित्याला.
आक्ख गाव ईचारत व्हत क केलस म्हुन पन भाद्दर तोंडातन यक शबुत दिकील काडीना.
शेवटी शेट्टीआन्नाच्या बार मदे बसवला मी न सूर्‍यान. तवा येक क्वार्टर पोटान गेल्यावर त्यान तोंड ऊंगडल न श्टोरी सांगतली.

'पून्याला गेल्तो कामासाटी. काम जाल्यावर सांजचा सारगेटला आलु यस्टी पकराला. वाटला जरा चा प्यावा म्हुन स्टालवर गेलो.
चा झेतला. मागुन हाक आयली 'क पाटील कस काय? '
माग बगतो त यक चालीसचा चश्मेवाला उबा वता. 'मी पाटील नाय मी म्हात्रे.' मी बोल्लो .' आवो तेच ते म्हात्रे. मना नायव वलीकल? मी पाटील, तूकाराम पाटील. आता वलखलाव?
'नाय क आटवत नाय बगा.'
'क बोलाच आता. कूट मूंबयला नीगालाय?'
' नाय पनवेल.' मी
आर तिज्या मी बी पनवेलाच चाललुय ना. चला माजेबरोबर. माजी क्वालिस हाय. डायवर बी. क बोल्ता?'
माज्या डोक्यान चक्रा फिरली. टिकटीच पैस वाचल. पनवेल पावत क्वालीस नी. वलख दाकवालाच पायजे. मी बी प्लान केला.
'तुमी माज्या लग्नाला आला वता क?'
'तर क वो? आता वलखलाव बगा. तूमाला आयरात स्टीलची टाकी नवती क दिल्ली ?'
'हां हां बरोबर, जरा ईसरलूच होतू बगा. ' मी ईसरल्याच नाटक केल. आपल्याला क हाय. फुकट जावाला त मीलल.
'मंग, आता कस? चला चला जाऊया आता. '
गाडीन जाउन बसलू. डायवर न गाडी चालू केली. एसी लावला. यकदम थनगार तीच्याआयला.
ईकडच्या तीकडच्या गप्पा मारता मारता पनवेल कदी आल कल्लच नाय. रात झालती.

पाटलान गाडी डायरेक थांबवली मीलन बार समोर.
' पावन्यांनु चला जरा दोन घोट झेव. रातची पोटान गेलेली बरी आसते.'
पून्यापासन गाडीतून फुकाट आनी वर दारू ? बेवडा मागतो बॅगपायपर देव देतो शीग्नेचर ? क्या बात हय !
गटागट यक क्वार्टर मारली. पाटलाचा यकच पेग झाल्ता. कंपनी म्हुन चवता मारला.
पाटील परत आग्रव कराला लागला. त्याला म्हनल आज नको. आज तब्येत नरम हाय माजी.

पाटलान बील दिल्ल न फुड नींगालो. मोबाईल च दूकान आल. पाटील म्हनला 'जरा येल हाय ना. नविन मोबाईल घ्यायचाय. येता कं?'
आपन नाय कस म्हन्नार. गेलो त्याचेसोबत. त्यान यक म्हागाचा मोबाईल काडला. मला दाकवला.' दादुस कसा हाय मोबाईल? आवरला क?'
मी म्हनल ' न आवराला क झाल ? मस्त हाय. झेऊन टाका.'
'कती रूपये रं ?' त्यान दुकान्दाराला ईचारल.
'पस्तीस हजार.'
माजे डोल्यासमोर अंदार. तोच पाटील बोल्ला आनकी यक काडा यातला.

दोन मोबाईल झेतल यका फटक्यात. कार्ड टाकली. मला म्हनला 'दादुस तू थांब जरा हीतच. मी रेंज हाय क बगून झेत भायेर.' आनी भायेर गेला.
पाच मिन्ट झाली , धा मिन्ट झाली पाटलाचा पत्ता नाय.
'वो तूम्हारा भाई कीधर गया?'
'वो मेरा भाई नाय. मय उसके गाडीमे आया हाय.उसको नई जानता.'
फाडकन कानाचे खाली जाल नींगाला. ए पकडके रख मा**** को. पूलीस को बूलाव मारो सालेको.
फुडच कय आयकायला मी सूदीवर नव्हतो.

आन काय सांगू तूमाला. तुजा साथीदार कूट हाय ? हे ईचारत पोलीस दोन दीवस मारत व्हते.

आमची हासून हासून पुरी वाट झाल्ती. आख्रेरीस शेराला सव्वाशेर भेटलावता.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा