आमोद पाटील-आगरी बाणा: जानेवारी 2015

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

मंगळवार, १३ जानेवारी, २०१५

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पुतळ्याचे जासई गावात अनावरण



स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पुतळ्याचे अनावरण
सर्वसामान्य प्रकल्पग्रस्त जनतेच्या न्यायहक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करत राहिलेल्या स्वर्गीय लोकनेते दिनकर बाळू पाटील उर्फ दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज त्यांच्या जयंतीदिनी दिनांक १३ जानेवारी, २०१५ रोजी जासई या त्यांच्या जन्मगावी करण्यात आले.
"हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसते, आपण ते वाया जाऊ द्यायचे नसते-लोकनेते दि.बा.पाटील साहेब"
राजकीय कारकीर्द:
पनवेलचे नगराध्यक्ष (१९७५)
पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा आमदार(१९५७, १९६२, १९६७, १९७२ आणि १९८०)
रायगडचे दोनदा खासदार(१९७७ व १९८४)
विधानसभेचे विरोधी पक्षनेते(१९८३ ते १९८४)
सामाजिक कारकीर्द:
दि.बा.पाटील साहेबांच्या प्रयत्नाने १९६२ सालापासून रयत शिक्षण संस्थेच्या जासई, गव्हाण, फुंडे, पिरकोन, कामोठे, नावडे, पळस्पे, वावंजे, रिटघर या ठिकाणी माध्यमिक शाळा सुरु झाल्या. ते रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य होते व त्यांनीच पनवेल येथील महात्मा फुले आर्टस्, सायन्स, कॉमर्स कॉलेजची स्थापना केली. व्ही.के.हायस्कूलचे सल्लागार समितीचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले.
अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष व उरण-पनवेल तालुका आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष
डोंबिवली  चौदा गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष
सिडको-जेएनपीटी सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्षपद
शेतकरी लढा:
मुंबईवरील लोकसंख्येचा ताण वाढू लागल्याने नवी मुंबई वसवण्याची प्रक्रिया सुरू झाली. मुंबई शहराला लागून असणा-या रायगड जिल्ह्यात नव्या मुंबईचा पसारा वाढू लागला तेव्हा मुंबईच्या विकासप्रक्रियेच्या ओझ्याखाली रायगड जिल्ह्यातील भूमीपुत्र चिरडला जाण्याची भीती निर्माण झाली होती. या वेळी भूमीपुत्रांचा आवाज घुमला तो दि. बा. पाटील यांच्या रूपाने. ते विकासाच्या विरोधात नव्हते किंवा तथाकथित निसर्गवाद्यांसारखे दुराग्रही नव्हते. मात्र, विकास होत असताना त्यात माणूस भरडला जाऊ नये, अशी त्यांची भूमिका होती. म्हणूनच नव्या मुंबईच्या विकासादरम्यान आणि रायगड जिल्ह्यातील औद्योगिक विकासादरम्यान भूमिपुत्रांचे म्हणून जे लढे लढले गेले त्यात अग्रणी म्हणून दि. बा. पाटील यांच्याकडे पाहिले जाते. जमिनीचा मोबदला पैशात नव्हे तर विकसित भूखंडाच्या रूपात मिळाला पाहिजे यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली जासई येथे मोठे आंदोलन झाले. त्यात पाच लोकांना बलिदान द्यावे लागले. त्यानंतर सिडकोने विकसित केलेल्या भूखंडातील साडेबारा टक्के भूखंड प्रकल्पग्रस्तांना परत करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. भारताच्या इतिहासातील अशा प्रकारचा तो पहिला प्रयोग होता. तो सध्या देशात इतर राज्यातही रूढ झाला.जासई येथे १९८४मध्ये त्यांनी केलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनात पाच हुतात्मे झाले. या आंदोलनामुळे संपादित केलेल्या जमिनींपैकी साडेबारा टक्के जमीन विकसित करून त्या जमिनींचे भूखंड शेतक-यांना नाममात्र किमतीत परत करण्याचा नवा कायदा अस्तित्वात आला.
मुंबई बंदर कमी पडू लागल्याने उरण येथे जवाहरलाल नेहरू बंदर आकार घेऊ लागले तेव्हा तेथील प्रकल्पग्रस्तांसाठी दि. बा. पाटील यांनी निकराचा संघर्ष केला. या प्रकल्पाच्या तडजोडीच्या सर्व बैठका कोणत्याही सरकारी कार्यालयात नव्हे तर दि. बा. यांच्या घरी होत असत. यावरून त्यांचा आदरयुक्त धाक किती होता, याची कल्पना येऊ शकते.
सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दि. बा. पाटील यांचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे. दिनकर बाळू ऊर्फ दि. बा. पाटील यांचा जन्म १३ जानेवारी १९२६ रोजी उरण तालुक्यातील जासई गावातील शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासून जिद्दी असणा-या दि. बा. यांनी विधी शाखेची पदवी घेतल्यानंतर काही काळ वकिली केली. परंतु त्यांचा पिंड कार्यकर्त्यांचा होता. लवकरच त्यांनी सामाजिक कार्यात उडी घेतली आणि भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्या प्रश्नांसाठी लढे दिले. 
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांनी लढा दिला. लोकांचाही त्यांच्यावरचा विश्वास वाढत गेला. ते एकूण चार वेळा विधानसभेवर निवडून गेले, तर दोन वेळा लोकसभेत पोहोचले. १९८३ मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची निवड झाली. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांना कमी कालावधी मिळाला. मात्र या थोडय़ाशाच कालावधीत त्यांनी त्यांचा ठसा उमटवला. सभागृहातील त्यांची भाषणे आक्रमक तर होतीच. परंतु अत्यंत मुद्देसूद आणि सप्रमाण असत. म्हणूनच संसदेच्या राष्ट्रकुल संघाच्या महाराष्ट्र शाखेने १७ डिसेंबर १९९६ रोजी त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून सन्मानित केले.
 
कार्यक्रमाची काही क्षणचित्रे
स्वर्गीय लोकनेते दि,बा,पाटील साहेबांचा पूर्णाकृती पुतळा

 
उपस्थित जनसमुदाय

 
१९८४च्या हुतात्मा लढ्याची साक्ष देणारी जासई येथील क्रांती ज्योत

 
उपस्थित मान्यवर: आमदार.गणपतराव देशमुख, आमदार.पतंगराव कदम, भारती पोवार, आमदार.प्रशांत ठाकूर, आमदार.मनोहरशेठ भोईर, माजी खासदार.रामशेठ ठाकूर, माजी आमदार.विवेक पाटील, महेंद्र घरत, भूषण पाटील, शाम म्हात्रे, जे.एम.म्हात्रे  तसेच अन्य सर्व सन्माननीय मान्यवर

 उपस्थित जनसमुदाय

 मानवंदना

पुतळ्याचे अनावरण करताना उपस्थित मान्यवर

 पुतळा अनावरण समारंभ

 साहेब

 उपस्थित जनसमुदाय

उपस्थित जनसमुदाय

१९८४च्या जासई येथील शेतकरी लढ्यातील ५ हुतात्मे

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

मंगळवार, ६ जानेवारी, २०१५

लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण


लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

समस्त जासई ग्रामस्थांच्या सहकार्याने बनविण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्त आगरी समाजाचे श्रद्धास्थान स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या जयंतीदिनी मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५ रोजी सकाळी ११ वाजता जासई या त्यांच्या जन्मगावी करण्यात येणार आहे.
 
ठिकाण:
श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई.
मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता
 
आपलाच,
आमोद पाटील.