आमोद पाटील-आगरी बाणा: एप्रिल 2011

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

सोमवार, २५ एप्रिल, २०११

सिडकोची हुकुमशाही






ठिकाण:
करावे गाव(नवी मुंबई).
सिडकोची हुकुमशाही
नवी मुंबई परिसरात सिडको प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे तोडण्याचे सत्र सुरु केले आहे. हे सत्र करावे गावापासून सुरु केले आहे. त्यानंतर नवी मुंबई परिसरातील इतर गावांमध्ये देखील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे तोडण्याचे कारस्थान चालू राहणार आहे.


कारस्थानाचा म्होरक्या
या सर्व कारस्थानाचा म्होरक्या दुसरा-तिसरा कोणी नसून सिडको अधिकारी श्री.भांगे आहेत. प्रकल्पग्रस्तांनी ज्या जागेवर घरे बांधली आहेत त्या जागेची कागदपत्रे दाखवून देखील पोलीस अधिकाऱ्याच्या दमदाटीने हे कारस्थान करत आहेत.


महाराष्ट्र सरकारचा आदेश
महाराष्ट्र सरकारने काढलेल्या जी.आर. नुसार गावाच्या गावठाणाच्या २०० मी. बाहेर प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करायचे ठरले आहे. पण हा कायदा अमलात आणण्यास सिडको प्रशासन टाळाटाळ करत आहे. तसेच दर १० वर्षांनी गावठाणाचा विस्तार झाला पाहिजे असा नियम असताना देखील नवी मुंबई परिसराती गावठाणांचा गेली ४० वर्षे विस्तार झालेला नाही. सिडको प्रशासन नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना विठीस पकडत आहे.


जे.एन.पी.टी. च्या धर्तीवर आंदोलन
आपण सर्वानी ज्याप्रमाणे जे.एन.पी.टी. प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन केले त्याच प्रमाणे सिडको विरोधात आंदोलन करण्यासाठी करावे गाव येथे ग्रामसभा झाली. त्या सभेत शेतकरी संघटनेचे श्री.मोरेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार आज सोमवार दि.२५ एप्रिल,२०११ रोजी सिडको अध्यक्ष आणि व्यवस्थापनाशी भेट घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. जर सिडको प्रशासनाने या कारवाया बंद केल्या नाहीत तर या विरोधात मोर्चे, आमरण उपोषण करून लढा द्यायला नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त मागे-पुढे बघणार नाहीत.
आगरी-कोळी प्रकल्पग्रस्त जनतेच्या एकजुटीचा विजय असो.

संकलन:
कुणाल भोईर(पदाधिकारी:आगरी बाणा फेसबुक संघटना)
करावे गाव.


आपलाच,
आमोद पाटील(अध्यक्ष-आगरी बाणा फेसबुक संघटना)
आगरी बोली-आगरी बाणा.

शुक्रवार, २२ एप्रिल, २०११

जासई गाव ग्रामदेवता-२

विठ्ठल मंदिर


जासई तलाव


शंकर मंदिर(जासई तलावाशेजारील)


जासई तलाव


जोगेश्वरी माता मंदिर


जोगेश्वरी माता मंदिर


अश्या आहेत आमच्या जासई गावातील ग्रामदेवता. कधी उरण-पनवेल, उरण-नवी मुंबई रस्त्यावरून प्रवास केलात तर सहज नजरेत दिसून येतील. तर मग वेळात-वेळ काढून या एकदा आमच्या जासईला, आपणा सर्वांचं मनोभावे स्वागत आहे आपले आगरी जनतेचे लाडके नेते मा.श्री.लोकनेते.दि.बा.पाटील साहेब यांच्या जन्मभूमीत.....................आम्ही जासईकर वाट पाहतोय आपणा सर्वांची.....................

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा फेसबुक संघटना.
आगरी बोली-आगरी बाणा.

ग्रामदेवता जासई गाव

जोगेश्वरी माता
गावचा मठ


देव्हारा-कुलदैवत खंडोबा

देवी मंदिर(जासई नाका)

ठिकाण:
गाव-जासई,तालुका-उरण,जिल्हा-रायगड.
(उरण-पनवेल रोड, उरण-नवी मुंबई रोड,राष्ट्रीय महामार्ग-४ब)

Place:
At/Post:Jasai,Tal-Uran,Dist-Raigad.
(Uran-Panvel Road, Uran-Navi Mumbai Road, NH-4B)

जासई गावची जत्रा:चैत्र कृष्ण पंचमी
दरवर्षीप्रमाणे यंदाही आमची जासई गावची जत्रा उस्ताहात पार पडली. दरवर्षी चैत्र कृष्ण पंचमीला जासई गावची जत्रा असते. यावेळी इंग्रजी कालदर्शिकेप्रमाणे आमची जासई गावची जत्रा शुक्रवारी दिनांक २२ एप्रिल रोजी अतिशय आनंदी वातावरणात संपन्न झाली. गावात राहणाऱ्या तसेच गावाबाहेर राहणाऱ्या सर्व जासईकरांनी जत्रेचा आनंद लुटला. सर्व ग्रामस्थांनी गावातील ग्रामदेवताना नारळ चढवून आपल्या परिवारावर, जासई गावावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी मनोभावे प्रार्थना केली.

गावची जत्रा:ऐक्याच प्रतिक
तस पाहायला गेल्यास अनेक धर्माचे, जातीचे, पंथांचे लोक राहतात. ही सर्व धर्माची, जातीची मंडळी अगदी आनंदाने जत्रेत सहभागी होताना दिसून येतात. काही मंडळी पोटापाण्यासाठी दूर घाटावरून, काही मंडळी वेगवेगळ्या राज्यातून आमच्या जासई गावात राहायला आली आहेत. अशी मंडळी देखील जत्रेत आनंदाने सहभागी होताना दिसून येत होती. त्यांच्या घरातील स्त्रिया देखील गावातील स्त्रियांच्या जोडीने मठावर देवीची पूजा करत होत्या. अनेक पाहुणे मंडळी देखील जत्रेनिमित्त गावात आली होती, माहेरवाशिणी देखील जत्रेनिमित्त गावात आल्या होत्या. त्यामुळे घरोघरी पाहुण्यांची गजबज दिसून येत होती आणि आमचे जासई ग्रामस्थ देखील पाहुण्यांचा मान राखत होते.

मन गावातच
कामानिमित्त जरी पनवेलला राहत असलो, तरी मन मात्र नेहमी गावातच रमत. शेवटी काय, गाव तो गावच असतो. माझ्यासारखे अनेक आहेत. जे गावात राहत नाहीत पण त्यांची गावाशी असलेली नाळ त्यांनी तुटू दिलेली नाही. तर अशी असते आमची जासईची जत्रा. दूर असणार्यांना गावाची आठवण करून देणारी, जवळ असणाऱ्यांना अधिक जवळ आणणारी, सर्व जाती, धर्मांना सामावून गावाचा आगरी बाणा जपणारी....................

आपलाच,
आमोद पाटील.
संपादक-आगरी बाणा फेसबुक संघटना.
आगरी बोली-आगरी बाणा.
आम्ही जासईकर.

सोमवार, १८ एप्रिल, २०११

वाढदिवस



गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया

आज वयाची दोन दशके पूर्ण २१ व्या वर्षात प्रदार्पण करत आहे. आपणा सर्वांच्या शुभेच्छा, बाप्पांचा आशीर्वाद, कुटुंब-परिवाराची साथ यामुळे आज पर्यंत काहीतरी करू शकतोय. आपल्या सर्वांच्या साथीने आपण सर्व मिळून आगरी बाणाच सामाजिक एकतेच काम करत आहोत. ते यापुढे देखील असचं चालू राहील हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

तुमचा एक लहान भाऊ समजून माझ काही चुकत असेल तर नेहमी सांगत राहा. कारण मी वयाने छोटा आहे. त्यामुळे थोडीफार अनुभवाची कमी असू शकते. काही निर्णय चुकीचे असू शकतील. त्यामुळे आपणा सर्वांच्या अनुभवाची यापुढील काळात खूप गरज आहे.

आत्तापर्यंतच्या ऑनलाईन प्रवासात आपणा सर्वांची खूप साथ लाभली पुन्हा एकदा आपणा सर्वांचे आभार.

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा फेसबुक संघटना.
आगरी बोली-आगरी बाणा.

रविवार, १७ एप्रिल, २०११

मुलगी का नको?????????


समाज इतका वाईट झाला आहे का? आपण काहीच करू शकत नाही का? श्रद्धा-अंधश्रद्धा यांच्या जोखडात अजून किती काळ स्वतःला बांधून ठेवणार? हे प्रश्न स्वतःलाच विचारा आणि स्वतःच उत्तर मिळवा. कारण दुसरा किती ओरडला, बोंबलला तरी आपल्याला फरक पडत नाही. आपण इतके निर्दयी झालोत का???? की स्वतःच्या मुलीला जन्म घेण्या अगोदरच मारून टाकतो?????


खालील आकडेवारी वाचा आणि जर आणि मनाला वाटलं तर चांगलच आहे. नाही वाटलं तर मग काय बोलणार??????ज्याची त्याची मर्जी.

मदर्स डे
ग्लोबलायझेशन झाले आहे.
’मदर्स डे’ चे फळहीतिच्या मातृत्त्वाला आले आहे.
लक्षात घ्या गर्भातील मुलगीहीभविष्यकाळाची आई असते !
न फिटणारे ॠण फेडण्याची आपल्याला उगीचच घाई असते !!

2011 च्या जनगणनेत सहा वयोगटापर्यंतच्या मुलींचा जन्मदर 30 ने घटला आहे. मात्र, नक्षलग्रस्त व मागास म्हणून शिक्का बसलेला गडचिरोली जिल्हा याबाबतीत पुढे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या जिल्ह्यात दरहजारी मुलींचे प्रमाण 956 एवढे आहे. या तुलनेत विकसित समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांमधील मुलींचे प्रमाण दरहजारी नऊशेपेक्षा कमी आहे. महिलांच्या सामान्य आकडेवारीत महाराष्ट्रात तीनने वाढ झाली आहे. 2001 मध्ये महाराष्ट्राचा आकडा हजार पुरुषांमागे 922 महिला असा होता; तो 2011 मध्ये 925 वर गेला आहे. सहा वर्षांपर्यंतच्या मुलींची संख्या महाराष्ट्रात 2001 मध्ये हजार मुलांमागे 913 होती. 2011 मध्ये यात 30 ने घट होऊन मुलींची संख्या 883 वर आली आहे. केंद्रीय जनगणना विभागाच्या माहितीनुसार, सहा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण मोठ्या शहरांत झपाट्याने घटल्याचे दिसून आले आहे. मात्र, गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यात 1991 मध्ये एक हजार मुलांमागे 980 मुली, 2001 मध्ये 966, तर 2009 मध्ये 965 मुली आणि 2011 मध्ये 956 मुली असा जन्मदर आहे.2011 च्या जनगणनेत सहा वर्षांपर्यंतच्या मुलींच्या जन्मदरात राज्यात चंद्रपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील दर 945 एवढा आहे. त्या खालोखाल गोंदिया 944, रत्नागिरी 940, भंडारा 939, नंदुरबार 932, अमरावती 927 एवढा जन्मदर आहे. हे सगळे जिल्हे आदिवासी व मागास म्हणून ओळखले जातात. मुंबईसारख्या महानगरात मुलींचे प्रमाण हजारी केवळ 874, नागपूरमध्ये 926, नाशिकमध्ये 882, पुणे येथे 873 आणि औरंगाबाद जिल्ह्यात 848 एवढे कमी आहे.जिल्हानिहाय मुलींचे प्रमाण (दरहजारी) गडचिरोली 956, चंद्रपूर 945, गोंदिया 944, रत्नागिरी 940, भंडारा 939, नंदुरबार 932, अमरावती 927, नागपूर 926, रायगड 924, ठाणे 918, वर्धा 916, यवतमाळ 915, सिंधुदुर्ग व मुंबई 910, अकोला 900, नांदेड 897, नाशिक 882, सातारा 881, धुळे 876, मुंबई 874, पुणे 873, लातूर व सोलापूर 872, हिंगोली 868, परभणी 866, सांगली 862, वाशिम 859, उस्मानाबाद 853, औरंगाबाद 848, जालना 847, कोल्हापूर 845, बुलडाणा 842, नगर 839, जळगाव 829, बीड 801.


महिला मुक्तीच्या धोरणाचीघरा-घरात भक्ती केली जाते.
जन्माला येण्याअगोदरचकायमची मुक्ती दिली जाते.
महिला मुक्तीच्या धोरणाचीघराघरात विकृत तर्‍हा आहे !
मुक्तात्मे म्हणत असतील,
इथे जन्म न घेतलेलाच बरा आहे.

देशभरातील दर हजारी ८६ अजन्मा मुली आपणा सर्वाना आर्जव करत आहेत.. लिंगसमानतेचा आपला निर्देशांक वाढवावा, यासाठी त्यांचे आर्जव आहे. कारण त्यांच्या न जन्मण्यामागे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या, कळत-नकळत आपल्यातील बहुसंख्य जण कारणीभूत आहोत. लिंगचाचणी करणे, मुलीचा गर्भ नाकारणे याच्याशी आपला काही संबंध नाही, आपल्यात असे घडत नाही, असा बऱ्याचशा सुशिक्षित व सुसंस्कृत नागरिकांचा भ्रम आहे. आजही या अभिजन समाजात, ठायीठायी कळत-नकळत लिंगभेदमूलक वातावरणाची बीजे सामाजात पसरवली जात आहेत. त्याचेच भीषण प्रतिबिंब लिंगदराच्या विषमतेतून प्रकट होत आहे.लग्नाच्या मांडवात अजूनही मुलग्यांची पार्टी सरस मानली जाते. घरांघरांत पुरुषांना झुकते माप आहे. सणसमारंभात पुरुषांची पंगत आधी, बायका नंतर, अन्न जेमतेम असेल, तरी पुरुषांच्या पंगतीला वाढताना आग्रह, बायकांना कमी पडले तरी हरकत नाही, हे चित्र सर्रास दिसते. आणि भारतीय नारीला त्याची अजिबात खंत नसते, कारण स्वत:कडे कमीपणा घेण्याचे मूल्य तिच्या रक्तातच मुरलेले आहे. मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढणाऱ्या सामान्य माणसापासून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपर्यंत अनेकांना लग्नाची मुलगी हे ‘दायित्व’ वाटते.


सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश ग्यान सुधा मिश्रा यांनी स्वत:चा ताळेबंद जाहीर करताना दायित्वाच्या (लाएबिलिटीज) कप्प्यात ‘स्वत:च्या दोन लग्नाच्या मुली’ असे नमूद केले होते, ही बातमी आठवते ना? महिला दिनाचे संकल्पआयांनी संकल्प करावापून्हा खून करणार नाही.कुणाच्या सांगण्यावरूनगर्भातल्या लेकी मारणार नाही.बायकांनी ठरविले पाहिजेनवर्‍याला छळणार नाही.सासवांनीही ठरविले पाहिजेसूनांना जाळणार नाही.हक्कांपेक्षा जबाबदारीजोपर्यंत कळणार नाही !महिला दिनाचे औचित्यतोपर्यंत कळणार नाही !! तार्किकता आणि विज्ञानवाद ही मूल्ये शिक्षणातून आपोआप रुजत नाहीत, हे नव्या लोकसंख्या-आकडय़ांनी पुनश्च सिद्ध केले आहे.


यंदाच्या जनगणनेतून हाती आलेली आकडेवारी बघा- पुरोगामीत्वाचा गुणविशेष मिरवणाऱ्या व शिक्षणाचे जाळे सुस्थित असलेल्या महाराष्ट्रात १००० मुलग्यांमागे फक्त ८८३ मुली, म्हणजे ११७ मुलींचे गर्भ नष्ट केले गेले. राज्यात मुलींचा सर्वाधिक जननदर आहे गडचिरोलीत- ९५६. आणि हा जिल्हा साक्षरतेत खालून दुसरा- केवळ ७०.५५ टक्के साक्षरता. मुंबई शहरात साक्षरता आहे ८३ टक्के, आणि मुलींचे प्रमाण मात्र राज्याच्या सरासरीहूनही कमी- हजारी ८७४ मुली, म्हणजे १२६ मुलींना जन्माचा हक्क नाकारला गेला आहे. साक्षरतेचा निर्देशांक आणि लिंगसमानतेचा निर्देशांक यांच्यातील तफावतीचा हा दृश्य परिणाम!ही तफावत जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत लिंगदर समान होण्याच्या ध्येयाजवळ आपण सरकू शकणार नाही. कारण आता तंत्रज्ञान प्रगत होत आहे. सोनोग्राफीचे तंत्र आवाक्यात आलेले आहे. त्यापुढचे प्रीइंप्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस (पीजीडी) तंत्रज्ञान उपलब्ध आहे. गर्भलिंगनिवडीवर कितीही बंदी आणली तरी वाट्टेल त्या पळवाटा शोधल्या जात आहेत. मागास मनोवृत्ती आणि विकसित तंत्रज्ञान यांतील विरोधाभासामुळे हे साधले जात आहे.हरयाणाचे उदाहरण बोलके आहे. हरयाणाच्या शासन-प्रशासनाला फारच कानकोंडे व्हायला झाले आहे. तेथे मुलींचा जन्मदर सुधारण्यासाठी मोठी मोहीम राबवली जात असल्याचा दावा शासनातर्फे केला जात होता. पण तो प्रयत्न सपशेल फोल ठरला आहे. कारण हरयाणातील झंझारने नीचांक गाठला आहे- हजारी फक्त ७७४ मुली. या मोहिमेचे जनक, हरयाणाचे आरोग्यमंत्री नरेंद्रसिंह ज्या महेंद्रगढचे आहेत, तिथेही हीच गत. आता सफाई देताना ते म्हणतात की, झंझार नवी दिल्लीच्या जवळ आहे, तर महेंद्रगढला राजस्थानचा वेढा आहे, त्यामुळे आमचे प्रयत्न फोल ठरले आहेत. मुलींना नाकारू पाहणाऱ्या हरयाणातील जोडप्यांना शेजारी राज्यांचा आधार मिळतो आहे.. देशातील श्रीमंत जोडप्यांना तर थायलंड, मलेशियातील सुसज्ज पीजीडी क्लिनिक्स लिंगहत्येची सोय सहज करून देत आहेत. इच्छा तेथे मार्ग, दुसरे काय? थोडक्यात, या विकृत इच्छेची पाळेमुळे नष्ट करण्याला पर्याय नाही. ही विकृती समूळ नष्ट कशी करायची, याचा अभ्यास आता पद्धतशीररीत्या व्हायला हवा. जेथे मुलीचा गर्भ नाकारण्याचे प्रमाण आहे, तेथे तो का आहे, याच्या खोलात शिरावे लागेल. जेथे मुलींचा जन्मदर चांगला आहे, तेथेही पाहावे लागेल की, कुटुंबनियोजन कसे होतेय. म्हणजे मुलगा होईपर्यंत कितीही संतती झाल्या तरी चालतील, म्हणून मुली नाकारल्या जात नाहीत, असे तर नाही? किंवा गर्भहत्येचे तंत्र परवडत नाही, म्हणून नाईलाजाने मुली जन्मताहेत, असे तर नाही? लिंगसमानतेचा निर्देशांक नेमका कसा काढायचा, त्याचे निकष कोणते, लिंगसमानता रुजवण्यासाठी काय करावे लागेल- अशा अनेक प्रश्नांवर अभ्यास करून तोडगे काढावे लागतील. तशी धोरणे बनवावी लागतील. दुर्दैवाने आपण अलीकडे समाजशास्त्र या विषयाची उपेक्षा केली आहे. समाजशास्त्र किंवा ह्युमॅनिटीज या शाखेकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण रोडावत आहे. सद्यस्थितीत आपल्याला असा अभ्यास करणारे समाजशास्त्रज्ञ हवे आहेत. समाजाच्या मानसिकतेचा अभ्यास करून योग्य उपाय योजल्याशिवाय मुलींच्या गर्भहत्येचा प्रश्न सुटणार नाही. कायदा आवश्यक असतो, पण कधीच पुरेसा नसतो. त्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व बाजूंनी प्रयत्न होत नाहीत, तोपर्यंत कायदा प्रभावी ठरू शकत नाही. गर्भलिंग निवड आणि हत्या विरोधी कायद्याला आपण सर्व बाजूंनी पोषक वातावरण कसे तयार करू, त्यावर त्याचा प्रभाव अवलंबून आहे. देशभरात विविध ठिकाणी चाललेल्या ‘सेव्ह गर्ल चाईल्ड’ अभियानांतून काय साध्य झाले, आणखी काय करायला पाहिजे, यांचा सखोल अभ्यास झाला पाहिजे. ‘तुम्हाला मुलगी नको असली तरी तिला जन्मू द्या, आम्ही तिला सांभाळू’ असा संदेश तरुण जोडप्यांमार्फत व अनाथालयांद्वारे जाईल, अशा जाहिराती कराव्या का? दृश्यमाध्यमांच्या प्रभावाचा उपयोग करून मुलींच्या स्वागताचे संदेश प्रसृत करता येतील का? आता कल्पकतेने आणि जिद्दीने नवे प्रभावी उपाय योजावे लागतील. सुजाण समाजाला लिंगविषमतेचे कंगोरे असलेले जुने शिष्टाचार रद्द करून, नवे लिंगसमान शिष्टाचार जाणीवपूर्वक रुजवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या विषयाशी आपण सर्व जण संबंधित आहोत. लिंगसमानता हा जोपर्यंत प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय बनत नाही, समानतामूलक वातावरण आपण समाजात निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत मुलींचे या भूमीत सहर्ष स्वागत होणार नाही...
हे या अजन्मा मुलींचे आर्जव आहे. त्या आपल्याला स्वागतासाठी साकडे घालत आहेत- रिकाम्या झालेल्या त्यांच्या उदर-घरांतून!


होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
एरव्ही बोललेही नसते,
पण माझ्या विचारांचेतुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय.
चक्क माझी देवी बनवूनमला फोटोमध्ये फ्रेम केलेय.
जमेल तेंव्हा,जमेल तसेमाझे सोईनुसार कौतुक करता.
खरे दु:ख याचे की,
तुम्ही मला गृहित धरता.
त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतेय..
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा,
सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात.
ज्या माझ्या वारसा सांगतात,
त्याच बेईमान झाल्यात.
असे होईल,मला काय माहित?
मला कुठे पुढचे दिसले होते?
एका वेगळ्या जगासाठीमी शिव्याशाप,दगडाबरोबर शेणही सोसले होते.
तुमच्याच शब्दात सांगायचे तररात्रंदिवस घासले होते.
आज मी कसले घाव झेलतेय?

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
ही कही उपकाराची भाषा नाही.

आजच्या बाजारू समाजसेवेसारखाहा बेंडबाजा अगर ताशा नाही.

मी विसरून गेले होते,

आम्ही कोणकोणते विष पचवले आहे.

हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्माला डिचवले आहे.

म्हनूनच तुमच्या बहिर्‍या कानीहे गार्‍हाणे घालतेय.

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

मावल्यांनो,लेकीबाळींनो.तुम्ही शिकलात सवरलात.

पण नको तेवढ्या शहाण्या झालात.

विकृत स्त्रीमुक्तीच्याप्रत्येकजणी कहाण्या झालात.

माझा वारसा सांगून,स्वार्थासाठी राबता आहात.

या सगळ्या संतापापुढेआज मी भिड्भाड भुलतेय.....

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

बाईपणाचे दु:ख काय असते?

मी तुमच्यापेक्षा जास्त भोगलेय.

आरशात पाहून सांगा,

मी सावित्रीच्या शब्दाला जागलेय?

तकलादू आणि भंपकस्त्रीमुक्तेची नशातुम्हांला आज चढली आहे.

कपडे बदलेले की,पुरोगामी होता येते,

ही फॅशन तुम्ही पाडली आहे.

शिकली सवरलेली माझी लेकसंस्कृतीच्या नावाखालीनाकाने कांदे सोलतेय..

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

मान नको,पान नको,आमचे उपकारही फेडू नका.

किर्तन-बिर्तन काही नकोझोडायची म्हनूनभाषणंही झोडू नका.

वाघिणीचे दूध पिऊनकुत्र्यांसारखा गोंडा घोळीत आहात.

धर्म-संस्काराच्या नावाखालीटाकाऊ परंपरा पाळीत आहात.

तुमच्या

चिपाडलेल्या डोळ्यातम्हनून हे अंजन घालतेय...

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

तुम्हांला

आज काहीसुद्धा सोसायचे नाही.

काढणारे काढीत आहेततुम्हांला शाळा काढीत बसायचे नाही.

तुम्ही फक्त पुरोगामित्त्वाचा खरा वसा घ्यायला पाहिजे.

एखादा दुसरा ’यशवंत’ शोधूनत्याला आधार द्यायला पाहिजे,

शाळा कॉलेजचे पिक तरहायब्रिडसारखे डोलतेय.....

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

मनमानी आणि स्वैराचारालापुरोगामित्त्वाचे लेबल लावणे,

यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही.

फक्त नवरे बदलणे,घटस्फोट घेणे,ही काही स्त्रीमुक्ती नाही.

माझी खरी लेक तीच,जी सत्यापूढे झुकत नाही.

सावित्री आणि ज्योतिबांपूढेआंधळेपणाने माथा टेकत नाही.

माझी खरी लेक तीच,

आम्हांलासुद्धा नव्याने तपासूनस्वत:ची भाषा बोलतेय.

आमचाही वसातावून-सुलाखुन पेलतेय.....

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

आमच्याच मातीत,

आमच्याच लेकरांकडूनदूजाभाव बघावा लागला.

माझा फोटो लावण्यासाठीहीसरकारी जी.आर.निघावा लागला.

आपल्या सोईचे नसले की,

विचारांकडेही कानाडॊळा होतो.

समाजासाठी काही करायचे म्हटले की,

पोटात प्लेगचा गोळा येतो.

ज्योतिबांशिवाय सावित्री,

सावित्रीशिवाय ज्योतिबा,

समजून घेता येणार नाही.

विचारांची ही ज्योती,

एकटी-एकटी नेता येणार नाही.

सुनांना लागावे म्हणून तरलेकींनो,

तुम्हांला बोलतेय....

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय...


आत्ता तरी आपण स्वतःला बदलणार का?

की चाललंय तस चालू देणार????

येणारा नवीन जीव तुमच्या प्रयत्नांची वाट बघतोय...............

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा फेसबुक संघटना.
आगरी बोली-आगरी बाणा.

बुधवार, १३ एप्रिल, २०११

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

माझ्या विचारसरणीवर ज्या काही फार थोड्या नेत्यांचा प्रभाव पडला आहे. त्याच्यात आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच नाव देखील येत. लहानपणापासून पुस्तकात पाहिलेले अथवा चित्रपट माध्यमातून दूरदर्शन पाहिलेले बाबासाहेब माझे नेहमीच स्फुर्तीस्थान राहिले. समाजाविषयी काहीतरी करण्याची असलेली त्यांची जिद्द माझ्या आजच्या कार्यात मोलाची साथ देत आहे. भारतासारख्या आजघडीला १२१ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाची राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली आहे.

पण आज काही स्वतःला शहाणे म्हणविणारे लोक ती राज्यघटना फाडून टाकायला सांगत आहेत. सर्वच बौल्लीवूड मंडळी ज्यांना देशाची जान नाही, अक्कल नावाची चीज नाही, पैशासाठी देशही विकायला काढतील असे लोक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काहीही बडबड करत असतात. अथवा सध्या भारतात सामजिक कार्यकर्त्यांचा सुलसुलाट झालाय(सुलसुलाट हा नेहमी उंदरांचाच होतो) ही मंडळी प्रसारमाध्यमांना हाताशी धरून नसत्या उठाठेवी करीत आहेत. मेणबत्या पेटवून देश वाचवायला निघालेत. अश्या लोकानी अगोदर सरकारी कर न बुडविता तो भरावा, ज्या वेळी निवडणुका असतात त्यावेळी मतदान करण्यासाठी बाहेर यावं. सरकारने तुम्हांला सर्व उमेदवारांच्या विरोधात मत देण्याचा अधिकार दिलाच आहे. पण हे मेणबत्यावाले फक्त देशाच्या विकासाच्या गप्पा मारणार आणि पैसा कमवायला अमेरिकेची चाटणार. जर देशाची चिंता आहे ना तर निवडणुकीचा दिवस सुट्टीचा दिवस न मानता त्यादिवशी मतदान करावं. पण नाही हे मोठमोठ्या बाता मारणारे लोक मात्र तेव्हा कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी बायका-पोरांबरोबर देशाच्या भवितव्याची चिंता करत असतात. किव्वा मतदान केलंच(भारतातील जनतेवर उपकार करून) तर हे त्याचा योग्य मोबदला घेतात. ही मंडळी आपली मते विकतात. आता राहिला प्रश्न देशात निर्माण झालेल्या बाबा, गुरु, आध्यात्मिक गुरु, ताई, यांचा तर ही मंडळी निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्ष्यांकडून खूप प्रमाणात काळा पैसा घेऊन त्यांच्या भक्तीच्या मागे असलेल्या वेड्या श्रद्धाळू लोकांना अश्या लोकांना मतदान करण्यास भाग पाडतात. म्हणून तर ही राजकीय मंडळी आज या बाबाच्या पायरीवर तर उद्या त्या ताईच्या आश्रमात. अश्या चोर लोकांचा जे स्वतःच्या भल्यासाठी देशही विकतील अश्यांचा धिक्कार करून हा लेख मी बाबासाहेबांच्या चरणी अर्पण करत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
(१४ एप्रिल,१८९१- ६ डिसेंबर,१९५६)

शिक्षण · एम. ए. · पीएच. डी. · डी. एस्‌सी. · एल्‌एल. डी. · डी. लिट. बॅरिस्टर ऍट लॉ.

जीवन इतिहास:
जीवनक्रम
१८९१,१४ एप्रिल महू गावी जन्म.
१८९६ त्यांच्या आईचा मृत्यू.
१९०० नोव्हेंबर साता-याच्या शासकीय शाळेत प्रवेश.
१९०४ एलफिन्स्टन शाळेत प्रवेश.
१९०६ रमाबाईंशी विवाह.
१९०७ मेट्रिक परीक्षा,
७५० पॆकी ३८२ गुणांनी पास केली.
१९०८ जानेवारी एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश.
१९१२ डिसेंबर त्यांचा मुलगा यशवंत ह्याचा जन्म झाला.
१९१३ बी. ए.ची परीक्षा मुंबई विद्यापीठातून पास झाले.
( पर्शियन आणि इंग्रजी विषय)
१९१५ जून एम. ए.ची परीक्षा पास झाले.
१९१६ जून कोलंबिया विद्यापीठातून पीएच. डी.साठी काम पूर्ण करून लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना झाले.
१९१७ कोलंबिया विद्यापीठाने पीएच. डी. पदवी प्रदान केली.
१९१७ जून लंडनहून भारतात एम. एस्‌सी. (अर्थशास्त्र)या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून परतले, कारण बडोदा संस्थानाने त्यांची शिष्यवृत्ती थांबवली होती.
१९२१ जून लंडन विद्यापीठाने त्यांना एम. एस्‌सी. (अर्थशास्त्र)ही पदवी प्रदान केली.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
(१४ एप्रिल, इ.स. १८९१; महू, मध्य प्रदेश - ६ डिसेंबर, इ.स. १९५६; दिल्ली) हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताची राज्यघटना बनवणार्‍या मसुदासमितीचे ते अध्यक्ष होते. दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले. सामाजिक आणि अर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. नंतर कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळाल्या. दलितांच्या उद्धारासाठी आयुष्यभर झगडत राहिलेले नेते आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे हे त्यांचे मूळ गांव त्यांचे वडील हे लष्करात सुभेदार मेजर होते. ते महू येथे असताना आंबेडकरांचा जन्म झाला. त्यांचे वडिल हे लष्करात सुभेदार मेजर होते. ते महू येथे असताना आंबेडकरांचा जन्म झाला. त्यांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एलफिन्स्टन हायस्कूल व कॉलेजमध्ये झाले. पदवी घेतल्यानंतर त्यांनी बडोदे संस्थानात नोकरी धरली. इथे त्यांना अस्पृश्य म्हणून अत्यंत कटू अनुभव आले. पदोपदी मानखंडना झाली. याचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यांनी ती नोकरी सोडली व मुंबईत सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी पत्करली. अस्पृश्यांचा उद्धार हेच त्यांनी आपले जिवितकर्तव्य मानले. त्यासाठी त्यांनी अस्पृश्य वर्गातील कार्यकर्त्यांची संघटना उभारण्यास सुरुवात केली. १९२० मध्ये त्यांनी मुंबई येथून “मूकनायक”नावाचे पाक्षिक सुरु केले. कोल्हापूर संस्थानातील अस्पृश्यांची माणगांव येथे त्याचवर्षी परिषद घेतली. नागपूर येथे छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली एक अखिल भारतीय परिषद त्यांनी बोलावली. लोकजागृतीचे हे कार्य सुरू असतानाच, स्वत:चे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्णकरण्याकरिता ते इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी लंडन विद्यापीठाची डी.एस.सी. ही दुर्लभ पदवी संपादन केली. ते बॅरिस्टरही झाले. मायदेशी परतताच त्यांनी मुंबईत वकिली सुरु केली. सोबतच अस्पृश्य हिताचे आपले कार्य सुरुच ठेवले. १९२४ मध्ये त्यांनी “बहिष्कृत हितकारिणी” ही संस्था स्थापन केली. “शिकवा, चेतवा व संघटित करा”, हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते.

घरातून संस्कारांचे बीज
मोलोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. सुभेदार रामजी हे मालोजीरावांचे सुपुत्र आणि डा. बाबासाहेब आंबेडकर याचे आदर्श वडील होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेचा सॆन्यात शिपाई म्हणुन भरती झाले होते. सॆन्यातील नोकरीमुळे सॆनिकी शाळेत म्हणजेच ’नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. शिक्षण घेऊन ते सुशिक्षीत, संस्कारसंपन्न व द्न्यानी होऊ शकले. मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुध्द विचाराला आणि शुध्द आचाराला महत्त्वाचे स्थान होते. डॉ. आंबेडकरांचा जन्म
१४ एप्रिल इ.स. १८९१ साली महू या मध्यप्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४ वे अपत्य होते. हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावचे. त्यांचे पूर्वज ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते. त्यांच्या वडिलांना मराठी व इंग्रजी भाषांमध्ये थोडे शिक्षण मिळाले होते व त्यांनी आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा दिली. कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू धर्मातील साहित्याची ओळख करून दिली. इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी आंबेडकरांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. भीमराव वयाने लहान असल्यामुळे ’कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाही. यामुळे घरीच लहानग्या भीमरावास अक्षरओळख आपोआप होऊ लागली. इ. स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली. ते सातारा येथे सुरुवातीला साधारण घरात राहीले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनी इ. स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीने सुयोग्य अशा तारखेला सातारा येथील ’कॅम्प स्कूल’ मध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले. भीमरावाचे नाव दाखल केले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला! इ.स. १८९६ मध्ये भीमरावांची आई भीमाबाईंचा मस्तक शुळ या आजाराने दु:खद निधन झाले. त्यावेळी मातृविहीन भीमरावांचा ममतायुक्त आधार बनण्याचे महत्त्वाचे कार्य आत्या मीराबाईंनी केले. त्या वयाने भाऊ रामजीपेक्षा मोठया आणि स्वभावाने प्रेमळ व समजूतदार होत्या. म्हणून रामजींसह सर्वजण त्यांचा आदर करीत असत. रामजींनी इ.स. १८९८ साली दुसरे लग्न केले आणि कुटुब मुंबईला नेले. तेथे आंबेडकर एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले.इ.स. १९०७ साली त्यांनी मॅट्रिक परीक्षा यशस्वीरीत्या पार केली व इ.स. १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. हा प्रसंग त्यांच्या समाजातील लोकांनी अभिमानाने साजरा केला. याआधी इ.स. १९०६ मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या रमाबाई (वय ९ वर्षे) यांच्याबरोबर ठरले. यानंतर अमेरिकेतील शिक्षणासाठी त्यांना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी २५ रूपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली. इ.स. १९१२ साली त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांमध्ये पदवी मिळवली व बडोदा संस्थानाच्या सरकारात नोकरीची तयारी केली. याच वर्षी त्यांचा मुलगा यशवंत याचा जन्म झाला. २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ मध्ये त्यांचे आजारी वडील रामजी यांचा मुंबईमध्ये मृत्यू झाला.

अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष
बाबासाहेबांनी एक आघाडीचे भारतीय विद्वान या नात्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट १९१९ च्याबाबत साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी आंबेडकरांनी दलित व इतर मागासलेल्या समाजांसाठी वेगळे मतदान विभाग व आरक्षण यांची मागणी केली. इ.स. १९२० साली त्यांनी मुंबईत मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन त्यांनी सनातनी हिंदू नेत्यांवर आणि जातिभेदाविरुद्ध काहीही करत नसलेल्या भारतीय राजकारण्यांवर टीका केली. कोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे छत्रपती शाहू महाराज खूश झाले व त्यांनी आंबेडकरांबरोबर जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिला. आंबेडकरांनी यानंतर वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली. इ.स. १९२६ साली ते मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. इ.स. १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला. इ.स. १९२८ मध्ये बाँबे प्रेसिडेन्सी कमिटीवर त्यांची नेमणूक करण्यात आली व त्यांनी सायमन कमिशनाबरोबर काम केले. निवडणुकींमधील सुधारणांसाठी त्यांनी काही नवीन मुद्दे सुचवले. १९२६ साली सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरला भरलेल्या महार परिषदेत त्यांनी अस्पृश्य बंधूंना वतनदारी व गावकीचे हक्क सोडून देण्याचा संदेश दिला. त्यामुळे हजारो लोकांनी गावकीची कामे सोडून इतर कामे करण्यास सुरुवात केकी. १९२७ मध्ये महाडच्या चवदार तळ्यावर इतरांप्रमाणे अस्पृश्यांनाही पाणी भरता यावे, म्हणून त्यांनी आपल्या हजारो अनुयायांसह सत्याग्रह केला व याच वर्षी अस्पृश्यतेचा पुरस्कार करणारी “मनुस्मृती” जाळली. अस्पृश्यांना इतरांप्रमाणे देवाचे दर्शन घेता यावे, म्हणून त्यांनी १९३० साली काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. त्यांनी “बहिष्कृत भारत”, “जनता”, “समता”, इ. वर्तमानपत्रांद्वारे अस्पृश्यांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला व त्यांच्यात आत्मविश्वास, अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द, वाईट चालीरिती सोडून देण्याची प्रवृत्ती व शिक्षणाची आवड निर्माण करुन त्यांचा स्वाभिमान जागृत केला.

पुणे करार
इ.स. १९२० च्या दशकाच्या अखेरीस आंबेडकर दलितांचे एक नामवंत राजकीय नेते बनले होते. जातिसंस्थेविरुद्ध काहीही न करणर्‍या पक्षांना त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष बनवले. महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्यावर दलितांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप केला. ब्रिटिश सरकारावरही ते नाराज होते व त्यांनी दलितांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. ८ ऑगस्ट १९३० साली मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, मागासवर्गीयांनी काँग्रेस व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे त्यानी सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहाचा समाचार घेतला. या टीकेमुळे सनातनी हिंदू संतापले. इ.स. १९३२ साली राव बहाद्दूर राजा यांनी दोन उजव्या विचारसरणीच्या काँग्रेस नेते बी. एस. व जाधव यांबरोबर एक करार केला. या करारानुसार मुंज्यांनी राजांना पाठिंब्याच्या बदल्यात काही आरक्षित जागा अनुसूचित जातीमधील लोकांना देण्याचे ठरविले. या घटनेमुळे आंबेडकरांनी संपूर्ण भारतात दलितांसाठी विभक्त मतदारसंघांची मागणी केली. आंबेडकरांचे महत्त्व आणि दलितांमधील जनाधार वाढला आणि त्यांना इ.स. १९३१ साली लंडन येथील दुसर्‍या गोलमेज परिषदेचे निमंत्रण आले. या परिषदेत त्यांचे गांधीजींबरोबर विभक्त दलित मतदारसंघावरून मतभेद झाले. गांधीजींना धार्मिक वा जातीय आधारावर विभक्त मतदारसंघ मान्य नव्हते, त्यांना यामुळे भविष्यात हिंदू समाज दुभंगण्याची भीती वाटत होती. जेव्हा ब्रिटिशांनी आंबेडकरांची मागणी मान्य केली, तेव्हा गांधीजींनी येरवडा तुरूंगात उपोषण सुरू केले. सनातनी हिंदू समाजाला अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यास सांगून हिंदूंमध्ये राजकीय आणि सामाजिक एकी आणण्याचे आव्हान केले. गांधीजींच्या उपोषणाला लोकांकडून मोठा पाठिंबा मिळाला आणि हिंदू नेत्यांनी आंबेडकरांबरोबर येरवडा येथे बैठका घेतल्या. गांधीजींच्या मृत्यूनंतर दलित समाजाविरुद्ध दंगली होऊन विनाकारण त्रास होईल असे वाटून आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षित मतदारसंघांसाठी मान्यता दिली. यामुळे स्वतंत्र मतदारसंघ मिळाले नसले, तरी दलितांना जास्त जागा मिळाल्या. दलितांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधीजींनी खेळलेली राजकीय चाल असे आंबेडकरांनी या उपोषणाचे नंतर वर्णन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते. तिथे त्यांनी अस्पृश्यांची बाजू हिरिरीने मांडली. स्वतंत्र मतदारसंघाची त्यांची मागणी मंजूर झाली. त्यातूनच गांधी व आंबेडकर यांच्यांत मतभेद निर्माण झाले. गांधीजींनी उपोषण आरंभले. पुढे स्वतंत्र मतदारसंघांऐवजी राखीव जागा ठेवण्यासंबंधीचा पुणे करार गडून आला. १९३६ साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापन केली. ते प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून आले. १९४२ साली त्यांनी “ऑल इंडिया श्येड्युल कास्ट फेडरेशन” नावाचा देशव्यापी पक्ष स्थापन केला. या पक्षातर्फे त्यांनी अस्पृश्यांसाठी अनेक लढे दिले. १९४२ ते १९४६ पर्यंत ते व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री होते. अस्पृश्यांच्या शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी ते सदैव प्रयत्न करीत राहिले.

राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष
एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. प्रांतिक कायदेमंडळांना एक महत्त्वाचे काम करावयाचे होते. ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देऊ केले होते आणि स्वतंत्र होणार्‍या भारताचा राज्यकारभार राज्यघटनेनुसार होत राहावा, म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून घटना समिती तयार करावी आणि त्या घटना समितीने राज्य घटना तयार करण्याचे काम सुरू करावे, असे त्यांनी सुचविले होते. त्याप्रमाणे मध्यवर्ती आणि प्रांतिक कायदेमंडळांनी घटना समितीचे प्रतिनिधी सभासद निवडण्याचे काम केले. मुंबई कायदेमंडळात डा. आंबेडकरांच्या शेडयुल्ड कास्ट्स फेडरेशनचे निवडून आलेले सभासद नव्हते. त्यामुळे काग्रेस पक्षाच्या सहकार्याशिवाय ते मुंबई कायदेमंडळातून घटना समितीचे प्रतिनिधी सभासद होऊ शकत नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांना अस्पृश्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटना समितीचे सभासद होण्याची आवश्यकता वाटू लागली होती. तोपर्यंत मुंबई कायदेमंडळांच्या काग्रेसच्या सभासदांनी घटना समितीचे सभासद म्हणून ब. मुकुंद जयकर आणि के. एम. मुन्शी या दोघांची निवडही केली. त्यामुळे मुंबई कायदेमंडळाकडून डॉ. आंबेडकरांना निवडून देण्याचा प्रश्नच राहिला नाही. पण बंगाल प्रांताचे कायदेमंडळ डॉ. आंबेडकरांना सहकार्य करण्यास तयार झाले. ब. जोगेन्द्रनाथ मंडल आणि बंगाल प्रांताच्या कायदेमंडळाच्या मुस्लिम लीगच्या सभासदांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सभासद म्हणून निवडून येण्यास यशस्वी झाले. ते प्रथम पसंतीची ७ मते मिळवून काग्रेसचे उमेदवार सरतचंद्र बोस यांचा पराभव करून विजयी झाले. अखेर डॉ. बाबासाहेब आबेडकर अस्पॄश्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटना समितीचे सभासद होण्यात यशस्वी झालेच. २० अगस्ट १९४७ रोजी घटना समितीच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधीच्या सर्व कायदेशीर गोष्टी यांचा विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आल्याचे जाहीर केले आणि त्या समितीच्या सभासदांची नावेही जाहीर केली - डॉ. बी. आर. आंबेडकर, जी. व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार इत्यादी. २९ अगस्ट १९४७ रोजी घटना समितीने एक ठराव पास करून स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी डॉ. आंबेडकर यांच्यासह सात सभासदाची ’मसुदा समिती’ नियुक्ती केली आणि विधिमंत्री डॉ. बी. आर. आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. पिपल्स एज्युकेशन सोसायटी मार्फत त्यांनी मुंबईला सिद्धार्थ महाविद्यालय व औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. या शिक् णसंस्था दलित चळवळीच्या ऊर्जास्त्रोत बनल्या. भारत स्वतंत्र झाल्यावर ते केंद्रीय मंत्रिमंडळात विधिमंत्री झाले. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. अथक परिश्रम घेऊन त्यांनी संविधानाचा मसुदा तयार केला. म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते !

डॉ. आंबेडकरांचे धर्म विषयक दृष्टीकोण
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीकोणातून धर्मही मानवी संस्कृतीतून न टाळता येणारी बाब होती त्याच वेळी बर्‍याचशा सामाजिक असमानतानां धार्मीक परंपरा, रूढी आणि विचारधारा जबाबदार आहेत किमान पक्षी बर्‍याच वेळी विवीध धर्म संस्था समतेचे पाठह देत असल्यातरी खर्‍या अर्थाने त्या धर्मातील समाज समतेची पाठराक्षण करण्यास अयशस्वी झाला. भारतातील दलित समाजास जाती व्यवस्थेने निर्माण केलेल्या विषमतेस हिंदू धर्म जबाबदार असून आपण हिंदू म्हणून जन्माला आलोतरी हिंदू म्हणून मरणार नाही असा दृष्टीकोण घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी विवीध धर्मव्यवस्थांचा अभ्यास केला. भारतात हिंदू धर्माशिवाय इतर बरेच इत्यादी धर्मीयांची भारतात दिर्घ काळ सत्ता मोठ्या कालखंडात असूनसुद्धा जातीव्यवस्थेत होणार्‍या दलित शोषणास थांबवण्यासारखे बाजू घेण्यास इस्लामी राजवटी आणि समुदाय कमी पडला,अशीच काहीशी परिस्थिती इतरही समतावादी समजणार्‍या धर्म समुदायांची होती. त्याशिवाय इस्लाम आणि इतर बर्‍याच धर्मातील स्त्रीयांना समतेची वागणूक न मिळण्याबद्दलही डॉ.बाबासाहेबांचे आक्षेप होते. सरते शेवटी बाबासाहेबांनी बुद्धधर्माचा स्विकार करून त्यांच्या अनुयायांनाही तसे करण्याचा सल्ला दिला. जातीसंस्थेमुळे हिंदूधर्म पोखरला गेला आहे. अशी त्यांची ठाम समजूत होती. धर्मांतर केल्यावाचून अस्पृश्यांवर होणारा अन्याय दूर होणार नाही, अशी पक्की धारणा झाल्यानंतर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या अनेक अनुयायांसह नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यानंतर त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रसाराचे कार्य हाती घेतले. वाचन आणि लेखन हा बाबासाहेबांचा श्वास होता. ग्रंथाशिवाय आपण जगूच शकणार नाही, असे त्यांना वाटे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२० व्या जयंती निमित्त आम्हां समस्त आगरी बाणा परिवाराकडून भारतीय राज्यघटनाकाराला मानवंदना आणि विनम्र अभिवादन. बाबासाहेब तुम्ही दाखविलेल्या सामाजिक एकतेच्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न आम्ही आगरी बाणा मित्रपरिवार करत आहोत. तरी तुमच्या आशीर्वादाने आमच्या प्रयत्नास यश येवो हीच इच्छा.

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा फेसबुक संघटना.
आगरी बोली-आगरी बाणा.

सोमवार, ११ एप्रिल, २०११

सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले


आपल्या लोकांची मला हीच रीत पटत नाही. गल्लीतल्या नेत्यांचे वाढदिवस, आय.पी.एल स्पर्धेच्या संपूर्ण तारखा, गावांच्या जत्रांच्या तारखा असल्या गोष्टी लक्ष्यात ठेवतील पण ज्या माणसांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय, त्याच्यामुळे आपण इथे आहोत त्यालाच विसरण म्हणजे स्वार्थीपणाच म्हणायला हवा. मग माझ्यासारख्या काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या तरुण मंडळीना याचा त्रास होतो. तुम्ही श्रद्धेने देव देवतेना पूजा पण ज्यांनी तुमच्यासाठी केलंय त्यालाही विसरू नका.


आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. आपल्यापैकी किती जणांना याची माहिती होती?? पाटील साहेबांच्या विचारांवर चालणारा मी आणि पाटील साहेब महात्मा फुले यांना आदर्श मानतात. त्यामुळे माझ्यावरही महात्मा फुलेंच्या विचारांचा खूप मोठा पगडा आहे. सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची गोष्ट मला नेहमीच पटते. त्यानुसार मी प्रयत्न देखील करतो. आज ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती. पण अनेकांना हे माहितीच नाही. खूप वाईट गोष्ट आहे. मी नैसर्गिक शक्तीला मानतो तरीही तुम्ही मला नास्तिक म्हणा अथवा आस्तिक म्हणा मला काही फरक पडत नाही. फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईट वर तर आज दररोज नवीन नवीन देव निर्माण होत आहे. कधी क्रिकेटचा देव तर कधी आंदोलनाचा देव, कधी हा बुवा तर कधी हा गुरु. यांच्या भक्त्या करताना तुम्हांला वेळ नसेल भेटत ना?????????? करा करा त्यांच्याच भक्त्या करा. पण एक सांगतोय की, हे देव स्वतःच भल करून घेत आहेत. जनतेच्या नावाने ते चांगभलं करत आहेत. अजूनही त्यांच्याच भक्त्या करा, तुमच्या घरात काही अडचणी येणार तेव्हा हेच देव तुम्हांला वाचवायला येणार आहेत. जाऊदे मला काय करायचं????????? शेवटी मी कोण तुमचा????????? कोणीच नाही.................!!!!


ह्यांच्या नादात माझा विषय भरकटला. मुलींच्या तरी ही तारीख लक्ष्यात असायला हवी होती. कारण महात्मा फुलेंच्या कार्यामुळेच एक सावित्रीबाई निर्माण होऊ शकली. आणि त्यांच्यामुळेच तुम्ही आज हे वाचता आहात.

महात्मा ज्योतिबा फुले

११ एप्रिल,१८२७-२८ नोव्हेंबर,१८९०.

जीवनकार्य:


१८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.

१८४० - सावित्रीबाईंशी विवाह.

१८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.

१८४७- लहूजी बुवांकडे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.

१८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.

१८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.

१८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.

सप्टेंबर ७, १८५१ - चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.

१८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.

मार्च १५, १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.

नोहेंबर १६ १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.

१८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्स' स्थापन केली.

१८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.

१८५६ - जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.

१८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.

१८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.

१८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.

१८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

१८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.

१८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

१८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.

१८७५ - शेतकर्‍यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).

१८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.

१८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.

१८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.

१८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.

१८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली

१८८८- ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.

१८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली.

२८ नोव्हेंबर १८९० - पुणे येथे निधन झाले.


समाजकार्य:

पुरोहितांकडून होणार्‍या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. 'दीनबंधू' साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.

शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.-

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।

नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।


जीवन इतिहास:

महात्मा फुले म्हणाले. विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्र खचले एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. अडाण्यांच्या, अशिक्षितांच्या आणि अज्ञान्यांच्या डोळ्यांत विद्येचे महत्त्व प्रतिपादन करणारा इतका तेजस्वी मंत्र अख्ख्या जगात कुणी दिला नसेल! अशा या पूजनीय ज्योतिबा गोविंद फुले यांचा जन्म १८२७ साली पुण्यात झाला. त्यांची आई चिमणाबाई ही ज्योतिबा अवघे नऊ महिन्यांचे असताना निवर्तली. मग ज्योतिबाचा सांभाळ त्यांच्या आजीने केला. फुल्यांचे घराणे माळी जातीतील. त्यावेळी पुण्यात मीठगंज व भवानीपेठ यांना जोडून फार मोठा मळा होता. फुल्यांचे वडील - गोविंदराव याच ठिकाणी बागकाम करीत. मीठगंज पेठेत तेव्हा त्यांचे राहाते घर होते. अर्थातच आता तेथे फुले स्मारकाची जागा आहे. पुढे १८१८ साली पेशवाईची अखेर झाली व इंग्रजी राज्याची सुरुवात झाली. पेशवाईच्या अखेरीस कितीतरी अनन्वित व अत्याचारी कृत्ये घडली, "पुणे' हे पेशव्यांच्या राजधानीचे शहर. राज्य वाचवण्यासाठी दुसऱ्या बाजीरावास भटाभिक्षुकांनी फसवले. सरकारी खजिन्यातून ब्राह्मणभोजने व दक्षिणा वाटपांच्या पुण्यसंचयामुळे आपले राज्य वाचेल अशी बिचाऱ्याची सात्विक समजूत! अशा काळात गरिबांचे व दलितांचे हाल किती झाले असतील! अस्पृश्य मानलेल्या माणसाचे घर तर भर उन्हात! अशावेळी या समाजाला सहकार्याचा सुधारणेचा, समाजप्रबोधनाचा हात कोणी दिला असेल तर तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी. त्यांना या कामात कुठल्याही प्रकारची कुरकुर न करता हाल अपेष्टा, छळ सोसून मदत केली ती त्यांच्या पत्नी वंदनीय सावित्रीबाई यांनी. त्या काळात त्यांचे समाजप्रबोधनाचे कार्य म्हणजे समाजक्रांतीच होती. आपल्या या समाजक्रांतीच्या कार्याला स्थिर आणि संघटित स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी म. फुले यांनी १८७३ साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली व १८८९ साली "सार्वजनिक सत्यधर्मी' हे पुस्तक लिहून त्याची तत्वप्रणाली व धर्मविधी त्यांनी लोकांपुढे ठेवले व आपल्या अनुयांयासह प्रत्यक्ष कार्यास वाहून घेतले. हे कार्य करीत असताना ज्योतिरावांनी बहुजनसमाजाच्या आणि अस्पृश्यांच्या गळ्यात, हजारो वर्षे - धार्मिक गुलामगिरीच्या, अंधश्रध्देच्या, विषमतेच्या आणि ब्राह्मण्याच्या चिकटवलेल्या जळवा नष्ट केल्या आणि राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व आर्थिक समतेचा दीपस्तंभ संबंध भारताच्या मार्गदर्शनासाठी उभा केला. आज बहुजनसमाज वरील सर्व बाबतींत पुढारलेला दिसतो आहे, त्याच्या मागे फुल्यांचे अथक परिश्रम आहेत. स्त्रियांच्या, दलितांच्या आणि बहुजनसमाजाच्या वर्गावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द आंदोलन करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी १८८३ साली "शेतकऱ्यांचा असूड' हे पुस्तक लिहिले व अन्नधान्य पिकवून समाजाचे पोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची गाऱ्हाणी परखडपणे मांडली. शेतकरीवर्गावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द दंड थोपटून उभे राहणारे भारतातील पहिले समाजचिंतक म्हणजे महात्मा फुले. असंख्य लोकांत त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी वावरणाऱ्या ज्योतिरावांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला होता. आपण सामाजिक कार्य करतो, तरी आपला सत्यशोधक समाज ही गरिबांची संघटना आहे, तेव्हा आपण आपल्या कुटुंबाचा बोजा इतरांवर लादणे बरोबर नाही, अशी त्यांची भावना होती. पाण्यासाठी त्यांनी आपला हौद तर खुला ठेवलाच, पण भुकेलेलाही त्यांच्या घरी येऊन चार घास खाऊन तृप्त मनाने जायचा. आपल्या समाजसुधारणेच्या कार्याचे मर्म सांगताना त्यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की, "ब्रिटिश लोकांचे राज्य असूनही प्रत्यक्ष राज्यकारभाराची अंमलबजावणी करणारे लोक प्रामुख्याने ब्राह्मणच आहेत. म्हणून ब्राह्मणेतर अशिक्षित समाजाची हरएक बाबतीत नाडणूक होत आहे. जातिभेदातील उच्चनीच भाव पूर्वी इतकाच कठोरपणे पाळला जातो. मला हे सारे संपुष्टात आणायचे आहे. माझ्या कार्याचे महत्त्व कळल्यामुळे काही ब्राह्मण मित्र मला सहकार्याचा हात देत आहेत, ही ईश्वरी कृपाच म्हणायची.' मानवतावाद, विश्वबंधुत्व आणि कृतिशीलता ही ज्योतिरावांच्या जीवननिष्ठेची तीन प्रमुख अंगे होती सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून काही तत्त्वांचा प्रसार त्यांनी केला. ईश्र्वर एकच व निर्गुण-निराकार आहे. ईश्र्वराच्या भक्तीसाठी कोणालाही कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. धार्मिक कर्मकांडावर विश्र्वास ठेवू नका. हे विचार बहुजनांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.


त्यांनी `ईश्वर' नव्हे, तर `निर्मिक' असाच शब्द नेहमी वापरला. राजर्षी शाहू महाराजांना प्रेरणा मिळाली ती महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांतूनच ! महात्मा फुलेंना गुरू मानत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन विकासाची चळवळ पुढे नेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर व कार्यावर महात्मा फुले यांचाच प्रभाव होता.भारत देश हा कृषिप्रधान आहे आणि तरीही येथील शेतकरी अज्ञानी, कर्जबाजारी, दरिद्री, मागासलेला असा होता (आहे). यामुळेच या समस्या लक्षात घेऊन शेतकर्यांची बाजू मांडण्यास आणि त्यांचे संघटन करण्यास महात्मा फुले यांनी सुरुवात केली. शेतकरी, शेतमजूर यांच्या हालाखीच्या परिस्थितीचे त्यांनी शेतकर्यांचा आसूड या ग्रंथात वर्णन केले आणि या ठिकाणी शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही भूमिका परखडपणे मांडली. तसेच शेतकर्यांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षण मिळावे, वार्षिक कृषी प्रदर्शन भरवले जावे, पाणीपुरवठ्यासाठी तलाव-विहिरी-धरणे बांधावीत, पीकसंरक्षणासाठी बंदुक परवाने मिळावेत या मागण्यांचा पाठपुरावा केला. १८८८ साली त्यांनी ड्यूक ऑफ कॅनॉटसमोर भारतीय शेतकर्यांच्या वेषात शेतकर्यांचे प्रतिनिधित्व केले. शेतकर्यांच्या समस्या व त्या अनुषंगाने त्यावरील पर्यायी योजनांची बाजू मांडली.महात्मा फुले यांनी असंघटित कामगारांच्या समस्यांचाही विचार केला होता. कामगार संघटक नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८८४ मध्ये मुंबईत गिरणी कामगारांची संघटना स्थापन केली. लोखंडे यांनी महात्मा फुले यांच्या प्रेरणेतून ही संघटना स्थापन केली होती. हीच भारतातील पहिली कामगार संघटना मानली जाते. महात्मा फुले काही काळ पुणे नगरपालिकेचे सदस्यही होते. त्यांच्या चळवळीचे केंद्र पुणे हेच होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीचा जिर्णोद्धार महात्मा फुले यांनी केल्याचा उल्लेख त्यांच्याविषयीच्या लेखनात सापडतो.

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा फेसबुक संघटना.
आगरी बोली-आगरी बाणा.

गुरुवार, ७ एप्रिल, २०११

मेरा नेता चोर है.................


मेरा नेता चोर है.................


आत्ता वेळ येऊन ठेपली आहे काहीतरी करण्याची. कारण बदलाचे वारे सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचायला लागलेत. हीच वेळ आहे की, आपल्या सर्व भ्रष्टाचारी नेत्यांना आपली सर्वसामान्यांची जनशक्ती काय असते हे दाखवून द्यायची. पण हे मात्र नक्की की, सर्व राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या सर्व राजकीय पुढाऱ्यांनी "गेंड्याची कातडी" अंगाला लावली आहे. त्यामुळे या नेत्यांना कोणताही फरक पडणार नाही. हे लक्ष्यात घ्या की, कोणताही राजकारणी "भ्रष्टाचार विरोधी" कायदा स्वतःच्या कारकीर्दीत कधीच संमत करणार नाही. कारण असा कायदा संमत केला तर त्यांच्या खास तयार केलेल्या "गेंड्याच्या कातडीला" भोके पडू शकतात. त्यांची शक्ती तपासणारा कायदा राजकारणी मंडळी कधीच संमत करणार नाही. तुम्हा-आम्हाला यासाठी प्रयत्न करावेच लागतील. हे असले कायदे सहजा-सहजी संमत होणारच नाहीत. त्यासाठी आपल्याला अहिंसात्मक पद्धतीचा अवलंब करून लढा द्यावा लागेल. कितीतरी लेख, मागण्या, आर्जव इत्यादी करून देखील हे राजकारणी त्याला दाद देत नाही. ते जनतेचं कधीच ऐकत नाही. दाखविण्यासाठी म्हणून सी.बी.आय.(सेंट्रल ब्युरो ऑफ इनवेस्गेटीशन-राष्ट्रीय तपास यंत्रणा) आहे. जी राजकीय भांडेफोडी खास बनविण्यात आली आहे. पण प्रश्न हा आहे की, खरच ते निपक्षपातीपणे निर्णय घेऊ शकतात? कारण ज्या राजकीय व्यक्तींचा त्यांना तपास करायचा असतो त्या राजकीय व्यक्तींनीच त्यांना त्या पदावर नियुक्त केलेलं असत. आत्ता आपल्याला खरोखरच भ्रष्टाचार विरुद्ध लढाईसाठी स्वतंत्र अश्या शासकीय यंत्रणेची गरज आहे. ते आपल्याला "जन-लोकपाल विधेयकातून साध्य होणार आहे. हे विधेयक संमत करून घेणे खूप गरजेचे आहे. भारत स्वतंत्र होण्यासाठी भारतीय जनतेला खूप मोठी लढाई द्यावी लागली होती. हे "जन-लोकपाल" विधेयक संमत होण्यासाठी सर्वसामान्य भारतीय जनतेला तश्या प्रकारची चळवळ पुन्हा उभारावी लागेल. आपण सर्वानी मिळून एकत्र म्हणूया....................


"मेरा नेता चोर है.................!!"


यासाठी आपण फेसबुक चा वापर करु शकतो, अथवा अन्य साधनांचा उपयोग करू शकतो. हेही नाही करू शकलो तर एक मात्र नक्की करू शकतो की, "आगामी काळात येणाऱ्या निवडणुकात कोणत्याही राजकीय पक्षाला माझं मत विकणार नाही, टाकणार नाही. मत त्यालाच देईन जो माझा असेल. अन्यथा नकाराचा अधिकार वापरून सर्व उमेदवारांच्या विरोधात मत देणार." ही शपथ आपण सर्वानी घेणे खूप गरजेचं आहे. "नकाराचा अधिकार-सरकारने आपल्याला हा अधिकार दिलाय. याचा वापर करून आपण आपलं मत देऊ शकतो. पण ते सर्वांच्या विरोधात." कारण ५०० रुपयाच्या एका नोटेसाठी पुढची पाच वर्ष आपण भंगार प्रतिनिधी निवडून पाठवतो. भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून करायला हवी. नुसतचं बोलून काही होणार नाही.


आत्ता आपण "जन-लोकपाल" विधेयक काय आहे ते पाहुया:

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केलीय. तब्बल ४२ वर्षे झाली, कित्येक सरकारे आली अन् गेली, पण हे विधेयक संसदेत संमत झालेलं नाही. सर्वप्रथम १९६९ मध्ये लोकपाल विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं. तिथे ते मंजूरही झालं मात्र त्याला राज्यसभेत मंजूरी मिळाली नाही. त्यानंतर १९७१, १९७७, १९८५, १९८९, १९९६, १९९८, २००१, २००५ आणि २००८ साली हे विधेयक मांडण्यात आले. मात्र अजूनही ते मंजूर झालं नाही. २००१ मध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत असताना हे विधेयक मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाले होते. त्यानंतरही संसदेनं त्याला संमती दिली नाहीच... तब्बल आठ वेळा हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं...पण ते संमत होऊ शकलं नाही. गेली ४२ वर्षे मंजूर होऊ न शकलेल्या या विधेयकात अशा नेमक्या कोणत्या तरतूदी आहेत ज्यामुळे ते मंजूर करण्यासाठी राजकीय पक्ष टाळाटाळ करत आहेत. राजकीय नेत्यांकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची आणि त्यांना शिक्षा करण्याची तरतूद या विधेयकात आहे. या विधेयकानुसार भ्रष्टाचारासाठी पंतप्रधान, मंत्री आणि खासदार यांचीही चौकशी केली जाऊ शकते. असं असलं तरी सध्या जे विधेयक तयार करण्यात आलं आहे. त्याला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह अनेकांचा विरोध आहे. कारण या बदलानंतर हे विधेयक म्हणजे नखे आणि दात नसलेला म्हातारा वाघ असं हे विधेयक बनेल... म्हणजेच जन्म होण्यापूर्वीच गर्भपात... आपण कधी प्रचंड मताधिक्याने तर कधी थोड्याश्या फरकाने निवडून दिलेले खासदारच हा गर्भपात करण्यासाठी आग्रही आहेत. हा विरोध नेमका कशासाठी आहे. सध्या सरकारच्या वतीने मांडण्यात येणारे सरकारी (आधीच नसबंदी केलेलं) विधेयक आणि (अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अपेक्षित असलेलं) जनलोकपाल विधेयक यातील नेमका फरक पुढील प्रमाणे...


सरकारने जनलोकपाल विधेयक मंजूर करावे यासाठी अण्णा हजारे आग्रही आहेत. कारण हे विधेयक जनतेशी चर्चा करुन तयार करण्यात आले आहे. तसेच सरकार सध्या जे विधेयक मांडू पाहत आहे. त्यापेक्षा हे विधेयक अधिक चांगले असल्याचा अण्णा हजारे यांचा दावा आहे. जनलोकपाल विधेयक निवृत्त न्यायमूर्ती संतोष हेगडे, ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण आणि माहिती अधिकार कायदा विधेयक मंजूर होण्यासाठी लढा देणारे अरविंद केजरीवाल यांनी तयार केले आहे. सरकारी विधेयक आणि जनलोकपाल विधेयक यामध्ये मुख्य फरक असा आहे... सरकारच्या लोकपाल विधेयकात भ्रष्टाचाराविरोधात तक्रार दाखल करण्याचा अधिकार सामान्य जनतेला असणार नाही. खासदारांच्या भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार दाखल करताना सामान्य नागरिकांना लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल करावी लागेल. तर याउलट जनलोकपाल विधेयकात स्वतः लोकपाल कोणत्याही प्रकरणाची चौकशी सुरु करु शकतो. तसेच अशा प्रकारची चौकशी सुरु करण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही. सरकारी विधेयकानुसार लोकपाल केवळ सूचना देऊ शकतो. एखाद्या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर अधिकार प्राप्त संस्था अथवा व्यक्तीकडे सूचना पाठवण्याचा अधिकार लोकपालास असणार. केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांसंदर्भातील अंतिम निर्णय पंतप्रधान घेतील. तर जनलोकपाल विधेयकानुसार जनलोकपाल हीच एक स्वंतत्र संस्था असेल. त्यांच्याकडे कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार असेल. सरकारी लोकपाल विधेयकात लोकपालाकडे स्वतःची पोलिस यंत्रणा असणार नाही. तर जनलोकपाल विधेयकात लोकपालाकडे स्वतःची अशी पोलिस यंत्रणा असणार आहे. जर तक्रार खोटी ठरली तर तक्रार करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगात पाठवण्याची तरतूद सरकारी लोकपाल विधेयकात आहे. तर जनलोकपाल विधेयकात असा प्रकार झाल्यास तक्रार करणाऱ्याला आर्थिक दंड करण्याची दरतूद आहे. सरकारी विधेयकानुसार संसदेचे सदस्य, मंत्री आणि पंतप्रधान केवळ यांची चौकशी केली जाऊ शकते. तर जनलोकपाल विधेयकानुसार पंतप्रधान यांच्यासह सर्व नेते, अधिकारी, मंत्री, आणि न्यायमूर्ती यांची चौकशी केली जाऊ शकते. सरकारी लोकपाल विधेयकानुसार बनणाऱ्या संस्थेमध्ये केवळ तीन सदस्य असतील. हे सर्व सदस्य सेवानिवृत्त न्यायमूर्ती असतील. तर जनलोकपाल विधेयकामध्ये दहा सदस्य असतील. या समितीचा एक अध्यक्ष असेल. तर दहापैकी चारजण न्यायालयीन पार्श्वभूमीचे असतील. तर बाकीचे सदस्य अन्य क्षेत्रातील असतील. सरकारी विधेयकानुसार लोकपालाची नियुक्ती करणाऱ्या समितीमध्ये उपराष्ट्रपती, पंतप्रधान, दोन्ही सभागृहातील सदस्य, विरोधीपक्षातील नेते, गृहमंत्री आणि न्यायमंत्री यांचा समावेश असेल.


तर जनलोकपाल विधेयकानुसार न्यायसंस्थेशी संबंधीत काही लोक, मुख्य निवडणुक आयुक्त, महालेखा परीक्षक तसेच नोबेल आणि मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांचा यामध्ये समावेश असेल. या कायद्यानुसार चौकशी सहा महिने ते एक वर्षात पूर्ण करण्याची तरतूद आहे. तर जनलोकपाल विधेयकानुसार एका वर्षात चौकशी पूर्ण झालीच पाहिजे, तर एक वर्षात न्यायालयीन कारवाई पूर्ण झाली पाहिजे अशी तरतूद करण्यात आली आहे. सरकारी लोकपाल विधेयकानुसार अधिकारी आणि न्यायमूर्ती यांची चौकशी करण्याची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. तर जनलोकपाल विधेयकात यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच अधिकाऱ्यांना पदावरुन काढून टाकण्याचा अधिकार लोकपालास देण्यात आला आहे. सरकारी लोकपाल विधेयकानुसार दोषी व्यक्तीला केवळ सहा ते सात महिन्यांची शिक्षा होऊ शकते. मात्र घोटाळ्यातील रक्कम परत घेण्याची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. याउलट जनलोकपाल विधेयकानुसार दोषी व्यक्तीस कमीत कमी पाच वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. तसेच दोषी व्यक्तीने जितक्या रकमेचा घोटाळा केला आहे. ती सर्व रक्कम परत मिळवण्याची अतिशय महत्त्वाची तरतूद जनलोकपाल विधेयकामध्ये आहे. जर लोकपालच भ्रष्टाचारी असल्याचे स्पष्ट झाले तर त्याला पदावरुन हटवण्याचे अधिकार जनलोकपाल विधेयकात आहे. यासाठीच या विधेयकामध्ये केंद्रीय दक्षता आयोग, सीबीआय आणि भ्रष्टाचार विरोधी खात्याचा समावेश करण्यात आला आहे.


जनलोकपाल कायद्यातील काही प्रमुख तरतुदी -

१.कोणत्याही खटल्याची चौकशी एका वर्षात पूर्ण होईल, तर सुनावणी त्या पुढील एक वर्षात पूर्ण होईल. यात न्याय पालिकेतील लोकांचाही समावेश असेल.

२.अपराध सिद्ध झाल्यानंतर सरकारचे जे नुकसान झाले ते भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात येईल.

३.लोकपाल नागरिकांची कामे वेळेत न झाल्यास संबंधित नागरिकास जे नुकसान होईल ते जबाबदार अधिकाऱ्याकडून वसूल करण्यात येईल.

४. रेशन, काळाबाजार, मतदान ओळखपत्र, पोलीस तक्रार यामध्ये लालफितीचा कारभार झाल्यास दोन वर्षांच्या आत या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल.

५. लोकपाल कोण असेल? जर तोच भ्रष्ट निघाला तर?- लोकपालाची निवड न्यायपालिका, नागरिक, संवैधानिक संस्था ( उदा.निवडणूक आयोग) यांच्या मार्फत अत्यंत पारदर्शी पद्धतीने होईल.

६. जर लोकपाल भ्रष्ट निघाला तर..- दोन महिन्यांच्या आत लोकपाल विरोधातील तक्रारीचे निवारण करता येईल

आपलाच,
आमोद पाटील.
अध्यक्ष-आगरी बाणा फेसबुक संघटना.
आगरी बोली-आगरी बाणा.