आमोद पाटील-आगरी बाणा: नोव्हेंबर 2010

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०१०

आचकन् मचकन् मल्याला



आचकन् मचकन्  मल्याला


आचकन् मचकन् मल्याला
पानी जाऊं दे दंडाला ।।
पानी जाऊं दे दंडाला
नाखवाचे होरक्याला ।। धृ० ।।

आचकन् मचकन् कलीचा मोगरा
फुलैला मोगरा शेंड्यावर केवरा
वाजवू रे दादा बरवी किनारी
नाचू गो लागल्या कोलनीच्या पोरी
आचकन् मचकन् मल्याला
पानी जाऊं दे दंडाला ।। १ ।।

बाजारी आयली नेसून सारी
हलूच डोला नाखवाला मारी
कुलाब्याची दांडी दांडीवर बत्ती
दर्यान् परतंय उजेर वरती
आचकन् मचकन् मल्याला
पानी जाऊं दे दंडाला ।। २ ।।
कोंबरा करतंय कुकूचकू

कोंबरा करतंय कुकूचकू
मांडवान् उभी हाय बायकू ।। धृ ।।

तिला सजविले मुंडवल्याशी
वाशिंग बांधलय गो माथ्याशी
बाजा वाजतंय गो दाराशी
गर्दीन् तिला कशी निरखू
मांडवान् उभी हाय बायकू ।। १ ।।
कोंबरा करतंय कुकूचकू

दाटी झायली गो पावन्यांची
घटका भरली गो लग्नाची
झाली धावपल करवाल्यांची
जमल्या सखू ठकू
मांडवान् उभी हाय बायकू ।। २ ।।
कोंबरा करतंय कुकूचकू

हात बायकूचा मिनी धरला
सात भोवरी जोरा फिरला
चावूल आमचेवरी परला
बाजा बोलं धाकटूमाकू
मांडवान् उभी हाय बायकू ।। ३ ।।
कोंबरा करतंय कुकूचकू

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०१०

पोरी तुजेवरी जीव हाय गो

पोरी तुजेवरी जीव हाय गो


पोरी तुजेवरी जीव हाय गो
गोमू जो-यानं मुंबैला जाव गो ।। धृ० ।।

जगान् वाजते मुंबैचा डंका
रंक रावाची झाली ती लंका
लोक येतान् सोनूरशी गांव गो
पोरी तुजेवरी जीव हाय गो

पोरी तुजेवरी जीव हाय गो
गोमू जो-यानं मुंबैला जाव गो ।। धृ० ।।

जगान् वाजते मुंबैचा डंका
रंक रावाची झाली ती लंका
लोक येतान् सोनूरशी गांव गो
गोमू जो-यानं मुंबैला जाव गो ।। १ ।।

बोरीबंदराची झुकझुक गारी
बशी मोटारी धावतान् या भारी
होरी भाऊचे धक्क्याला लाव गो
गोमू जो-यानं मुंबैला जाव गो ।। २ ।।

फोनूवाल्याचे दुकान जाऊ
कुत्रा छापाच्या रेकारडी घेऊ
गानं वनमालीचं ते गाऊं गो
गोमू जो-यानं मुंबैला जाव गो ।। ३ ।।

पोरी तुजेवरी जीव हाय गो
गोमू जो-यानं मुंबैला जाव गो ।।
लग्नाची तयारी कर गो पोरी

लग्नाची तयारी कर गो पोरी
बांधिले तुला मी सातखनी मारी ।। धृ० ।।

घेऊनशी ठेविल्यान् बांग-या बिलोरी
सोन्याच्या पाटल्या नि गल्यानची सरी
बुगड्या नि तोडे आंजिरी सारी
बांधिले तुला मी सातखनी मारी ।। १ ।।

धारलंय गो सांगनं घरोघरी
नाचाला येतीन मालनीच्या पोरी
छान् छबेली आपली जोरी
बांधिले तुला मी सातखनी मारी ।। २ ।।

तलनाला येतीन् शेजुलच्या नारी
वडे-पोले आनि सांगोती सरी
खालुचे बाजीची जंगी तयारी
बांधिले तुला मी सातखनी मारी ।। ३ ।।

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.