आमोद पाटील-आगरी बाणा: 2010

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

गुरुवार, ३० डिसेंबर, २०१०

Porino Bhakrya Yetan N....??



Porino Bhakrya Yetan N....??

Tandlachi(chavalanchi) bhakri:
Tandlachi bhakri is the humble Rice flour bread. Its a staple in Agri families. In old times(not now because nowday's everything is change) Agri's Mornings begin with this bhakri made fresh and the previous night's machhi kalvan otherwise bhaji,aamti for breakfast.
Back to the Bhakri....

Ingredients:
1 cup rice flour
1/2 cup water

Information Source:
Aai.

Instruction:
Boil the water in a pan and as its boiling slowly add the rice flour into it and stir with a rolling pin. Remove from heat now knead the flour properly. The more you knead the bhakri will be easier to make. If too hard dip your hand in water and knead to make it like regular chapati dough.

Now this is a tough one and a test for a Agri bride-to-be.
"Bhakrya yetan ka?"
the bride-to-be is asked which means do you now how to make bhakri?

So lets begin, first sprinkle some water on a plate and wet it evenly by moving your palm over the plate this action is like your wiping the plate. Then take a small ball from the dough you kneaded. Then flatten the ball into a bhakri. Keep the plate surface wet and keep moving the bhakri in circular dirrection just like you would beat a bhakri on dry flour. If the bhakri is sticking to the plate keep wetting the plate with water intermottently. When the bhakri is big like a chapati hold part of the bhakri on the left palm and part in the plate and with the right palm beat the edge and keep moving the bhakri in circular fashion. Keep wetting the plate with little water. The bhakri should be thin. Traditionally the bhakri is shaped in flat iron tava which you might have seen at pav-bahji stalls. This tava is the cold tava. After shapping it is roasted on a terracotta tava heated with wood fired stoves. These two things give the special taste that is so wonderful. However don't sulk its good enough to roast the bhakri on any kind of tava. Remember when you are roasting the bhakri. The smooth surface stays on the top and rough surface should face the hot tava. Again sprinkle water on the bhakri and spread it around in a circular movement. This is done so that the bhakri should puff up when the other side is roasted. After the steam has subsided lift the bhakri and turn it over to roast the second side. Make sure the edges are roasted well too. Then turn it over to the first side again and put a flat spoon under it so that it does not stick to the tava. It should puff up nicely. A good bhakri is roasted on high heat and it should have one thick side and one paper thin side. Tandalachi bhakri is a cultured palate stuff so some might not like it. This bhakri goes with any spicy dish like talele bavachi tukri(fried fish), bavacha kalvan,gavthi kombryacha rassa etc.

Amod Patil.
Agri Bana.
Agri Samaj.

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०१०

काल होता शनिवार



काल होता शनिवार


काल होता शनिवार, आज हाय शनिवार केली गड्या तुरीची डाळ
चकण्या डोळा सांभाळ तुझा डोळा साभाळ ।। धृ० ।।

उनाड पोरं घरोघरी कामधंदा ना मुळी करी
उभे राहती नाक्यावरी नजर फिरते पोरीवरी
असे हरिचे हे लाल चकण्या डोळा सांभाळ ।। १ ।।

जुगार दारू मटक्याची संवय त्यांना व्यसनाची
मुळीना पर्वा जीवनाची संगत नडते मित्रांची
पिवुनी करती धमाल चकण्या डोळा सांभाळ ।। २ ।।

जगाचा जवळी ये अंत गरीबाला पोटाची भ्रांत
कित्येक होती श्रीमंत नीतिची त्यांना ना खंत
खाती ते दुस-याचा माल चकण्या डोळा सांभाळ ।। ३ ।।

बेकारी तर झाली अपार म्हागाईला चढली धार
अत्याचार उत हा फार गरीबीला ना कुठे आधार
हा कलियुगाचा काळ चकण्या डोळा सांभाळ ।। ४ ।।

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०१०

आचकन् मचकन् मल्याला



आचकन् मचकन्  मल्याला


आचकन् मचकन् मल्याला
पानी जाऊं दे दंडाला ।।
पानी जाऊं दे दंडाला
नाखवाचे होरक्याला ।। धृ० ।।

आचकन् मचकन् कलीचा मोगरा
फुलैला मोगरा शेंड्यावर केवरा
वाजवू रे दादा बरवी किनारी
नाचू गो लागल्या कोलनीच्या पोरी
आचकन् मचकन् मल्याला
पानी जाऊं दे दंडाला ।। १ ।।

बाजारी आयली नेसून सारी
हलूच डोला नाखवाला मारी
कुलाब्याची दांडी दांडीवर बत्ती
दर्यान् परतंय उजेर वरती
आचकन् मचकन् मल्याला
पानी जाऊं दे दंडाला ।। २ ।।
कोंबरा करतंय कुकूचकू

कोंबरा करतंय कुकूचकू
मांडवान् उभी हाय बायकू ।। धृ ।।

तिला सजविले मुंडवल्याशी
वाशिंग बांधलय गो माथ्याशी
बाजा वाजतंय गो दाराशी
गर्दीन् तिला कशी निरखू
मांडवान् उभी हाय बायकू ।। १ ।।
कोंबरा करतंय कुकूचकू

दाटी झायली गो पावन्यांची
घटका भरली गो लग्नाची
झाली धावपल करवाल्यांची
जमल्या सखू ठकू
मांडवान् उभी हाय बायकू ।। २ ।।
कोंबरा करतंय कुकूचकू

हात बायकूचा मिनी धरला
सात भोवरी जोरा फिरला
चावूल आमचेवरी परला
बाजा बोलं धाकटूमाकू
मांडवान् उभी हाय बायकू ।। ३ ।।
कोंबरा करतंय कुकूचकू

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०१०

पोरी तुजेवरी जीव हाय गो

पोरी तुजेवरी जीव हाय गो


पोरी तुजेवरी जीव हाय गो
गोमू जो-यानं मुंबैला जाव गो ।। धृ० ।।

जगान् वाजते मुंबैचा डंका
रंक रावाची झाली ती लंका
लोक येतान् सोनूरशी गांव गो
पोरी तुजेवरी जीव हाय गो

पोरी तुजेवरी जीव हाय गो
गोमू जो-यानं मुंबैला जाव गो ।। धृ० ।।

जगान् वाजते मुंबैचा डंका
रंक रावाची झाली ती लंका
लोक येतान् सोनूरशी गांव गो
गोमू जो-यानं मुंबैला जाव गो ।। १ ।।

बोरीबंदराची झुकझुक गारी
बशी मोटारी धावतान् या भारी
होरी भाऊचे धक्क्याला लाव गो
गोमू जो-यानं मुंबैला जाव गो ।। २ ।।

फोनूवाल्याचे दुकान जाऊ
कुत्रा छापाच्या रेकारडी घेऊ
गानं वनमालीचं ते गाऊं गो
गोमू जो-यानं मुंबैला जाव गो ।। ३ ।।

पोरी तुजेवरी जीव हाय गो
गोमू जो-यानं मुंबैला जाव गो ।।
लग्नाची तयारी कर गो पोरी

लग्नाची तयारी कर गो पोरी
बांधिले तुला मी सातखनी मारी ।। धृ० ।।

घेऊनशी ठेविल्यान् बांग-या बिलोरी
सोन्याच्या पाटल्या नि गल्यानची सरी
बुगड्या नि तोडे आंजिरी सारी
बांधिले तुला मी सातखनी मारी ।। १ ।।

धारलंय गो सांगनं घरोघरी
नाचाला येतीन मालनीच्या पोरी
छान् छबेली आपली जोरी
बांधिले तुला मी सातखनी मारी ।। २ ।।

तलनाला येतीन् शेजुलच्या नारी
वडे-पोले आनि सांगोती सरी
खालुचे बाजीची जंगी तयारी
बांधिले तुला मी सातखनी मारी ।। ३ ।।

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०१०

आगरातली आगरी बोली-1© AGRI BOLI



आगरातली आगरी बोली-१


दर्यावरचा कोळी, आगरातला आगरकर-आगरी, माळातला माळी आणि रानातला आदिवासी अशा भौगोलिकदृष्ट्या कोकणातल्या आगरातील वसाहती. आगर म्हणजे भात, मीठ, नारळ, सुपारी, भाजीपाला, फळे व मासे संवर्धन करण्याची जागा. (थोडक्‍यात, प्लांटेशन) असे आगर पिकविणारा तो आगरकर-आगरी. या आगरी समाजाची वस्ती रायगड (पूर्वीचा कुलाबा), ठाणे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कोकण सोडून धुळे, जळगावपासून गुजरातपर्यंत ती तुरळक प्रमाणात आहे. या समाजाची बोली ती आगरी बोली, असे या बोलीचे नामकरण करता येईल, परंतु आगरी ही एक जात समजली जाते. तेव्हा अशी जातीची बोली- आगरी बोली म्हणणे संकुचितपणाचे आहे. शिवाय ही बोली हाच समाज बोलतो असे नाही, तर आगरातील बलुतेदार, आदिवासी यांच्याबरोबर दुकानदार-मारवाडीही प्रसंगपरत्वे ही बोली बोलतात. शिवाय कोळी, माळी हे समाज जवळ असल्याने त्या बोलींची मिश्रता या बोलीत आहे. तेव्हा सर्वसमावेशक दृष्ट्या या बोलीस आगरातील बोली- "आगर बोली' म्हणणे संयुक्तिक वाटते.ही आगर बोली समुद्राकाठची असल्याने हीत उच्चारस्पष्टता हवी तशी नाही. विरार-वसईकडे ही बरीचशी अनुनासिक आहे; तर अलिबागकडे तशी स्पष्ट आहे. ही बोली जवळजवळ प्रत्येक गावानुसार थोडीशी बदलते. मुंबईतील हा मूळ समाज ही बोली विसरला आहे; तर नवी मुंबईतील ही बोली कोळी समाजबोलीमिश्रीत अशी आहे. वसई-पालघरकडे ही बोली वाडवळ, भंडारी बोलीमिश्रीत अशी येते.आगरी समाजाचे पूर्वी 1) शुद्ध आगरी, 2) दस आगरी व 3) वरप आगरी असे पोटजातीत वर्गीकरण होत होते. शुद्ध आगरीत मीठ आगरी, जस आगरी व ढोल आगरी असे उपपोट प्रकार होते. आज मात्र असे प्रकार मानले जात नाहीत. खुद्द मुंबाआईच्या मुंबईत चौदा पाटील, बारा पाटील, आगळे आगरी असे स्तर मानले जात, तेही आता मानले जात नाहीत.आगर बोलीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे "ळ'च्या ऐवजी "ल' व "ण'च्या ऐवजी "न' जसे सकाळ- सकाल, पळव-पलव, कोण-कोन, बाण-बान, वळण-वलन.या बोलीची रूपे व काही शब्द महानुभाव पंथीय व भागवतधर्मीय ग्रंथलेखनात दिसून येतात. विशेषतः लीळाचरित्र, दृष्टांतपाठ व ज्ञानेश्‍वरीत जास्त प्रमाणात दिसतात. आगरात लोकगीते व लोककथा यांचा भरणा जास्त आहे. ही लोकसंपदा म्हाताऱ्या आजीकडून- डोकऱ्यांकडून ऐकायला कर्णमधुर वाटते.गाय बा चऱ्हतं भीमा तीरी गो,भीमा तीऽऽरीगायला राखीत किस्न हरी गो,किस्न हऽऽरीकाय बा वर्नू गायची शेपू गोगायची शेऽऽपू,जशी नांगीन घेतं झेपू गो,नांगीन घेतं झेऽऽपूकाय बा वर्नू गायच्या मांड्या गो,गायच्या मांऽऽड्याजशा पालुखीच्या दांड्या गोपालुखीच्या दांऽऽड्याइथे तेराव्या शतकातील प्राकृत बोलीतील शेपू, नाकू, कानू अशी रूपे साकारलेली दिसतात.आगर बोलीत लोककथा अमाप आहेत. या लोककथा सांगताना अलिबागच्या आगरात नेहमी गोष्टीच्या ओनाम्याला येते ती तीन भावंडांची गोष्ट-अकामकची गोष्टयक व्हता अका, यक व्हात मका. आन्‌ त्या दोघांची यक बह्यनीस व्हती हिजू. त अका, मका आन हिजू गेली खारीन, झोलाला. अकला मिलला निवटा, मकला मिलला खरबा आन हिजूला मिलली कोलबी. तिघाजना आली घरा. अकनी निवटा टाकला चुलीन भुजत, मकनी खरबा आन हिजूनी कोलबी टाकली भुजत. न तिघाजना गेली नदीवर आंग धवाला. तिघाजना आंग धऊनशी आली, त हिजूची कोलबी करापली! मंग अकनी दिला डोचूक, मकनी दिला शेपूट आन हिजूचा जवान केला चालता. अशी तिघाजना जवली.(यक- एक, व्हता- होता, खारीन- खाडीत, झोलाला- मासे पकडायला, निवटा (खरबा, कोलबी)- मासळीचे प्रकार, चुलीन- चुलीत, भुजत- भाजत, आंग धवाला- आंघोळीला, करापली- करपली, डोचूक- डोके, जवान- जेवण. कावला-चिरीची गोष्टयकदा कावला आन चिरीनी केली भागीन भातशेती. यलंवर पाऊस परला, आगोठ लागली. कावलनी धरला नांगर, चिरीनी केली भातपहिरनी. यलवर लावनी केली. चांगला पाऊस झाला. मस्त मशागत केली. जाम पीक आला. दोघाही मिलून लानी केली, भांदनी केली. मातर कावलनी यकटनीच मलनी काऱ्हली आन भाताच्या भरल्या बारीक गोनी, पलजीच्या भरल्या म्होट्या म्होट्या गोनी. आन चिरीला बोलला, "चिरबाय, तुल्हा या म्होट्या गोनी घे, मना बारक्‍या गोनी दे. "चिरीनी गोनी हालवून बघितल्या. ती कावलचा कावा समाजली. ती बोलली, "कावलंदादा, माझा बारका जीव मना बारक्‍या गोनी दे, तू म्होटा तुला म्होट्या गोनी घे.' पन कावला काय ऐकना. शेवटी परकरन गेला न्यायाधीसाकरं. त्यांनी केला न्याय आन चिरीला तिचा हिस्सा-वाटा मिलवून दिला. चिरी बोलली, "कावलंदादा, तुझी माझी आथा वाट यगली. तू तुझे वाटन जा, मी माझे वाटन.'दृष्टांतपाठात शोभाव्या अशा किती तरी आगर बोलीत लोककथा आहेत. अशी बोली ऐकताना या बोलीची काही वैशिष्ट्ये नोंदता येतील.1) "ळ' बद्दल "ल'- कंटाळा- कंटाला, नळ- नल, धूळ- धूल.2) "ण' बद्दल "न'- आठवण- आठवन, पण- पन, गोण- गोन.3) शब्दात प्रथम येणारा "ड' तसाच राहतो मात्र नंतरच्या "ड'चा "र' होतो. डबा- डबा, डसा, कडू- करू, वेडा- यरा, तडांग- तरांग.4) शब्दान्ती येणारा ओकार ऊकार होतो- गेलो- गेलू, आलो- आलू.5) ओकारान्त शब्द अकारान्त होऊन पुढे "स' येतो- घेतो- घेतस, मारतो- मारतस, करतस, जातस इ.6) शब्दान्ती "त' ऐवजी "व' येतो- घेतलात- घेतलाव, बघितलेत- बघितलाव, केलाव, तोरलाव इ.7) एकारान्त शब्द अनुस्वारान्त होतो- कुठे- कुठं, तिथे- तिथं, इथं.8) एकारान्त अनेक वचनात आकारान्त होते- झाडे- झारा, पोरे- पोरा, लाकडा, शेता.9) अनुस्वार स्पष्ट उच्चारला जात नाही- आंबा- आऽबा, चिंच- चिऽच, रंग- रऽग, हंडा- हाडा, पिंपळ- पिपल, खुंट- खूट.10) छ चा सर्रास स होतो- छत्री- सत्री, छोटा- सोटा, छोकरा- सोकरा, छगन- सगन, छडी- सरी.11) शब्दान्ती कटोर व्यंजन येऊन तत्पूर्वी व आला तर व चा अर्धा व होऊन त्यापुढे महाप्राण येऊन अन्तीच्या कठोर व्यंजनाचा र होतो- केवडा- कव्हरा, तेवढा- त्यव्हरा, जेवढा- जव्हरा.12) शब्दाच्या सुरुवातीच्या र चा कधी ल होतो- रडतोय- लरतय, रबर- लबर,13) जोड शब्दातील र वेगळा उच्चारला जातो- प्रकाश- परकास, मात्र- मातर, कात्री- कातर, श्रीमंत- शीरीमंत.14) श चा स होतो- शरद- सरद, शाप- सराप, शोध- सोद.15) सुरुवातीचा वि जाऊन त्याजागी इ. येतो- विमान- इमान, विमल- इमल, विषय- इषय, विरजण- इरजन.16) पण ऐवजी पन किंवा बी येते- मीपण- मीपन/बी, तू पण- तूपन/बी (सुद्धा ह्या अर्थाने- तू सुद्दा चल- तूपन/बी चल).

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

आमची आगरी बोली-2 AGRI BOLI



आमची आगरी बोली-२


17) ऊन, हून प्रत्ययाऐवजी शी येतो- गर्दीतून- गर्दीशी, गावातून- गावानशी, लांबून- लांबशी, गावाहून- गावशी.18) ला प्रत्यया ठिकाणी ल+महाप्राण येतो- तुला- तुल्हा, तिला- तिल्हा. मलाचे मना होते.19) त ऐवजी न येतो- फुलात- फुलान, रानात-रानान, मनात- मनान.20) नो (संबोधन) ऐवजी नू किंवा हू येतो- पोरांनो- पोरांनू/पोरांहू, गाववाल्यांनो- गाववाल्यानू/हू.21) "प्रमाणे' ऐवजी सारा/सारी येते- त्याप्रमाणे- त्या सारा/री मुलाप्रमाणे- मुलासारा, साखरेप्रमाणे- साकरंसारा.22) "होता', "नव्हता' ऐवजी "व्हता', "नता' येते.23) "आता'चे "आथा' होते- आथा कल्हा लरतस?24) "अ'चा सर्रास "आ' होतो- अंग-आऽग, अंतर- आंतर, असा- आसा.25) कशालाचे कन्हाला किंवा कल्हा होते- कन्हाला आलास?26) "वे' ऐवजी "य' येतो- वेडा- यरा, वेस- यस, वेगळा- यगला, वेद- यद, वेसण- यसन.27) "म' ऐवजी "म्ह' येतो- महादेव- म्हादेव, मोठा- म्होटा, मारुती- म्हारोती, महाराज- म्हाराज.28) "ढ' ऐवजी "ऱ्ह' येतो- गाढव- गाऱ्हव, पेढा- पेऱ्हा, कढी- कऱ्ही.29) सुरुवातीच्या "ओ' ऐवजी "व' येतो- ओटा- वटा, ओवा- ववा, ओकारी- वकारी, ओल- वल.30) "ए' ऐवजी "य' येतो- एक- यक, एकदा- यकदा, एवढा- यवऱ्हा.31) शेवटच्या ईऐवजी य येतो- सुई- सुय, रुखमाई- रुखमाय, आई- आय, घाई- घाय, जावई- जावय.32) सुरुवातीचा ऐ कार जाऊन मूळ अक्षरापुढे ई कार येतो- बैल- बईल, म्हैस- म्हईस, वैद्य- वईद, मैल- मईल, खैर- खईर, सैल- सईल.33) सुरुवातीचा औ कार जाऊन मुळाक्षरापुढे ऊ येतो- मौज- मऊज, गौर- गऊर, फौज- फऊज, हौद- हऊद, कौल- कऊल.अशी ही उत्तर कोकणची आगर बोली मराठी सारस्वतात पूर्वी लेखनात न आल्याने फारशी रुळली नाही, पण तशी ही समजण्यास कठीण मात्र नाही.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

आगरी माणसासारखीच त्याची आगरी भाषा AGRI BHASHA



आगरी माणसासारखीच त्याची आगरी भाषा

"गल्यान्‌ साखली सोन्याची ही पोरी कोनाची' या लोकप्रिय गाण्याशिवाय आजही महविद्यालयातील विद्यार्थ्यांची पिकनिक पूर्ण होत नाही. या गाण्याचे बोल जसे उच्चारासाठी सहज आणि सोपे वाटतात. हे गाणं आहे आगरी बोलीतलं. ही बोलीभाषा असली, तरी ती भारदस्त आणि कणखरही आहे. या भाषेवर कोळी आणि कोकणी भाषेचा काहीसा प्रभाव जाणवतो. ९०च्या दशकापासून समजातील बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागले. त्यामुळे आता समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित आणि उच्चपदावर आढळतात. सध्या खेडेगावात आगरी भाषा बोलली जाते. पण शहरातील सुशिक्षित मंडळी आगरी भाषा अभावानेच बोलतात. ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यातील मूळ समाज आगरी आहे.
आगरी शब्दातील मूळ शब्द आगर. आगर म्हणजे भात, भाजीपाला, फुले, मीठ तयार करण्याची जागा. या शब्दावरून आगर पिकविणारा तो आगरी. भातशेती हे या समाजाचे मुख्य उद्दीष्ट. समुद्र, खाडी किनारी समाज मोठ्या संख्येने आहे. आगरी लोकांना कुणबी, खारकी अशीही विशेषणे आहेत. आगरी समाजातील शेतकऱ्याला कुणबी या अर्थाने ओळखले जात असे. जुन्या पुस्तकांमध्ये आगरी समाजाचा उल्लेख कुणबी म्हणून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारावरील मावळे हे आगरी, कोळी समाजातील होते. पुस्तकांमध्ये आरमारकरी, तराकेवाले असा आगरी समाजाविषयी उल्लेख आहे. अलिबाग, पालघर, डहाणू परिसरातील आगरी समाजाला खारपाटी म्हणूनही संबोधण्यात येते. समुद्र किनाऱ्यापासून दूर राहणाऱ्या समाजाला उथळी म्हटले जाते. आगरी समाजाच्या शुद्ध आगरी, दास आगरी व वरप आगरी अशा पोटजाती आहेत. केवळ मिठाची शेती करून उपजीविका करणारे ते मीठआगरी. पिढ्यान्‌ पिढ्या ढोल वाजविणारे ते ढोल आगरी. बागबगिचे, उद्यानांमध्ये काम करणारे ते जस आगरी म्हणून ओळखले जातात. दास आगरी समाज पालघर तालुक्‍यात आढळतो. उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता प्राप्त केलेला आगरी समाज समाजाविषयी अभिमान बाळगून आहे. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरानुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती ही भाषा बोलतात.
नव्या पिढीला आगरी भाषेविषयी औत्सुक्‍य वाटते. तसेच काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बुशकोट, डोक्‍यावर टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफ पॅन्ट, बुशकोट, टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. लग्न समारंभातील हळदीची आणि परंपरागत आगरी भाषेतील गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. कारण आगरी भाषेत लग्न समारंभाविषयीची माहिती या विशिष्ट गाण्यामधून कळायची. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकाला मिळत नाहीत. समाजातील बहुतेक मंडळी वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने शद्ब उच्चार आणि बोलण्याची ढब बदलली आहे. पूर्वी कुटुंबातील महिलेला किंवा बहिणीला "बाय' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "दादुस' म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला' म्हणून हाक मारले जायचे. "इच्या बना' ही शिवी-वजा विशेषणाचा सऱ्हार्स वापर केला जायचा. मात्र आता त्याच्यावर काहीसे र्निबंध आल्याचे जाणवते. किंवा हे वाक्‍य विस्मरणात गेले. आगरी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोली भाषेतून जाणवतो. तर आगरी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोली भाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोली भाषा काळानुरूप बदलत आहेत. नवा बदल या मंडळींच्या अंगवळणी पडत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आगरी समाज ग्लोबल झाला आहे.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

बुधवार, २९ सप्टेंबर, २०१०

आमचे गावानचा सारोजनीक गनपती उत्सव(agri vastraharan)



आमचे गावानचा सारोजनीक गनपती उत्सव ©


मांगच्या सालची गोस्ट सांगतय
कमीटीची मीटींग झाल्ती
मीटींगमदी ठरला क ह्ये गनपती उत्सवान गावचा नाटक बसवाचा.
पन ईशय कोन्ता ?
कूनी म्हनालं सामाजीक ठीवा, त कुनी म्हनल सांस्क्रुतीक , त कुनी आनकी कसला
चीक्कार भांडना झायली पन कुन्याव कई बी आयकना. तवा काश्या (माजा बा मंडली, काशिनाथ भोईर, पन तेला सगलीजना काश्या म्हनुनच वलीकतान. आवराच नाय तो सोता पन
काशिनाथ म्हुन हाक दील्ली क पाच मिन्ट ईचार करुन ओ देतं) उबा राह्यला न म्हनला
"यंदा आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा. क र मास्तर ?"
मास्तर कमीटीचा आद्यक्श. पन त्याचे डोल्यासमोर बांबू फिरलं.
"व्हय व्हय ! आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा. " मास्तरचा अनूमोदन
ईशय फिक्स - 'द्रुपदी वस्त्रहरन'
"चला आता काश्टींग करुया " मास्तर
म्हन्जे ? म्हात्र्यांचा सुरया
"आर म्हन्जी कोनी कोनी क कराचा ते. तर मंडली , डायरेक्टर मीच होतय आनी नाटक बी लीवतं. मना म्हाईत हाय ईतीहास" मास्तर
"बर मंग आता एयाक्टर बी तुमीच ठरवा. " बाबू घरत - खजिनदार
हां. तर आता धर्मराज कोन ?
मी हुतय " भास्कर राउताचा बंड्या
अर्जुन .. भिम .. नकुल .. सगली पांडवा झायली
"दुर्योदन ?"
"तुकाराम तु हो."
"पन मास्तर मना टेजवर बोलाया जमन?
"आर तु कई नाय बोलाचा. निस्ता पाच येला ह्य ह्य करुन हासाचा बोल." मास्तर
दुशासन कोन ?
सगल्यांचा हात वर
"आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर
"ह्या काम आपन पक्याला देव . कुनाचा आब्जेक्सन ?"
सगली मान्सा चिप रायली बोल. पक्या बीनईरोद दुशासन.
आता द्रुपदी
सगली लोका यकमेकांचे तोंडाकड बगु लागली. कोनाव कई बी सूचना
आपल्या बायकामुली कोन पाटवल पक्या करुन पातल सोरवाला. कई ईपरीत झाला तर कवरा लफरा वाडलं
"पनवेलचे 'मल्लिका' मदी माजी वलक हाय." बारक्या म्हनाला "तीतुन आनु यकादी."
"जमल जमल , आनी तीचा यक डांस बी ठीउ . मोप गर्दी जमल. "
रेसल सुरु . सगला येवस्तीत जमला पन येक लफरा झाला
"द्युत" कसा खेलाचा ह्ये मास्तरला कलना. आता मास्तरलाच म्हाईत नाय म्हन्जे बाकी सग्ल्यांची बोंब. क कराचा
"आरं पोराव कना घाबरता, यक काम करा तीन पानी खेला. लासला धर्मराज हरल न मंग द्रुपदीचा वस्रहरन करु. क बोल्ता?" दत्ता पाटील बोल्ला
ह्ये बी पटल सर्वांना.
नाटक सुरु झाल
झाल्त काय मंडली , काश्या न बंड्या दोगव भट्टीची लाउन आल्ते आनी यकमेकांच डायलाग बोलत व्हते.
सगला लोच्या चाल्ला व्हता
शेवटी यकदाचा धर्मराजान दुयोधनाला तीन पानीच आवतान द्दील्ल नी 'द्युता' स सुर्वात झाली
पन धर्मराज जिकतच गेला . दुयोधनाला पत्ताच येयना .
दुयोधनाला एक्का जोड त धर्मराजाला कलर
दुयोधनाला कलर त धर्मराजाला राऊंड
दुयोधनाला चट्टी त धर्मराजाला तीन तीर्या
मास्तर ईंगेतून वरडा लागले धर्मराजा तुला हराला पायजेल, तुला हराला पायजेल ,
काश्या तराट , तो कइ आयकना
"मना पत्ते सरस येतान मंग मी कना शो दीउ ?"
दुयोधन रास हरला . काश्या उटला " द्रुपदीला हाना. मी सोरनार पातल . माजा आदीकार हाय तो."
दुयोधन म्हनाला " नाटकान क लीवलय ? मीच द्रुपदी ला मांडीव बशीवनार"
दुशासन म्हनाला "मीच द्रुपदीची सारी वडनार"
हा लफरा वारला. ही मारामारी .
आनी मंडली द्रुपदि सोरुन सगल्यांची वस्त्रहरना झायली.

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०१०

जपून चाल्‌ पोरी जपून चाल्‌


जपून चाल्‌ पोरी जपून चाल्‌



जपून चाल्‌ पोरी जपून चाल्‌
बघणाऱ्या माणसाच्या जिवाचे हाल्‌ !

लाडाने वळून बघायची खोड्‌
नाजूक नखऱ्याला नाही या तोड्‌
डोळ्यांत काजळ, गुलाबी गाल्‌ !

केसात सुरंगी रंगात ग
विजेची लवलव अंगात ग
खट्याळ पदराला आवर घाल्‌ !

जिंकीत जिंकीत जातेस तू
ज्वानीचं गाणं हे गातेस तू
हासून होतेस लाजून लाल्‌ !

उरात लागलेत नाचाया मोर्‌
कोणाच्या गळ्याला लागेल दोर्‌ ?
माझ्या या काळजाचा चुकेल ताल्‌ !!
-आमोद पाटील
©आगरी युवा
आगरी बोली - आगरी बाणा.

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०१०

माझ्याव जीव लावणारा, असा नवरा पायजे मना....!!


माझ्याव जीव लावणारा, असा नवरा पायजे मना....!!

यो पोरगा माझ्याव मरतंय-तो पोरगा माझ्याव मरतंय
कशी भरोसा करू मी कुणा.....
माझ्याव जीव लावणारा, असा नवरा पायजे मना ...... !!धृ!!

माझ्याशिवाय त्याच्या र कुणी मनात नसावी
जिकर-तीकर बघील तो मीच त्याला दिसावी
यो पोरगा माझ्या माग येतंय-तो पोरगा माझ्या माग येतंय
कशी पसंत करू मी कुणा....
माझ्याव जीव लावणारा, असा नवरा पायजे मना ...... !!१!!

फुलासारखा मना तो, मीच सांगतंय जपणारा
संग-संग घेवून फिरवाला नेईल मला तो सोबतीला
यो पोरगा बघुनशी हसतंय -तो पोरगा बघुनशी हसतंय
कशी हवी म्हणून मी कुणा.......
माझ्याव जीव लावणारा, असा नवरा पायजे मना ......!!२!!

मनान तो दिलदार पायजे र चांगला
काळा असो वा गोरा तो देवापाशी मागण
यो पोरगा इशारा करतय-तो पोरगा इशारा करतय
कशी सांगू मी आज बाय कुणा........
माझ्याव जीव लावणारा, असा नवरा पायजे मना .... ..!!३!!

गीत : एकनाथ माळी.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

सखे गोव्याला नेईन तुला....!!


सखे गोव्याला नेईन तुला....!!

सखे गोव्याला नेईन तुला
नथ नाकान मोत्याची, साडी चमकीची घेईन तुला....
उद्या लगीन झाल्यावर, परवा गोव्याला नेईन तुला...३..!!धृ!!

लगीन झाल्यावर १ जूनला, जाऊया दोघजण हनिमूनला
माझे जीवाचे जिवलग मैतरणी, काचेच्या बंगल्यान ठेवीन तुला
तुझी हाउस पुरविण मी, जे जे हव ते देईन तुला...
उद्या लगीन झाल्यावर परवा गोव्याला नेईन तुला.....!!१!!

बेंड बाज्या ह्यो वाजल्यावर, ठेवील ९ व्या मजल्यावर
एक दोन दिवस नाहीतर, मजा करूया महिनाभर
राजा असून राणी ग, तुझा गुलाम होईन मी.....
आपल लगीन झाल्यावर, सखे गोव्याला नेईन तुला
उद्या लगीन झाल्यावर, परवा गोव्याला नेईन तुला....!!२!!

हट्ट तुझा मी करीन पुरा, दम धर ना ग पोरी जरा
लग्न आधी ग खरोखरी, उतावीळ पणा ह्यो नाही बारा
जेव्हा नवरी नटलेली माझ्या डोळ्यान पाहीन तुला.....
आपल लगीन झाल्यावर, सखे गोव्याला नेईन तुला
उद्या लगीन झाल्यावर, परवा गोव्याला नेईन तुला...!!३!!

गीत : एकनाथ माळी.
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

शनिवार, २८ ऑगस्ट, २०१०

आई एकवीरा....!!



आई एकवीरा....!!

नाखवा माझा गेलाय डोलीला......
सुटलाय वादळी वारा....... सुटलाय वादळी वारा.......
आई एकवीरा मी नवस करते तुला
त्याशी सुखरूप येऊ दे घरा.....!!धृ!!

माझ्या जीवाचा हाय तो धनी
माझ्या गळ्याचा हाय तो मनी
हुरहूर लागली माझ्या मनाला...
जीवाला नाही ग थारा.........आई एकवीरा......!!१!!

खण-नारळणी भरीन ग ओटी
मन भावे करीन आरती
जयजयकार करीन तुझा मी
उधळून गो भंडारा ............आई एकवीरा.........!!२!!

आई हाकेला माझ्या तू धाव ग
माझ्या नवसाला आई तू पाव ग
सुखरूप येऊ दे व्हाल्ल्याव आमच
गाठू दे ग किनारा.............आई एकवीरा ........!!३!!

गीत : एकनाथ माळी.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

नोट शंभरची झेना....!!


नोट शंभरची झेना....!!

पारू तुझ्या पाटीमंदी माल हाये भारी
माल भारी... इकाला तू आयली गो बाजारी
पण रेट जरा नीट लावना......
बोट लाऊ देना... नोट शंभरची झेना.... तुझा पापलेट..... देगो मना....

चांदीवानी चम-चमतय पापलेट तुझा
जवळ जावून बगावला गो लागतंय मना
लावूनशी ठेव... या फलाटावरी
ऐसा उगरा करुंशी दावना......
बोट लाऊ देना... नोट शंभरची झेना.... तुझा पापलेट..... देगो मना....

पायजे कला कीट- कीट भवानीचे पारी
उदारीचा धंदा तू करू नको पोरी
बगू नको गो ऐशी परक्यापरी
मी नायी कुणी नवा पाहुणा........
बोट लाऊ देना... नोट शंभरची झेना.... तुझा पापलेट..... देगो मना....

पयल्याचा हाय तुझा गिराईक जुना
येल नको लावू आता लवकर दे मना
अग बगतस काय.... मी इथलाच हाय
हाय एकनाथ माझ नाव ना.....
बोट लाऊ देना... नोट शंभरची झेना.... तुझा पापलेट..... देगो मना....

गीत : एकनाथ माळी.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

आगरी-कोळी माणूस २०२० मध्ये

आगरी-कोळी माणूस २०२० मध्ये

मुंबई,नवी मुंबई,रायगड,ठाणे येथील आगरी-कोळी माणसाचे मेणाचे पुतळे म्युझीअम मध्ये ठेवले गेले होते. शाळेतील मुले ते पाहायला आली होती आणि विचारत होती.
विद्यार्थी : हा माणूस कुठला गुरुजी?
गुरुजी : पहिल्याच्या काळी मच्छी पकडणारे व विकणारे अन शेती करणारे लोक इथे राहत होते, येथील ते आद्य रहिवासी(म्हणजे मूळ रहिवासी) होते.येथील जमिनी त्यांच्या मालकीच्या होत्या, ते लोक येथील समुद्राचे आणि जमिनीचे राजे होते, शिवाजी राजांनी देखील त्यांचा सन्मान केला होता, ते शूर होते.कान्होजी आंग्रे सारखा वीरपुरुष ज्याने पहिले आरमार बनविले ते त्यांच्याच वंशाचे होते.
विद्यार्थी: मग गुरुजी एवढा शूर माणूस आता कुठे गेला?
गुरुजी: ह्या माणसाने कधीच भविष्याचा विचार केला नाही, ह्या माणसाने आपले आयुष्य दारू, जुगार, आणि मौज मजा करण्यात फुकट घालवले.ह्या माणसाने आपले शौर्य आपसात लढण्यात घालवले.हा माणूस वाघ होता, वाघ कधीच कळपात राहत नाही तो एकटा राजा असतो. त्यामुळे त्याच्या कडे एकीचे बळ नसते गट बनवण्याचे फायदे त्याला कळत नाहीत आणि मग १०० कुत्रे मिळून वाघाला देखील खातात, त्याची देखील शिकार होते.भारतात वाघ जसे दुर्मिळ झालेत तसेच काळाच्या पडद्यात हा माणूस दुर्मिळ होत गेला आणि हरवला. सिंहासारखा जगला असता, कळप बनवून एकमेकांना सांभाळून राहिला असता तर मी आज तुम्हाला खरा आगरी-कोळी माणूस दाखवू शकलो असतो.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०१०

AGRI SAMAJ HISTORY-2

URAP AGRIS:

Urap AGRI's, know also a Varap AGRI's, are found in several villages in Salssette and Bassein, and are saidl to be Christian AGRI's, who reverted to Hinduism in 1820 and others in 1828. They are also know as Nave or New Marathas. Both in Salsette and in Bassein the Urap AGRI's are considered lower than eith Sudh or Das AGRI's, who neither marry or eat with them. They have separate priest and a separate headman. Their manners and customs are the same as those of other agris and they worship the Hindu gods.

The chief evidence of their having once been Christians is to be found in their surnames, which are Gomes, Soz, Fernan, and Minez. It is saild that the Bassein AGRI's who reverted in 1820 had to pay Rs 1200 The priest who purified and took them back wa Ramchandra Baba Joshi, a Palshe Brahman. His caste for a time excommunicated him, but he was allowed to rejoin when he ceased to act as priest to the Uraps, On e Bhai Mukund Joshi, also a Palshe, succeeded Ramchandra. Like the former he was put out of caste, but when he had a child to marry he did penance and was allowed to rejoin the caste. The name of the priest who admitted the AGRI's in 1828 (November 12) was Vithal Hari Naik Vaidya, a Palshe Brahman of Bassein.

AMOD PATIL
AGRI BANA
AGRI SAMAJ

AGRI SAMAJ HISTORY-1

आगरी बोली - आगरी बाणा.

AGRI SAMAJ HISTORY.

The name AGRI comes from Agar, a Salt-pan. The original name seems to be Agle.

The tradition common among them is that they originally dwelt at Mungi Paithan and were transported to the Konkan by Bimbaraja, and it is alleged that there are in existence sanads given by him to certain persons of the caste. They are not, however, forthcoming.

The following legend is given for what it is worth. Two son's Agla and Mangla, were born to the sage Agasti; the former the ancestor of the Agris, the latter of the Mangelas (Fishermen). The first was told to support himself by the manufacture of salt from the sea, the latter by fishing. The god Parashuram, intending to throw back the sea, was prevented by the intervention of the AGRI and Mangela women. At their request he consented to throw it back only 27 miles and the strip thus formed become the Konkan.

There is another legend to the effect that they are the musicians of Ravan, the demon-king of South India, who in reward for good services settled them in the Konkan.

AGRI's claim to be Kahatriyas of Khatris. The late or Aryan element which they claim and which appear in some of their surnames, according to their story, was introduced into the Konkan from Paithan in the Deccan, when the Deccan was conquered by the Musalmans at the close of the thirteen century. Because of educational, social and economic backwardness of AGRI caste has been inducted in Other Backward Class (OBC). The famous Chirner Andolan made by AGRI's in 1930 served as force to invoking “Kul Kaida” by government . It means who who cultivate the land will be the real owner of the land and system of Jamindari was abolished. It benefited every Kul of Maharashtra .

On the other hand, states that AGRI are subdivision of the Kunbi and subgroup of the koli. At present they are distributed in Rajasthan, Delhi, Dadra and Nagar Haveli, Gujarat and Maharashtra.

The AGRI of Maharashtra are also know as Agle. They are distributed in the Raigad and Thane Districts and in the suburban area of Mumbai city(Bombay). The population of AGRI in Mumbai(Bombay) Province, according to the 1931 census, was 2,65,285. They speak the Indo-Aryan language Marathi at home as well as outside and use the devanagri script. AGRI's are real owner of Mumbai(Bombay).

Exogamous Divisions:

Their are no exogamous sub-division above families have the same surname and observing common mourning. The following is a list of such families, kuls or gortras. Bhamber Bhoir
Bholekar Chavan
Choudhari Danki
Dasalke Dhumala
Dhawle Dhonde
Driyacha Dukre
Gaikwad Gavand
Gavil Shivasi Gharat
Ghodinde. Gondhali
Gulvi Jadhav
Joshi Kadu
Kalaj Kamane
Karbhari Kari
Keni Khambalker
Khanda-Agle Kharik
Khuntale Kokati
Kotval Kutilkar
Madhavi Mali
Mandre Mhatre
Mohile More
Mukadam Mukul
Naik Navare
Pangdi Patil
Pavar Sare
Sasai Shelar
Shirke Sigola
Thakur Vaghoda
Vaze Yadav
(I know only these surnames of AGRI. If anybody know others surname then please contact me.)


Some of these names have apparently been borrowed from Rajputs and Marathas, some derived from occupations, some are the names of places and some family titles. It is to be noted that these may be distinct gotras bearing the same surnames, members of one of which may intermarry with members of another: eg:- the common names 'Patil' ,'Bhoir', 'Jadhav,' , 'Mukadam' which occur all over the Raigad, Thane District, are borne by families quite distinct one from another, who do not observe common mourning and may therefore intermarry.

There are two endogamous division of the caste:

A) Sudh-AGRI (Pure-AGRI) who are called:
Mith-AGRI (Salt Maker),
Jas-AGRI(Toddy-Drawers),
Dhol-AGRI(Drummers),
Son-agle and Pan-agle.

B) Das-AGRIS : Probably from Dasi, a term applied by the Aryans to those of mixed descent or of a different race

SUDH AGRIS:

The exogamous sub-divisions of Sudh-AGRI's are the following:
Bhoir

Choudhari

Chavan

Mali

Mhatre

Mandre

More

Mukul

Navarye

Patil

Pavar

Shelar

Shirke

Vaze

Yadav


There are no endogamous division of the caste.

There is no marriage within the limits of any one of the subdivision m mentioned above or similar kuls, members of which observe common mourning.

A man may not marry a cousin within five degrees of relationship. There is no distinct prohibition against marrying two sisters, but it is not the practice unless the first sister is dead. A man may marry two cousins

DAS-AGRIS:

Das AGRI's differ little from the Sudh-AGRI's in matters of religion and custom. The exogamous sub-divisions of the caste are:
Kadu

Kene

Gharat

Madhovi

Vaze

Sare

Gavad.


Das AGRI's, according to their own story the thrum or dashi- weaving AGRI's, but more probably the AGRI's of impure descent or Dasiputras , The local story is that they are the descedants of an AGRI's mistress whose children died in infancy. She vowed to the Mahar's god that if her children lived to grow up she would walk from her house to the Mahar's house with a cow's bone on her head and a tag or thrum of wool in the lobes of her ears. Her children grew up and she carried out her vow and wa excommunicated.

Marriage with this group is prohibited on the ground that its members are ignorant of h the proper religious beliefs and practices. A Palshe or Golak Brahman is the priest of the caste. It is sated that the caste god is Vishnu.

आगरी बोली - आगरी बाणा

आगरी बोली - आगरी बाणा.

A WORD ABOUT AGRI SAMAJ

The AGRI are traditionally salt-makers but now settled in Agriculture (farming of rice), fishery at the sea coast.

Food:
AGRI's are non-vegetarian. Rice bread (Bhakri), steamed rice with meat and fish is their daily diet They drink liquor (mahua), eat pork (wild hog only), the flesh of cloven-footed animals (except oxen, buffaloes, bison and nilgai), fowl, and fish.

Religion:
In religion they are nominally Smarts and Bhagvats, but some of their death and other customs seem to suggest that they were once Lingayats. They worship all Hindu gods, particularly Khandoba and Bharoba, and in their houses have gold and silver embossed plates of their gods and goddesses.
They worship the usual Hindu saints both of the vaishanva and Shiva. Each village has a god or goddess and each family has a god or goddess of the kula(Devhara). Mainly AGRI'S Workship Ekvira Aai & Khandoba.

Marriage: Their lineage (Kul) name serves as the surname ang regulates marriage. Outsiders are not admitted into the caste. These people celebrate marriage with lots of fun and enjoyment.
Like Sakharpuda, Chun, Halad, Lagn, etc.

Problems:
Navi Mumbai SEZ, 12.5% Plot, Bad Politics & Greedy AGRI Politician, Liquor, AGRI People fight between themself only there are many reasons like politics.

Surname:

A
Angade, Adavale,
Aaibkar, Agivale,
Ahire, Adhikari,
Agaskar

B
Baikar, Bagade,
Barshi, Basdat

BH
Bhagat, Bhundare,
Bhemare, Bhoir,
Bherlo, Bhopi,
Bhorade, Bhore,
Bhandari, Bhundare,
Bhagit, Bhalke,
Bhagyawan, Bhokare,
Bhagade, Bhonkar,
Bhavare,

CH
Chavan, Chavarkar,
Chougule, Chahad,
Chirote, Chanche,
Choudhari

CHH
Chhatre

D
Divekar, Dalvi,
Damade, Deshmukh,
Dighe, Dande,
Damame,

DA
Daur, Dayare,
Dongre, Digore,
Dukare, Dangar,
Degane, Dolemith

DH
Dhotre, Dhonde,
Dhumal , Dhamane,
Dhule, Dhangar
Dhawle

E
Ermale

G
Gange, Gawali,
Gavand, Gunde,
Gaikar, Gondhali,
Gaikwad, Gite,
Gouri, Gulavi,
Gopale, Gore,
Gadmul, Goradkar,
Gotarne

GH
Gharat, Ghorpade,
Ghate, Ghodshinde,
Ghase, Ghanekar,
Ghonaskar, Ghotkar

H
Hujare, Hadve,
Habale, Hugade,
Huname,

J
Jadhav, Jasude,
Jamdhare, Jamkar,
Jansale, Juikar,
Joshi, Jogle,
Jambhale

K
Kadu, Kamble,
Kadav, Karade,
Kathe, Kale,
Kabadi, Kaskar,
Katkar, Kalekar,
Kalan, Karnekar,
Keni, Kolambe,
Kudake, Kopkar,
Karalkar, Kadave,
Kasar, Kolehkar,
Kuduskar, Kolhatkar,
kure, Kopakar,
Katekar, Kothekar,
Karlekar

KH
Khat, Kharve,
Kharkar, Khanavkar

L
Logade, Lokhande,
Lobhi, Lagade,
Late, Lasuri

M
Mali, Marathe,
Marke, Modak,
Munde, More,
Mogre, Mune,
Matore, Manera,
Mudale, Mumbaikar,
Mukadam, Makat,
Madhavi, Misal,
Mashte, Mahalkar,
Milbhine, Mandre,
Mule, Muthe,
Mate, Mithagari,
Mokal, Mithkharkar,
Malvi,

MH
Mhatre, Mhadan,
Mhaskar

N
Navgharkar, Narsale,
Nakani, Nagaokar

P
Patil, Pawar,
Payare, Pavshe,
Popeta, Partole,
Pamale, Pingle

Ph
Phugane, Pharman,
Phirke, Phulare,
Phulote, Phawade,

R
Rodpalkar, Rao,
Rane, Rudhe,
Raut, Raikar

S
Savkar, Sutar,
Salvi, Salunkhe,
Sonavale, Sangle

Sh
Shelake, Shitare,
Shende, Shigate,
Shitkar, Shilkar,
Shelar, Shinge,
Shisave, Shinare,
Shisve

T
Taware, Topare,
Tembe, Tikare,
Tethe
Talekar,
Tare, Taloskar,
Tupe

Th
Thumbre, Thakur,
Thanage, Thothe,
Themake, Thale,
Thombre

V
Vajemi, Vadilkar,
Valilkar, Vartak,
Vakhare, Vedele,
Vakhandshre, Vagh,
Vaghmare, Virle,
Vadekar, Vakaskar,
Vayale, Vakade,
Vayal, Vaikhure,
Vaze, Varinge,
Varghade, Vajekar

Y
Yashavant
(I know only these surnames of AGRI caste. If anybody know others surname then please contact me)

Lastly Very Important If All AGRI Come Together Then They Can Be Very Powerful

AMOD PATIL.
 AGRI BANA.
AGRI SAMAJ