आमोद पाटील-आगरी बाणा: नोट शंभरची झेना....!!

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

शनिवार, २८ ऑगस्ट, २०१०

नोट शंभरची झेना....!!

नोट शंभरची झेना....!!

पारू तुझ्या पाटीमंदी माल हाये भारी
माल भारी... इकाला तू आयली गो बाजारी
पण रेट जरा नीट लावना......
बोट लाऊ देना... नोट शंभरची झेना.... तुझा पापलेट..... देगो मना....

चांदीवानी चम-चमतय पापलेट तुझा
जवळ जावून बगावला गो लागतंय मना
लावूनशी ठेव... या फलाटावरी
ऐसा उगरा करुंशी दावना......
बोट लाऊ देना... नोट शंभरची झेना.... तुझा पापलेट..... देगो मना....

पायजे कला कीट- कीट भवानीचे पारी
उदारीचा धंदा तू करू नको पोरी
बगू नको गो ऐशी परक्यापरी
मी नायी कुणी नवा पाहुणा........
बोट लाऊ देना... नोट शंभरची झेना.... तुझा पापलेट..... देगो मना....

पयल्याचा हाय तुझा गिराईक जुना
येल नको लावू आता लवकर दे मना
अग बगतस काय.... मी इथलाच हाय
हाय एकनाथ माझ नाव ना.....
बोट लाऊ देना... नोट शंभरची झेना.... तुझा पापलेट..... देगो मना....

गीत : एकनाथ माळी.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा