
आई एकवीरा....!!
नाखवा माझा गेलाय डोलीला......
सुटलाय वादळी वारा....... सुटलाय वादळी वारा.......
आई एकवीरा मी नवस करते तुला
त्याशी सुखरूप येऊ दे घरा.....!!धृ!!
माझ्या जीवाचा हाय तो धनी
माझ्या गळ्याचा हाय तो मनी
हुरहूर लागली माझ्या मनाला...
जीवाला नाही ग थारा.........आई एकवीरा......!!१!!
खण-नारळणी भरीन ग ओटी
मन भावे करीन आरती
जयजयकार करीन तुझा मी
उधळून गो भंडारा ............आई एकवीरा.........!!२!!
आई हाकेला माझ्या तू धाव ग
माझ्या नवसाला आई तू पाव ग
सुखरूप येऊ दे व्हाल्ल्याव आमच
गाठू दे ग किनारा.............आई एकवीरा ........!!३!!
गीत : एकनाथ माळी.
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा