आमोद पाटील-आगरी बाणा: माझ्याव जीव लावणारा, असा नवरा पायजे मना....!!

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०१०

माझ्याव जीव लावणारा, असा नवरा पायजे मना....!!


माझ्याव जीव लावणारा, असा नवरा पायजे मना....!!

यो पोरगा माझ्याव मरतंय-तो पोरगा माझ्याव मरतंय
कशी भरोसा करू मी कुणा.....
माझ्याव जीव लावणारा, असा नवरा पायजे मना ...... !!धृ!!

माझ्याशिवाय त्याच्या र कुणी मनात नसावी
जिकर-तीकर बघील तो मीच त्याला दिसावी
यो पोरगा माझ्या माग येतंय-तो पोरगा माझ्या माग येतंय
कशी पसंत करू मी कुणा....
माझ्याव जीव लावणारा, असा नवरा पायजे मना ...... !!१!!

फुलासारखा मना तो, मीच सांगतंय जपणारा
संग-संग घेवून फिरवाला नेईल मला तो सोबतीला
यो पोरगा बघुनशी हसतंय -तो पोरगा बघुनशी हसतंय
कशी हवी म्हणून मी कुणा.......
माझ्याव जीव लावणारा, असा नवरा पायजे मना ......!!२!!

मनान तो दिलदार पायजे र चांगला
काळा असो वा गोरा तो देवापाशी मागण
यो पोरगा इशारा करतय-तो पोरगा इशारा करतय
कशी सांगू मी आज बाय कुणा........
माझ्याव जीव लावणारा, असा नवरा पायजे मना .... ..!!३!!

गीत : एकनाथ माळी.

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा