आमोद पाटील-आगरी बाणा: सखे गोव्याला नेईन तुला....!!

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०१०

सखे गोव्याला नेईन तुला....!!


सखे गोव्याला नेईन तुला....!!

सखे गोव्याला नेईन तुला
नथ नाकान मोत्याची, साडी चमकीची घेईन तुला....
उद्या लगीन झाल्यावर, परवा गोव्याला नेईन तुला...३..!!धृ!!

लगीन झाल्यावर १ जूनला, जाऊया दोघजण हनिमूनला
माझे जीवाचे जिवलग मैतरणी, काचेच्या बंगल्यान ठेवीन तुला
तुझी हाउस पुरविण मी, जे जे हव ते देईन तुला...
उद्या लगीन झाल्यावर परवा गोव्याला नेईन तुला.....!!१!!

बेंड बाज्या ह्यो वाजल्यावर, ठेवील ९ व्या मजल्यावर
एक दोन दिवस नाहीतर, मजा करूया महिनाभर
राजा असून राणी ग, तुझा गुलाम होईन मी.....
आपल लगीन झाल्यावर, सखे गोव्याला नेईन तुला
उद्या लगीन झाल्यावर, परवा गोव्याला नेईन तुला....!!२!!

हट्ट तुझा मी करीन पुरा, दम धर ना ग पोरी जरा
लग्न आधी ग खरोखरी, उतावीळ पणा ह्यो नाही बारा
जेव्हा नवरी नटलेली माझ्या डोळ्यान पाहीन तुला.....
आपल लगीन झाल्यावर, सखे गोव्याला नेईन तुला
उद्या लगीन झाल्यावर, परवा गोव्याला नेईन तुला...!!३!!

गीत : एकनाथ माळी.
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा