आमोद पाटील-आगरी बाणा: फेब्रुवारी 2011

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

शनिवार, २६ फेब्रुवारी, २०११

प्रश्न एका प्रकल्पग्रस्ताचा..............

जेव्हा जेव्हा प्रश्न कोणत्याही प्रकल्पग्रस्तांचा येतो तेव्हा माझ डोक एकदम फिरत.....आजही तसच झाल........स्टार माझा वर दुपारी १२ ते २.३० पूर्णपणे आजची जैतापूर ची सभा बघत होतो. प्रकल्पग्रस्त म्हणजे आम्ही काही गुन्हा केलेला असतो काय?? जैतापुरच्या जमिनीला म्हणे सरकार १० लाख रुपये देणार.........मी म्हणतो कि साला काय भीक देता काय??? १० लाख??? सध्या जमिनींचा भाव एकरी ४० लाखापासून पुढे चालू होतोय.........आणि जैतापूर प्रकल्पग्रस्तांनी,त्यातील माणसांनी हा प्रश्न विचारला कि,"हा प्रकल्प तुमच्या बारामतीला किव्वा घाटावर का नाही नेत? तुमच्या कोयना,भीमा खराब होतील म्हणून का?? पण आमचा समुद्र खराब होईल त्याच काय?आम्ही मेलो तरी चालत?कि आम्ही महाराष्ट्रात राहत नाही?? कुठून तरी बाहेरच्या देशातून आलोत......" या प्रश्नांची उत्तरे का नाही दिली माननीय मुख्यमंत्र्यांनी? तेव्हा का गप्प बसले. नुसत्या लोकशाहीच्या गप्पा मारू नये. मी हा विरोधासाठी विरोध करत नाही. कारण एक प्रकल्पग्रस्त म्हणून जगताना काय अडचणी येतात ते या सांगली,सातारा,कोल्हापूर इ. तस्तम पुढार्यांना काय समजणार? त्याचं काय जातंय बोलायला कारण शेवटी फायदा त्यांचाच होतो........कारण नंतर आमच्या परिसरातील जागांवर मेडिकल, इंजीनिरिंग कोलेज काढून दरवर्षी अब्जावधी कमावणार.......नवी मुंबई परिसरात काय चाललाय?? जमिनी आमच्या गेल्या. पण तिथे आमच्या पोरांना नोकऱ्या नाहीत कि कुठे पैशाशिवाय शिक्षणात प्रवेश दिला जात नाही. सर्व ठिकाणी यांचीच पिलावळ.........साला सर्व कॉलेजेस मध्ये हेच........ आता महत्वाचा मुद्दा आम्ही प्रकल्पग्रस्त जेव्हा या सरकारकडे आपल्या अभियांत्रिकी कॉलेज साठी जागा मागत होते तर ती देत नव्हते........मग या कदम,देशमुख.पवार इ. राजकारणी माणसांना कशी काय मिळते हे एक कोड आहे????? किती करोडो रुपयाचा सिडको आणि सरकार झोल करतेय........समजू शकेल का?????? डोनेशन च्या नावाखाली ५-६ लाख अभियांत्रिकी साठी आणि ५०-६० लाख वैद्यकीय(हा यावर्षीचा भाव होता.दरवर्षी तो वाढत राहतो.........दरवर्षी सरकारने ऑगस्ट, सप्टेंबर या प्कालावधीत एकाच वेळी सीबीआय चे छापे टाकावेत...........मग समजेल भारतात कला पैसा कुठून आणि किती तय्यार होतोय.............) साठी मागताना या चोरांना लाज वाटत नाही का?? साला जमिनी आमच्या आणि त्याच जमिनीवर आम्ही परके?????? जैतापूर वासियांच्या बाबतीत हे नको होण्यासाठी आमचा या प्रोजेक्टला नाही तर पुनर्वसनाला विरोध राहणार. जर सरकार त्यांना एकरी कमीतकमी ४० लाख, त्यांच्या घरातील प्रत्येक माणसला नोकरी, त्यांना अजून दुसरा रोजगार मिळवून देणे. त्यांना सरकारी वैदकीय आणि अभियांत्रिकी कॉलेजमध्ये मोफत प्रवेश आणि त्यांच्या प्रवेशासाठी काही अटी शिथिल कराव्यात, त्या परिसरात तिथल्या प्रकल्पग्रस्तांच मोफत औषधोपचार म्हणजेच सुसज्ज अस हॉस्पिटल. आणि तेथील प्रकल्पग्रस्त जनतेच्या सर्व मागण्या मान्य करत असेल तर जमिनी द्यायला विरोध होणार नाही. आम्हाला माहिती आहे कि हा प्रोजेक्ट चांगला आहे आणि या प्रोजेक्टला कितीही विरोध केला तरी तो होणारच आहे पण सरकारने आत्ता सामान्य जनतेला रडवू नये कारण सत्ता नेहमी बदलत राहते हेही लक्ष्यात असुदे...................प्रोजेक्ट होईल पण नंतर तुमची सत्ता राहील कि नाही तो मोठा प्रश्न आहे?????????आज लिबिया, इजिप्त या देशात काय होतंय ते पाहत असलाच.............जग जवळ येतंय...............आत्ता नाही तर पुढच्या १०-१२ वर्षात भारतात देखील हे होऊ शकत...........!!!!!!!!

आपलाच,

आमोद पाटील.

आगरी बोली-आगरी बाणा.

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०११

सपनांची गाठोडी


 सपनांची गाठोडी

ल्हानपनी ईतीहासाच पुस्तक उगडाचू
न सपनाचे गावान शिराचू
तवा वाटाच क जाम म्होट व्हाचा
न आभालान फीराचा
अमिताभ बच्चनसारका सांगाचा
'मेरे पास बंगला हय, गाडी हय और मां बी'
माजी आय कामाला जायची ते शेट ला सांगाचा
'तूम ईस फ्याक्ट्री के पचास लाख मांगते तो दे देता वो बी '
बालासायबांसारकी भाशनं ठोकाची शिवाजी पार्कान
लोकांसाटी आक्का आयुश्य कराचा कुरबान
वर्ल्ड कप फायनल न समोर पाकीस्तान आयला
लास बॉल वर शिक्सर मारुन मियांदादचा बदला
पन पूस्तकाचा लासचा चॅप्टर कदी आला कललच नाय
सपनांची गाठोडी तशीच रहाली आयुश्य उरलच नाय
कालच पोरगा पूस्तक वाचीत व्हता
नजर आढ्याला लावून जागीत व्हता
त्याचे डोल्यान बगीतला न कल्ला
सगली सपन पास ऑन झालीन....

आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०११

साडेबाराचा अखेरचा लढाजे.एन.पी.टी आणि नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्तांच्या सद्य स्थितीवर भाष्य करणारी ही कविता आपणा समोर सादर करत आहे. १९७० सालापासूनचा हा प्रलंबित प्रश्न अजून सुटलेला नाही. येत्या २३ मार्च २०११ रोजी संपूर्ण जे.एन.पी.टी. बंदर आणि गरज पडल्यास उरण, पनवेल आणि नवी मुंबई बंद करून आम्ही प्रकल्पग्रस्त आत्ता आरपारच्या लढाईला सामोरे जाणार आहोत. सरकारने आत्ता आश्वासन नको तर कृती करावी.गेले ४० वर्ष हीच आश्वासन ऐकतोय. तरी सरकारने आम्हा सर्व आगरी जनतेला पेटवू नये. कारण आगरी माणूस पेटतो तेव्हा तो सर्व बेचिराख करतो.
आमोद पाटील.
संपादक-आगरी बाणा.
सारेबाराचा इचार मांडलाय र
सारेबाराचा इचार मांडलाय र.........
या शेतकऱ्यांचा रक्त हा सांडलाय र........
गोर गरिबांची ही शेती,
तुटली आपसातली ही नाती.
मोलाची आमची माती,
थरथरली आमची छाती.
भाऊ बहिणीशी पहिल्यांदा भांडलाय र.......
या शेतकऱ्यांचा रक्त हा सांडलाय र.........
सारेबाराचा इचार मांडलाय र.........
या शेतकऱ्यांचा रक्त हा सांडलाय र.........
इथे उरला ना कोणाचा कोन,
बहिण भावाला लावताय फोन
भाऊ नियत ही बदलून,
घेतली सही न हिसकावून.
हा फोन करून तिलाच सांगतोय र......
या शेतकऱ्यांचा रक्त हा सांडलाय र......
सारेबाराचा इचार मांडलाय र.......
या शेतकऱ्यांचा रक्त हा सांडलाय र.......
हक्क बजावून सांगतो,
माजी जमीन मि मांगतो.
नायतर चिरून मि उठतो,
शिरकोच्या मागेच लागतो.
नेता दि.बा.पाटील कोणाकोणाशी भांडतील र........??
या शेतकऱ्यांचा रक्त हा सांडलाय र.....
सारेबाराचा इचार मांडलाय र.........
या शेतकऱ्यांचा रक्त हा सांडलाय र.........
नारा एकीचा लावूया,
आवाजाने त्यांना दाबुया.
आता संघर्ष करुया,
काय होईल ते पाहूया.
आमोद पाटील हा बोल हा बोलतोय र........
या शेतकऱ्यांचा रक्त हा सांडलाय र.....
सारेबाराचा इचार मांडलाय र........
या शेतकऱ्यांचा रक्त हा सांडलाय र........
आपलाच,
आमोद पाटील,
संपादक-आगरी बाणा.
आगरी बोली - आगरी बाणा.

तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय


तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय...
 
चिक्कार दिस झाल बाय
तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय
आटवतय तुला शेतान भात लावताना
तिरप्या डोल्यांनी म्हटलवत 'धीन ताना धीन ताना'
कालजान गीटार वाजलवत चार दीस झोपलोच नाय
चिक्कार दिस झाल बाय
तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय

खारीवर आल्तीस दुपारची लाजत होतीस
पापनीचे पल्याडशी 'मुजे रंग दे, मुजे रंग दे' बोलत होतीस
त्यादीवशी तुला रंगवताना मी दमलोच नाय
चिक्कार दिस झाल बाय
तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय

'मै तेरीच हुं' गाताना काय तुजा आवाज होता.
हरणीचे डोल्यांना पापनीचा साज होता.
त्या डोल्यात बुडलो न भायेर कदी निगलोच नाय
चिक्कार दिस झाल बाय
तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय

आजकाल तु डोल्यानं झालीस मुकी निस्त तोंड बेसुरं वाजतय
मी बी झालोय भयरा सालं आयकुच कमी येतय
संसाराचं गान ह्ये तुजा कायव दोष नाय
चिक्कार दिस झाल बाय
तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय

आपलाच,
आमोद  पाटील.
आगरी बाणा.आगरी साहित्य

भाल्या त्याचेच तंद्रीन् इरी वरत बांधावरशी घरा चालला होता. येलेची न् आजुबाजूला काय चाल्ललाय याची त्याला अजाबात जानीव पुन व्हत नव्हती. तवर्यान मंगारशी आवाज आयला... "ये भाल्या! थांब तखरच... मी पुन यतय". मंग ते दोघ पुन सोबतीनुच चालाला लागल..."इरी दे र" भाल्याचे बरब व्हता तो बोलला...भाल्यान मंग त्याला इरी दिली...बरबचा "च्याला... ३० नबंर!!!... मी पुन यीच रोजचे ईच वरत..."आखरून तख्रूनच्या बाता मारत दोघा चालत व्हत...तवर्यान..."इरी दे र" बरबचा परत बोलला...ती पुन संपली... मंग परत त्यान इरी मांगली... भाल्या आजून पयलीच इरी वरत होता... त्याला इरी दिली न भाल्या जरासा टरकलाच... रातीच १२ वाजून जेलन न सगलेकर किर्रर् कालोख असल्याचा पयल्यांदा भाल्याला समजला... त्यान आज आमोश्या... मंग भाल्यान जोरान चालाला सुरुवात केली... बरबचा नुसत्या येके मान्ग्शी यक अश्या इर्या मांगत होता... आपले बरब कोन चाललाय ह्या पुन भाल्याला माहित नव्हता... तुक्यादा आसल ऐसा इतकेवेल त्याचा वाटला व्हता... पुन आता तू कोन र बाला? या विचाराचा धारस भाल्याला व्हत नवता... बांध खाजणानशी तो गावान जात व्हता... बांधाचे एके बाजूला मोरका किल्ला न दुसरे बाजूला खारी व्हती... सग्लेकर नुसती समशान शांती पसरली व्हती... मधीनशीच चीम्बोर्यांचे हालचालीमुल पान्याचा आवाज व्हत व्हता... निवट्यानं खारीच्या पान्यान उरी झेतली की बुरुक ऐसा आवाज व्हत व्हता... खरत ये आवाज भाल्यासाठी रोजचच व्हते, पुन आज त्याला तेंच आवाजाचे मुल दचकाला व्हत व्हता... हलुच भाल्यानं खाली पायला त कालोखान बरबच्याच पाय दिसलच नाय... स्वताचेच चपलांचा आवाज भाल्याला ऐकाला येत व्हता... आता भाल्याची हवाच निगाची बाकी व्हती... खाजनानशी कोल्हे-कूई चा आवाज ऐकाला यत व्हता... लय वेल झाला तरी पुन गाव जवल येत नव्हता... भीतीशी भाल्या थरथर कापत व्हता... तो दुसरा अजूनपण इर्या मांगताच व्हता... शेवटची इरी रायली व्हती... इर्या संपल्याव आपला कय व्हणार? ये भीतीशी भाल्यानी पलाला सुरुवात केली... बराच पलल्यावर दमल्यामुल भाल्या थांबला... तवाच त्याला खांद्याव कोणाचातरी हात जानवला न आवाज आयला..."कती पलशील?... आज आमोशेची रात्र... न तु माझेच हद्दीन हाईस..."जीवाचे भीतीन भाल्या अजूनुच जोरान पलत सुटला... गावाचे वेशीचे आत जेल्यावर भाल्यानी मांग पाहीला त तो वेशी जवलुच थांबला व्हता... भाल्या पलतूच घरन घुसला..."काय रं... काय झाला?... आवरा कला घाबरला हाईस?" भाल्याच्या आशीनी विचारला...भीतीन भाल्याची बोबरीच वलली व्हती... धापा टाकतच घरलेला सगला प्रकार भाल्यानं आईसला सांगला...आईसन ते कायपन मनाव झेताला नाही... उलट ती बोलली "आरं पण... रोजचाच येतस न बांधावरशी ये वक्ताला... पोटात कय नय तुझे... जा... सकालचा बोंबलाच कालवण न् सुकट हाय... जरासा जेवून झे... मी पुन बसते तुझे बरब जेवाला".जेवण झाल्याव माय-लेक झोपी जेले... भाल्याला झोप लागत नवती... सकाल व्हायची वाट बघत तो परुन व्हता... सकालचे कुठेतरी भाल्याचा डोला लागला...भालचंद्र नामदेव म्हात्रे म्हणजे भाल्या... आगरी बाला, लंगोटीन भजीची पुरी न् बगावा तवा वरतय बिरी... ऐसा यो भाल्या... इरीचा लय दिवाना... दारुचे मुल बापासला जाऊन ११ वर्षा झाली... तवा पासून माय-लेक दोघंच राहतान... भाल्याचा वय ३३, पण आजून अंगाला हलद लागली नाय... लय आलशी माणूस, पुन आपला नशीबुच शेन खातय असा भाल्याचा म्हनना... आईस खंबीर म्हणून चाललाय सगला बरा... दिवसभर बोस्की झेवून जातो... पण बाव काय मिल नाय... हातान पैस टीकतुच नाय... म्हणून जवरा कमवल तवरा आईसचे हातान देतो... पण रोज न चुकता इरी साठी आईसचे करशी पैशे झेतो...थोरा उशीराच उठून तोंड घाशीत भाल्या परवीन येऊन बसला... रातीचे प्रकारानं डोका भनभनला व्हता...लोका हसतीन... कोनाला सांगाचा की नाय ऐसा ईचार चालू होता... 'जाऊदे... नय सांग कोनाला पुन' असा म्हनुन भाल्या घरान शिरला... आईसनी विचारल्याव भाल्यानं तो विषय टालला...दुपारचा जेवण उरकून भाल्या जरा परला व्हता... तवाच..."भाल्या!... आर ये भाल्या!... येतस का पकटीवर" ये आवाजान भाल्याला जाग आली... बाहेर येऊन बघला त तुक्यादा होता...तुक्यादा म्हणजे भाल्याचा चुलत काकुस... गावचा पोलीस पाटील... दोघा पकटीवर जायला न्निगले... बांधावरशी जाताना परत रातीचा सगला परकार भाल्याला आठवाला लागला... सांगू का नको... सांगू का नको असा करता करता शेवटी भाल्यानी काल रातचे ज्या काय घरला त्या सगला तुक्यादाला सांगला... आवरी वर्षा झाली पुन तुक्यादान असला कवा आईकला नवता... असला काय घरुच शकत नाय असा तुक्यादाचा म्हणना नवता... पुन भाल्या आजून घाबराला नको म्हणूनशी तुक्यादानं विषय बदलला... पकटीवर पोचल्यावर दोघापन आपआपले कामाला लागले... सगला काम आटपून संध्याकालच्या आतुच भाल्या आज घरा आला आणि लवकरुच झोपला... तुक्यादाला कामा उरकून निघाला रात झाली... तुक्यादा यकटाच बांधावरशी येत व्हता... सकालचे भाल्यानी सांगलेली गोष्ट तुक्यादाला आठवली... तेच ईचारान बांधावरचे वराच्या झाराजवल पोचला... कालोखान वरावर दोन डोल चमकत व्हत... कोनतरी बोंबलतय असा वाटत व्हता.... आता तुक्यादाला जराशी भिती वाटाला लागली आणि तवर्यान फरफर करत दोन तीन घुबरा किल्ल्याकर उराली... फरफर संपल्याव परत रातीचे शांततेनं तुक्यादाला पकरला... एकटाच असलेमुल तुक्यादाचा डोका फिराला लागला व्हता न तवर्यान आवाज आयला..."तुक्यादा!... थांब जुरुसा... यक इरी दे..."तुक्यादाचचे अंगाव काटा आयला... थोरावेल तुक्यादा तयाच घट झायला... कालोखान वराखाली कोनतरी बसल्याचा जानवत होता, पुन आवरे रातचे वराखाली कोन बसलाय?... हातानचा तयाच टाकून तुक्यादान जो पल कारला तो थेट घरा पोचे पर्यंत एकदापुन मांग वलुन पायला नाय... तुक्यादा येरापिसा झाला व्हता... घरा या सांगताच त्याचे बायकोनी दोन आठवर्यापूर्वी घरलेले गोष्टीची आठवन तुक्यादाला करुनशी दिली...दोन आठवर्यापूर्वी पक्या यकटाच सांचेपारा चिंबोऱ्या पकराला खारीन जेला व्हता... दोन दिस आलाच नाय परत... म्हनुनशी गावांचे लोकाई लय शोधाशोध केली त पक्याचा मुर्दा खाजणान सापरला... पक्याला पुरमांग कोनीच नव्हता... यकटाच असाचा... गावान कोनाशीच पटाचा नाय त्याचा... कोनशी न कोनशी तरी भांडना चालूच असाची... इरीचा लय शोकीन व्हता... पक्या कैसा मेला ह्या कोनालापुन मायती नवता... कोनीतरी त्याला वर पोचवला....आशी गावांची लोक बोलाची आनी बांध ह्येच खाजनानशी जात व्हता...या आठवल्याव तुक्यादा उरालाच... तैसाच भाल्याचे घरा पोचला आनी सगला सांगला... आता भाल्याचे आईसचा पुन ईश्वास बसला... म्हनजे पक्याचा भूत?... पन कोनीतरी मानुसच या सगला कराची शक्यता व्हतीच... पण कोन करनार आसा?... कोनचा जीव वर आलाय येवरा?... असलाच त तो रम्या असला पायजे... पन दारु पीऊन नसत लफर करतय म्हनुनशी रमेशला त १० महीन्या आगुदरच मारून मारून गावानशी हाकलून दिला होता... आयुष्यान परत कोनची पुन खोरी कारनार नाय ऐशी त्याची हालत गावांचे लोकाई केली व्हती... तव पासून तो कोनाचे नजरेन सुदीक परला नव्हता... यो त भुताचाच परकार!!! पक्याच तो... नयतरी नेहमीच आख्खे गावावर खार खाऊन असाचा तो...बांधाव पक्याचचा भूत हाय ऐशी खबर दुसरे दिवशी गावभर पसरला एल लागली नाय... बांधावरशी येवा-जावाला नको म्हनुन थोरे दिवस पकटीवरचे झोपरीन राहूनुच डोलीला जावाचा निरनय भाल्यानी झेतला...इरीवाले पक्याचे भुतानी आख्खे गावाला येरा करुन सोरला व्हता... भीतीचे मुल लोकाई सांचे डोलीला जावाचा बंद केला... पक्यानी तरास देवाला नको म्हनुन येणार जाणार बांधावरचे वराखाली इरीची पाकीटा पक्यासाठी ठेवाला लागली.... पुण मयना उलटला तरी रोज कोनला ना कोनला ऐसाच अनुभव यत व्हता...आता मात्र कयतरी उपाय केलाच पायजे असा सगले गावखीन ठरला...तवर्यान आजूच रमेश बांधाव दिसला व्हता ऐशी बातमी आयली... आवरे दिवस रमेश कोनाला दिसलाच नाय न आता यो बांधाव कनशी आयला?... आनी गावान न येता बांधाव काय करतय?... नायतरी रमेशव संशय व्हताच... काय त्या सोक्ष-मोक्ष लावाचाच म्हनुन आज रातचे ५-६ जना एकत्र बांधाव जाऊ असा तुक्यादान ठरवला... ठरले प्रमाने राती तुक्यादा, भाल्या न अजून ४ जना बांधाव पोचल... कैसीच चाहूल नवती... वराखाली कोनतरी आरवा परलेला दिसला... जवल जाऊन बघतय त त्या रमेशुच व्हता... तुक्यादान त्याला उठवाचा प्रयत्न केला, पुन कायपन हालचाल झाली नाय... मुर्दाच तो... हलनार कैसा? प्रेताच डोल जरा जास्तच लाल रगता सारख दिसत व्हत... रमेशचे बॉरीवर कयाच मारल्याच्या वला दिसत नवत्या... मंग यो मेला कैसा?... दुसरा कोन असल?... पक्याचाच भूत... आवरे दिवस पक्यानी कोनाला मारला नवता, पुन आता त रमेशचा मुरदाच पारला... गावंची लोका लयुच घाबरली... दिवसाचे पुन बांधावरशी जायला लोका घाबराला लागली... भगता शिवाय आता उपाय नवता... मंग तुक्यादान शेजारचे गावानशी एक भगत बोलवला... पक्या जीता व्हता तवा त्याचे वापराची येखादी वस्तू लागनार आनी येते आमोशेला एक बोकर देवाला लागल असा भगतानी सांगला... आमोश्या दोन दिसावरुच व्हती... तोपर्यंत पक्याचे खोलीनशी पक्याचा शर्ट तुक्यादान पलवला... मंग आमोशेच्या राती भगत न गाववाल बांधावरचे वराखाली पोचल... सगला मांडून झाल्याव मंत्र बोलाला सुरुवात झायली... भगतानी आगीन कवटी ठेवली... आगीमुल कवटी लालभरक झाली... कवटीव हलद-कुकू टाकून भगत मंत्र बोलत व्हता... आमोशेच्या कालोखात आगीचे प्रकाशान वर न्हाऊन निन्गालाला व्हता... आजुबाजूचे वातावरणान भीती जानवत व्हती... मधीनुच येखादा दचकून आखर तखर बघत व्हता... बरोब १२ वाजता भगतान पक्याचा शर्ट आगीन टाकला न बोकराची आहूती दिली... पुरचा सगला प्रकार संपवून गाववाल सकाल्चेच गावान परत आल...त्याचे नंतर पुरचे २-३ राती पक्या परत कोनाला दिसला नाय... भगतान आपलं काम केला होता...मागचे मयन्यात भाल्याच्या डोलीला लय बाव लागला...पापलेट, सुरमाई, रावस, हलवा, बांगडा...लागलुच ना!... डोलीला कोनपन जात नवता न भाल्या पकटीवरुच असलेमुल रोजूच जात व्हता... पक्याचा लफरा नीस्तरल्यामुल बरेच दिवसानशी भाल्या घरा आला व्हता... नंतर एक आठवरा तो पकटीवर जेलाच नाय... येके दुपारचे जेवान उरकून परवीत इरी फुकत बसला होता..."काय र... इरी आणाला पैशे मांगत नाय आजकाल..." आईसआईसचे कर बघत भाल्या हलुच हसला... जरा येग्लाच हसू होता तो... खरात... लय दिवस पुरतीन आवर्या इर्या मागचे एक-दीर मयन्यान भाल्याकर जमल्या होत्या... आनी जे दिवशी रमेशचा प्रेत सापरला तेच दिवशी शेजारचे गावान दारुच्या ईषबाधेमुल आजून ५ जना मेली व्हती.....................
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बाणा.

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०११

वासुदेव बळवंत फडके-एक झंझावात


वासुदेव बळवंत फडके-एक झंजावात

" ज्या भूमीचे पोटी आपण जन्म घेतला, तिच्याच पोटी ही सर्व लेकरे झाली. त्यांनी अन्नान्न करीत उपाशी मरावे, आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरीत रहावे, हे मला पाहवले नाही आणि म्हणून ब्रिटिश सरकारविरूद्ध मी बंड पुकारले !""अहो माझ्या हिंदुस्थानवासी बांधवहो, तुमच्या कल्याणासाठी मी माझे प्राण पणास लावीत आहे. असा प्रयत्न करण्यातही मी काय पुरुषार्थ केला ? दधिची ऋषींनी आपल्या अस्थीही देवांच्या कल्याणासाठी नाही का काढून दिल्या ? तसेच माझे प्राण घेऊन तरी इश्वराने तुम्हांला सुखी करावे, अशी माझी त्याला प्रार्थना आहे !""मी मरून जाईन. पण या दुष्ट, प्रजाभक्षक, चांडाळ इंग्रजांना मेल्यानंतरही मी शांतता लाभू देणार नाही."- वासुदेव बळवंत फडके

राजघोषणा :-"या उंच आणि सडपातळ शरीरयष्टीच्या, सरळ तरतरीत नाकाच्या, निळसर डोळ्याच्या, दाट दाढी आणि मिशा राखणार्‍या, इंग्रजी सफाईदार पणे बोलाणार्‍या, बंडखोरास (वासुदेव बळवंत फडकेस) पकडून देणार्‍या किंवा पकडून देण्यात सरकारला सहाय्य देणार्‍या कोणत्याही मनुष्यास एकूण चार सहस्त्र (हजार) रूपयांचे पारितोषिक घोषीत करण्यात येत आहे."- मुंबई राज्यपाल.

प्रति राज घोषणा :-"मुंबईच्या राज्यपालाचे मस्तक जो आणून देईल त्याला दहा सहस्त्र (हजार) रूपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे- पेशव्यांचा नवा मुख्य प्रधान - भाऊ साहेब (वासुदेव बळवंत फडके)

"मी व्याख्याने देण्यास सुरूवात केली. ती पुणे, पळस्पे, पनवेल येथे दिली. ती कितीकांजवळ असतील. पण उपयोग झाला नाही. ती झाडाच्या पानावर पडलेल्या पाण्याप्रमाणे ठरली. आमच्यापैकी बरेच हिंदी लोक मूर्ख आहेत. आम्हांला त्वरित फायदा पाहिजे ! पण त्यासाठी त्याग करायला नको.""पुण्याचा खजिना लुटण्याची माझी योजना पुरी झाली होती. पण आयत्या वेळेला एका मुसलमानाने ती बाहेर फोडली. त्यामुळे तो बेत मला सोडून द्यावा लागला. त्यानेच सर्व हिंदुस्थानचा घात केला."आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची कोर्टात साक्ष.

वासुदेव बळवंत फडके-आगरी बाणाच स्फुर्तीस्थान
इ. स. १८०० चं शेवटचं पर्व सुरू झालं. ब्रिटिशांनी आपल्या कूटनीतीने संपूर्ण हिंदुस्थानवर हळूहळू कब्जा मिळविण्यास सुरुवात केली. भारतमाता ब्रिटिशांच्या आणि पारतंत्र्याच्या जोखडात जखडू लागली. ब्रिटिश गव्हर्नर जनरल डलहौसीने एकामागून एक संस्थाने खालसा करण्यास सुरुवात केली. हिंदुस्थानातील जनतेत आणि संस्थानिकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध असंतोषाचा अग्नी धुमसू लागला आणि १८५७ मध्ये स्वातंत्र्ययुद्धाचा वणवा भडकला. या स्वातंत्र्ययुद्धात नानासाहेब पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे, दिल्लीचा बादशहा असे अनेकजण सामील झाले. हिंदुस्थानात ठिकठिकाणी ब्रिटिशांविरुद्ध उठाव सुरू झाले. याच धामधुमीत रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळील शिरढोण या गावी ४ नोव्हेंबर १८४५ रोजी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. हेच ते स्वातंत्र्य चळवळीच्या सशस्त्र क्रांतीचे प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके!प्राथमिक शिक्षण शिरढोणला झाल्यावर माध्यमिक शिक्षणासाठी प्रथम त्यांनी कल्याण व नंतर मुंबई गाठली. ब्रिटिश सरकारचे प्रशस्तिपत्रक नको म्हणून त्यांनी फायनल परीक्षेपासून दूर राहणे पसंत केले. नंतर एक-दोन नोकर्‍या सोडून लष्कराच्या हिशेब खात्यात नोकरीस लागले. यावेळी त्यांची मुंबईहून पुण्यास बदली झाली. पुणे येथे नोकरी करीत असताना त्यांनी तलवारबाजी, दांडपट्टा, घोड्यावर बसणे यांचे शिक्षण घेतले. शिरढोणला असलेली त्यांची आई अत्यवस्थ असल्याचे त्यांना कळले. पण ब्रिटिश अधिकार्‍याने त्यांची रजा नामंजूर केल्याने त्यांना आईच्या अंत्यदर्शनापासून मुकावे लागले आणि इथेच वासुदेवांच्या मनात ब्रिटिशांविरुद्धची पहिली ठिणगी पडली. १८७६ ते ७८ या काळात महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला. दुष्काळात सापडलेल्यांना ब्रिटिश सरकार मदत करीत नाही हे पाहून वासुदेवांच्या मनातील ठिणगीचे वणव्यात रूपांतर झाले.
वासुदेव बळवंत फडक्यांनी क्रांतिकारकांचे प्रेरणास्रोत असलेल्या शिवाजी महाराजांना स्मरून ब्रिटिश सरकार उलथून पाडण्याची व भारतभूमीला ब्रिटिशांपासून मुक्त करण्याची शपथ घेतली. त्यांनी बुरुड, रामोशी समाजातील तरुणांना एकत्र आणून एक सेना उभारली. आपल्या सैन्याच्या खर्चाकरिता व शस्त्रास्त्रांकरिता त्यांनी गावातील धनिकांना लुटले, पण देश स्वतंत्र होताच त्यांना नुकसानभरपाई देण्याचे आश्‍वासनही दिले. त्यांनी ब्रिटिशांचा खजिना व ठाणी लुटली. इ.स. १८७९ मध्ये त्यांच्या बंडांनी पुणे व रायगड जिल्ह्यांत ब्रिटिशांना ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले! त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने ५००० रुपयांचे इनामही लावले, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. अखेर फितुरी व आजारपण यांनी जेरीस आलेले वासुदेवराव पठाणांचे पगारी सैन्य उभारण्याकरिता विजापुरास निघाले. पण देवरनावडगी या ठिकाणी अखेर ब्रिटिशांनी त्यांना गाठले. त्यांच्यावर खटल्याचा फार्स करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांची रवानगी एडनला करण्यात आली. निकस अन्न, आत्यंतिक कष्टाची कामे, खराब हवा व क्षयरोग यांनी वासुदेवराव पोखरून गेले. तरीही अशा परिस्थितीत त्यांनी तुरुंगातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आजारपण व अन्नत्यागामुळे १७ फेब्रुवारी १८८३ रोजी हा भारतमातेचा तेजस्वी सुपुत्र, दत्तात्रयांचा निस्सीम भक्त आणि शिवाजी महाराजांचा सेवक अनंतात विलीन झाला! १७ फेब्रुवारी रोजी येणार्‍या त्यांच्या पुण्यदिनी, भारतमातेच्या या सुपुत्राला आद्यक्रांतिवीराला आगरी बाणाचा मानाचा मुजरा!
पनवेलपासून पळस्पा फाट्याच्या पुढे तीन-चार कि.मी.वर मुंबई-गोवा महामार्गावर ‘शिरढोण’ हे आद्यक्रांतिकारी वासुदेव बळवंत फडक्यांचे जन्मगाव आहे. गावात वासुदेवरावांचा जन्म झाला तो वाडा आज दयनीय अवस्थेत उभा आहे. वासुदेवरावांच्या वाड्यासमोर कै. विष्णू गोपाळ तथा बापूसाहेब फाटक यांच्या पुढाकारांनी उभारलेले एक स्मृतिमंदिर आहे. या स्मृतिमंदिरात वासुदेवरावांचे फोटो, माहिती, पुतळे आणि ते लहानपणी वापरत असलेली बोकडाची गाडी ठेवण्यात आली आहे. कर्नाळा किल्ल्याच्या निसर्गरम्य परिसरात असलेल्या आणि मुंबईजवळ असलेल्या शिरढोण येथील वासुदेवरावांच्या जन्मभूमीस आणि वाड्यास आवर्जून भेट द्या. ज्या क्रांतिवीरांच्या प्रेतांच्या पायघड्यांवरून स्वातंत्र्यलक्ष्मी चालत आली त्या सशस्त्र क्रांतींचे प्रवर्तक आद्यक्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके यांच्यासमोर नतमस्तक सारेजण होतात.आगरी बाणा कडून आद्यक्रांतीकारी वासुदेव बळवंत फडके यांना मानाचा मुजरा.
आपलाच,
आमोद पाटील
(आगरी बाणा)
-आमोद पाटील.
आगरी युवा.
आगरी बोली-आगरी बाणा.

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०११

मराठी पाऊल पडते पुढे.........!!


दर सोमवार आणि मंगळवारी रात्री ९.३० ते १०.३० च्या दरम्यान हा कार्यक्रम प्रदर्शित होतो. सह कुटुंब सह परिवार पाहावा असा हा कार्यक्रम आहे..........मला तरी हा कार्यक्रम अतिशय आवडतोय................कारण त्याच वाहिनी वर चालू असलेल्या सासू सुनांच्या मालिका डोक्याला अगदी शॉट लावतात.............
कला दिग्दर्शक श्री.नितीन चंद्रकांत देसाई यांचा हा अतिशय चांगला उपक्रम आहे. या अगोदर त्यांनी स्टार प्रवाह वर शिवाजी महाराजांचा बहुतेक सर्व इतिहास पुन्हा एकदा जिवंत करून महाराष्ट्रातील जनतेसमोर सादर केला. त्यानंतर सध्या ईटीव्ही मराठीवर बाजीराव पेशव्यांचा इतिहास जिवंत करण्यात येत आहे. अतिशय सुंदर मांडणी आणि कल्पक विचारसरणी यांचा सुंदर मिलाप त्यांच्या सर्व प्रोजेक्ट्स मधून नेहमी दिसून येतो. मराठी पाऊल पडते पुढे हा त्यांचा अतिशय उत्कृष्ट प्रयत्न म्हणायला हवा. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांनी कलेची देणगी लाभलेली रत्ने आम्हा कला प्रेमींच्या समोर सदर केलेली आहेत आणि यापुढेही करत राहतील ही अपेक्ष्या.........
आता कार्यक्रमा विषयी.........
कार्यक्रमाचा रंगमंच अतिशय सुंदर........शिवाजीराजे, भवानी माता, हत्ती अस सर्व अस्सल मराठमोळ वातावरण निर्माण केलंय.........
३ आठवडे काहीना काही नवीनतम पाहायला मिळाल. लावणी असो, कळसूत्री बाहुल्यांचा कार्यक्रम, कोंबडा नाच, तबला वादन...........सर्वच कलाकार अतिशय उत्कृष्ट..........जितेंद्र जोशीच सुत्रासंचालन अप्रतिम.........परीक्षक मकरंद देशपांडे देखील मस्त प्रतिक्रिया देतात.........तरीही एक गोष्ट खटकतेच........ती म्हणजे..........आत्तापर्यंत तुमच्या लक्ष्यात आलच असेल ...........नसेल आल तर सांगतो...........आपल्या मराठी कन्यका मुग्धाताई गोडसे..........यांची मराठी पहा,"मी 'म्हणल' कि वाव.......,मी 'म्हणल'(मी म्हणाल कि मी म्हणाले???) कि ग्रेट.......,मी तुम्हाला ८ मेडल्स देते.........!!!!!!!!" मराठी कार्यक्रमात इंग्रजीचा मनसोक्त पणे वापर...........!!!!!!!!१ माझ्या मते मुग्ध ताईंच्या जागेवर आपले नाना पाटेकर असते तर अतिशय मस्त वाटल असत........अथवा मुग्धा गोडसेंनी इंग्रजी शब्द टाळायला हवेत........त्यांनी तसा प्रयत्न जरूर करावा.........कारण आम्हा मराठी रसिकांच्या कानाला हा एक प्रकारची जबरदस्ती वाटते........जस गोड श्रीखंडात मध्येच एखादी मिरची........इंडिया गोट तेलेन्त या कार्यक्रमापेक्ष्या आमचा मराठमोळा ................."मराठी पाऊल पडते पुढे" कितीतरी पटीने सरस आहे. आपणा सर्वानी कुटुंबासमवेत पाहवा असा हा महाराष्ट्रातील मातीतल्या कलाकारांना योग्य न्याय देणारा कार्यक्रम......
नितीन देसाई ,त्यांची टीम आणि ज्यांच्या कलेसाठी हा मोठा रंगमंच उभारण्यात आलाय त्या सर्व कलाकारांना आगरी बाणा कडून मानाचा मुजरा.............!!!
आपलाच,
कलाप्रेमी आगरी बाणा म्हणजेच आमोद पाटील.

-आमोद पाटील.
आगरी युवा.
आगरी बोली-आगरी बाणा.
(AMOD PATIL-AGRI SAMAJ)

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०११

रायगडची पोपटी.

रायगडची प्रसिद्ध पोपटी
पाककृतीला लागणारा वेळ: ४५ मिनिट
पाककृतीचे जिन्नस:
२ किलो गोड्या वालाच्या शेंगा
१ मातीचा माठ
मीठ चवी प्रमाणे
बटाटे ३ /४
कांदे ३/४
खरवडलेला नारळ (कांदे, बटाट्यांमध्ये सारण म्हणून)
मसाला (सारणासाठी)
भांबुर्डीची पाने
भरपुर पला -पाचोळा,
सरपण
हल्ली मटण चिकन टाकुनही पोपटी केली जाते.(जर भाज्या आणि मटण किंवा चिकन
एकत्र शिजवायचे असतील तर मटण किंवा चिकन केळीच्या पानात गुंडाळून बांधुन
ठेवतात.)
मार्गदर्शन:
पोपटी ही एक जि. रायगड परिसरात गावरान पाककृती आहे. शेणाने सारवलेल्या
जमिनीवर बसुन गरमागरम खाण्यात जी मजा आहे ती शब्दात सांगणे खूप अवघड आहे
. उरण(खासकरुन चिरनेर गाव आमच्या जासई मध्ये अजिबात नाही), पेण, अलिबाग
(जि. रायगड) या परिसरात जे वाल पिकतात त्यांना गोडेवाल म्हणतात .
अशा वालच्या शेंगा घ्याव्या. ताज्या ताज्या शेतातून काढून आणल्या असतील त
फ़ारच उत्तम. (या शेंगा दिसायला थोड्याफ़ार घेवड्याच्या शेंगेसारख्या
दिसतात पण आकाराने लहान असतात ) या शेंगा अवश्यकता वाटल्यास धुवून
घ्याव्या . बटाटे व कांदे धुवून घ्यावेत. कांदे सोलून घ्यावेत. भरली
वांगी करतात त्याप्रमाणे कांदे व बटाटे कापून घ्यावे .
सारण तयार करण्यासाठी खरवडलेला ओला नारळ, मसाला, मीठ, थोडे तिखट चवी
प्रमाणे एकत्र करावे. कापलेल्या कांदे व बटाट्यांमध्ये हे सारण भरावे.
प्रत्येक कांदा / बटाटा छोट्या सुताने बांधून घ्यावा. मातीचे मडके घेऊन
त्याच्या तळाच्या पाव भागात सर्वात खाली भांबुर्डीचा पाला भरावा . मग
त्यावर वालच्या शेंगा, बटाटे, कांदे आणि चवी प्रमाणे मीठ टाकावे.
उरलेल्या जागेत भांबुर्डीचा पाला ठासुन भरावा. सगळे सरपण एकत्र करावे.
त्यामधे या माठाला ठेवावे (पाला ठासून भरलेला असल्यामुळे आतले जिन्नस
बाहेर येत नाहीत ) आणि बिनदिक्कत आग लावून द्यावी. जाळ करतान एक दक्षता
घ्यावी, माठाच्या सर्व बाजूंनी सरपण असेल. ३० ते ४० मिनीटे असाच जाळ राहू
द्यावा. आपण ठेवलेला माठ लालबुंद झालेला आपणांस आढळून येईल . आशा वेळी
त्यावर जळत असलेले सरपण थोडे बाजुला करून माठावर ओंजळीतून पाणी शिंपडावे.
पाण्याच फ़ेस झाला तर पोपटी झाली असे समजावे. काठीने तो माठ बाहेर काढावा.
काठीनेच वर भरलेला भांबुर्डीचा पाला काढावा. मग़ शेंगा, बटाटे, कांदे
काढून घ्यावे. आणि गरम गरम शेंगा सोलून खाव्या.
या पोपटीला भांबुर्ड्याच्या पाल्याचा, ओव्याचा व भाजका असा एक विशिष्ट
वास व चव असते. हा पुर्णपणे भाजलेला प्रकार आहे. तेल व पाणी न वापरता.
भाजल्यामुळे ही पोपटी पचायलाही हलकी असते.

सौजन्य:
सौ.प्राजक्ता म्हात्रे(उरण)शनिवार, ५ फेब्रुवारी, २०११

गाव छोडब नही

गाव छोडब नही

काल आपल्या DURDARSHAN NATIONAL वर हे गाणे ऐकले. विचार करायला लावले.
गाण्यातील प्रत्येक शब्द माझ्या मनातील भावना जाणतोय अस वाटत होत. एक
प्रकल्पग्रस्त म्हणून हे सर्व मी जाणतोय आणि अनुभवतोय्.
-आमोद पाटील

गाव छोडब नही, जंगल छोडब नही,
माय माटी छोडब नही लाडाय छोडब नही।

बाँध बनाए, गाँव डुबोए, कारखाना बनाए ,
जंगल काटे, खदान खोदे , सेंक्चुरी बनाए,
जल जंगल जमीन छोडी हमिन कहा कहा जाए,
विकास के भगवान बता हम कैसे जान बचाए॥

जमुना सुखी, नर्मदा सुखी, सुखी सुवर्णरेखा,
गंगा बनी गन्दी नाली, कृष्णा काली रेखा,
तुम पियोगे पेप्सी कोला, बिस्लरी का पानी,
हम कैसे अपना प्यास बुझाए, पीकर कचरा पानी? ॥

पुरखे थे क्या मूरख जो वे जंगल को बचाए,
धरती रखी हरी भरी नदी मधु बहाए,
तेरी हवसमें जल गई धरती, लुट गई हरियाली,
मचली मर गई, पंछी उड गई जाने किस दिशाए ॥

मंत्री बने कम्पनी के दलाल हम से जमीन छीनी,
उनको बचाने लेकर आए साथ में पल्टनी
हो... अफसर बने है राजा ठेकेदार बने धनी,
गाँव हमारी बन गई है उनकी कोलोनी ॥

बिरसा पुकारे एकजुट होवो छोडो ये खामोशी,
मछवारे आवो, दलित आवो, आवो आदिवासी,
हो खेत खालीहान से जागो नगाडा बजाओ,
लडाई छोडी चारा नही सुनो देस वासी ॥

-आमोद पाटील
©आगरी युवा
आगरी बोली - आगरी बाणा.
(AMOD PATIL-AGRI SAMAJ)

बुधवार, २ फेब्रुवारी, २०११

मुन्नी इस्कूल जाएगी . . . .

मुन्नी इस्कूल जाएगी . . .
(हा एक वेगळा प्रयत्न करतोय्. आवडला तर फेसबुक वर जरुर कळवा.
-आमोद पाटील.)

मुन्नी इस्कूल जाएगी . . .
मै ना जानु पढ़ना लिखना,
लेकिन मुन्नी को हे पढ़ना,
अच्छी शिक्षा पाएगी
जब मुन्नी इस्कूल जाएगी . . .

रोज मजूरी कितनी मिलती,
मै ना जानु कोई गिनती
वो मुझसे गिनवाएगी
जब मुन्नी इस्कूल जाएगी . . .

दूर कभी चिठ्ठी हो देनी
मेरी बात लिखेगी मुन्नी
ख़त मे वो छाजाएगी
जब मुन्नी इस्कूल जाएगी . . .

हर मुश्किल से उसको लढना
कुछ भी हो आगे हे बढ़ना
अच्छे नंबर लाएगी
जब मुन्नी इस्कूल जाएगी . . .

जीवन कटा हे सहेते सहेते
थोडा हसते थोडा रोते
वो गीत खुशीके गाएगी
जब मुन्नी इस्कूल जाएगी . . .

-आमोद पाटील
©आगरी युवा
आगरी बोली - आगरी बाणा.
(AMOD PATIL-AGRI SAMAJ)