आमोद पाटील-आगरी बाणा: वर्ष ५

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

वर्ष ५


प्रथम  वर्धापनदिन
गेल्या वर्षी आषाढ शु. ११, शके १९३२ देवशयनी एकादशी(आषाढी एकादशीच्या) शुभमुहूर्तावर आमोद पाटील-आगरी बाणा ब्लॉगची मुहूर्तमेढ रोवली गेली. जे एक स्वप्न घेऊन हा झेंडा हाती घेतला होता त्याला विठू माउलीच्या आणि एकविरा आईच्या कृपेने तसेच पाटील साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या माणसांपर्यंत पोचवण्यात यश आले. भविष्यात देखील आपणा सर्वांची साथ अशीच कायम राहुदे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
बोला पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल...
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय

द्वितीय  वर्धापनदिन
पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल
३० जून, २०१२ आषाढ शु. ११, शके १९३२ देवशयनी एकादशी(आषाढी एकादशी) रोजी आमोद पाटील-आगरी बाणा ब्लॉग परिवाराने इंटरनेटविश्वात आपली दोन वर्षे पूर्ण करून तृतीय वर्षात यशस्वी वाटचाल सुरु केली आहे. आपणा सर्वांचे आशीर्वाद कायम असेच पाठीशी राहोत.

 तृतीय वर्धापनदिन
आपल्या आमोद पाटील-आगरी बाणा ब्लॉग परिवाराच्या दृष्टीने तृतीय वर्षात अतिशय महत्वाची घटना घडली. माझे प्रेरणास्थान सर्व प्रकल्पग्रस्त आगरी समाजाचे आधारवड लोकनेते दि.बा.पाटील साहेब हे २४ जून,२०१३ रोजी आपल्या सर्वांना सोडून गेले. खऱ्या अर्थाने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत असलेला आपला आमोद पाटील-आगरी बाणा ब्लॉग खऱ्या अर्थाने पोरका झाला, तरी भविष्यात देखील साहेबांच्या विचारांची शिदोरी मनात ठेवून आम्ही मार्गक्रमण करत राहू. साहेब परत या...

चतुर्थ वर्धापनदिन
बरेच विषय होते. त्यातील काही विषय फेसबुकवरील आमोद पाटील-आगरी बाणा ब्लॉगच्या माध्यमातून मांडले, बरेच विषय मांडायचे राहिले.

आपलाच,
आमोद  पाटील.