आमोद पाटील-आगरी बाणा: ही राजकारण्यांची खरी जात........!!

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

स्वर्गीय लोकनेते दि.बा.पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
ठिकाण: श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यूनियर कॉलेज जासई. मंगळवार दि.१३ जानेवारी २०१५, सकाळी ११ वाजता

शुक्रवार, ११ मार्च, २०११

ही राजकारण्यांची खरी जात........!!


ही राजकारण्यांची खरी जात........!!
खाली मी दोन परस्पर विरोधी बातम्या देत आहे. त्या वाचा आणि काय आहे ते समजून जा.

बातमी क्रमांक:१

अणुऊर्जा प्रकल्पांना विरोध कृतीतून दाखवू - राज ठाकरे
१६ डिसेंबर,२०१०(सकाळ)
चिपळूण - "कोकणचा विकास करण्यासाठी इतर अनेक पर्याय असताना केवळ अणुऊर्जा प्रकल्पच कोकणच्या माथी का मारले जात आहे ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अणुऊर्जा प्रकल्पांना असलेला विरोध कृतीतून दाखवू'', असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारला दिला.ते म्हणाले, ""अमेरिकेत 1973 नंतर दोन अणुऊर्जा प्रकल्पांना राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मान्यता दिली आहे. पण या प्रकल्पांना अमेरिकेच्या सिनेटने अजून मान्यता दिलेली नाही. चीनमध्ये अणुबॉम्बचा स्फोट झाल्यापासून कायदे कडक करण्यात आले आहेत. एखाद्या प्रदेशात अणु प्रकल्प साकारायचा असेल तर त्याला इंटरनॅशनल लॉ ची परवानगी घ्यावी लागते. लोकसभेत अद्यापपर्यंत तसा प्रस्तावही मांडण्यात आलेला नाही. अणुऊर्जा प्रकल्पांविषयी केंद्र सरकारकडून योग्य माहिती दिली जात नाही. असे असताना जमीन संपादित करण्याचा डाव का रचला जात आहे, महाराष्ट्राचे नेते का गप्पा आहेत.''महाराष्ट्राला भारनियमन मुक्त करण्यासाठी वीज उत्पादनाची मोठी गरज आहे. त्यासाठी एकट्या कोकणमध्ये 21 ऊर्जा प्रकल्प आणणे हा पर्याय असू शकत नाही. कोकणची जमीन सुपीक आहे. शेतीसाठी योग्य असलेल्या या जमिनीत प्रकल्प उभारण्यापेक्षा नापिक जमिनीत अणुऊर्जा प्रकल्प उभारा. अणुऊर्जा प्रकल्पातून कोकणचा कोळसा करण्यापेक्षा येथे येणारे प्रकल्प राज्याच्या विविध भागात विभागून द्या. समुद्रकिनारा नसलेल्या प्रदेशामध्ये प्रकल्प कसे उभे राहिले. डहाणुमध्ये रिलायन्स कंपनीने 100 टक्के प्रदूषण मुक्त वीज प्रकल्प उभारला आहे. त्याची माहिती मी घेतली आहे. अशा प्रकारचे प्रकल्प सरकारने हाती घेतले तर आम्ही सरकारच्या निर्णयाचे स्वागत करू; मात्र अणुऊर्जा प्रकल्पांना मनसेचा विरोध असेल आणि तो आम्ही कृतीतून दाखवून देऊ, असे त्यांनी सांगितले

बातमी क्रमांक:२
जैतापूर प्रकल्पाला मनसेचा पाठिंबा-राज ठाकरे

९ मार्च,२०११(स्टार माझा)

बहुचर्चित आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या जैतापूर प्रकल्पाला राज ठाकरेंनी मनसेचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलाय. राज्याच्या विकासाच्या आड मनसे कधीही येणार नाही अशी भूमिकाही राज यांनी यावेळी स्पष्ट केली. तसेच राज्यातल्या सगळ्या महापालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणाही राज ठाकरेंनी केलीय. नारायण राणे यांनी कुणालाही उत्तरं देतं बसू नये, यामुळे वाद वाढतील आणि प्रकल्प रखडेल असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय.पण सर्वच उर्जा प्रकल्प सरकारला कोकणातच का हवे आहेत, असा सवालही राज ठाकरे यांनी केलाय.मनसेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त ते षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्त्यांशी बोलत होते. युतीचं ओझं वाहण्याची आपली इच्छा नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. याचवेळी राज ठाकरेंनी शिवसेनेनं मुंबईत केलेल्या कारभाराचाही समाचार घेतला. झोपड्या वाढत असताना त्या बाळासाहेबांना दिसत नाहीत का असा सवालही राज यांनी केलाय.

तर आत्ता काय बोलाल????? मी तर बोलणार............कोन नाय कोनचा, आयुष्यभर खा डाल भात लोनचा..............त्यामुळे यापुढे फक्त कोकण वासियानीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने डोळे उघडून स्वतःचा लढा स्वतःच द्यायला हवा............राजकारणी कोणीही असो............ते फक्त सत्तेचाच विचार करणार................आपण ज्या माणसांशी भांडण करतो (वरून मिळालेल्या आदेशामुळे)............तेच आदेश देणारी मंडळी आणि आपण ज्याच्याबरोबर भांडतो ते मात्र नंतर एकमेकांच्या खुर्चीला खुर्ची टेकवून, सत्तेसाठी अभद्र युत्या करून..........जनतेला वेड बनवलं म्हणून गालातल्या गालात हसत असतात..............जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी हे लक्ष्यात ठेवावं.............पक्ष्य कोणताही असो.................कार्यकर्ता हा नेहमी कार्यकर्ताच राहतो..............
आपलाच,
आमोद पाटील.
आगरी बोली-आगरी बाणा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा